Subscribe Us

राज्य शासकीय कर्मचारी अपघात विमा योजनेमध्ये बदल- वार्षिक वर्गणी व विमा रकमेत वाढ state gov employee accident insurance scheme changed

 राज्य शासकीय कर्मचारी अपघात विमा योजनेमध्ये बदल- वार्षिक वर्गणी व विमा रकमेत वाढ state gov employee accident  insurance scheme changed

शासन निर्णय दिनांक 24 जाने 2023


कर्मचारी / अधिकाऱ्यांचा आर्थिक स्तर, ७व्या वेतन आयोगामुळे वेतनात झालेली भरीव वाढ, महागाई निर्देशांक इत्यादी बाबी विचारात घेता, योजनेची वर्गणी व राशीभूत रकमेमध्ये वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे :-

शासन निर्णय :-

दि.०१ एप्रिल, २०२३ पासून राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेची वर्गणी व राशीभूत रक्कम (Capital Sum Insured) यामध्ये वाढ करण्यात येत असून व सदर वर्गणी व राशीभूत रक्कम खालीलप्रमाणे गटनिहाय निर्धारित करण्यात येत आहे :-

टिप :- कालबद्ध पदोन्नती योजनेअंतर्गत किंवा सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत वरिष्ठ वेतनश्रेणी दिलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वरिष्ठ वेतनश्रेणीच्या अनुषंगाने त्यांच्या मूळ पदाचा विचार न करता अपघात विमा योजनेची वर्गणी घेण्यात यावी व त्याप्रमाणे लाभ अनुज्ञेय करावेत. कर्मचाऱ्याकडून वर्गणी घेताना तो ज्या पदाचे वेतन घेत आहे त्या पदाच्या गटाप्रमाणेच वर्गणी घेण्यात यावी व लाभ अनुज्ञेय करण्यात यावेत. तथापि, योजना वर्षाच्या कालावधीत त्या पदाचा गट बदलला तर त्यापुढील योजना वर्षाची वर्गणी व अनुज्ञेय लाभ यामध्ये बदल होतील.

२. माहे फेब्रुवारी महिन्याची वेतनाची देयके सादर झाल्यानंतर नियुक्त झालेले कर्मचारी तसेच, ज्या कर्माचाऱ्यांची वर्गणी माहे फेब्रुवारी महिन्यामध्ये वसूल करण्यात आलेली नाही, अशा कर्मचाऱ्यांना अपघात योजनेमध्ये समाविष्ट करण्यासाठी, उपरोक्त परिच्छेद- १ मधील सुधारणांच्या अनुषंगाने, दि.०५.०३.२०१९ च्या शासन निर्णयाच्या पहिल्या परिच्छेदातील अ.क्र. ४) मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे :-

योजना लागू होण्याच्या कालावधीनुसार खालीलप्रमाणे वर्गणी वसूल करण्यात यावी :-

३. योजनेतील सदर सुधारणेच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक कार्यालय प्रमुखांने त्यांच्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांच्या वेतन देयकातून अपघात विमा वर्गणी माहे फेब्रुवारी, २०२३ देय मार्च, २०२३ च्या वेतनातून व तद्नंतर दरवर्षी कपात करणे आवश्यक राहील.

४. सदर अपघात विमा योजनेची वरीलप्रमाणे वर्गणी वसूल करण्याची जबाबदारी सदस्य कार्यरत असलेल्या संबंधित कार्यालय प्रमुख / आहरण व संवितरण अधिकारी यांची राहील.

५. संबंधित विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुख यांनी अपघात विमा योजनेची सुधारित वर्गणी कर्मचारी / अधिकारी यांच्या वेतनातून कपात करण्याबाबत संबंधित वेतन प्रणालीमध्ये व्यवस्था करावी.

६. दि.१८.०२.२०१७, दि. ११.०८.२०१७, व दि.०५.०३.२०१९ च्या शासन निर्णय तसेच, दि. १५.०२.२०१८ च्या परिपत्रकामध्ये नमूद केल्याप्रमाणे योजने संदर्भातील अन्य सर्व बाबींचे पालन करण्यात यावे.

Post a Comment

0 Comments