Subscribe Us

5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2023 ची अधिकृत अंतरिम उत्तरसूची प्रसिद्ध Answer Key

 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा  फेब्रुवारी 2023 ची अंतरिम  उत्तरसूची  प्रसिद्ध Answer Key 



महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. ८ वी ) रविवार दि. १२ फेब्रुवारी, २०२३ अंतरिम (तात्पुरती ) उत्तरसूची 

रविवार दि. १२ फेब्रुवारी, २०२३ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) या परीक्षेची इयत्तानिहाय पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची परिषदेच्या www.mscepune.inhttps://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर या परीक्षेचे परीक्षार्थी मार्गदर्शक शिक्षक, पालक, शाळा आणि क्षेत्रिय अधिकारी यांच्या माहितीसाठी प्रसिध्द करण्यात येत आहे.

सर्व माध्यम

अंतरिम उत्तरसूचीवरील आक्षेप नोंदविण्याची कार्यपध्दती :-

  • १) सदर अंतरिम उत्तरसूचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन परिषदेच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन स्वरूपात करता येईल.
  • २) सदर ऑनलाईन निवेदन पालकांकरीता संकेतस्थळावर व शाळांकरीता त्यांच्या लॉगीनमध्ये Objection on Question Paper & Interim Answer Key या हेडिंगखाली उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. 
प्रश्नप्रत्रिका व अंतरिम उत्तरसूचीवरील आक्षेप LINK
  • ३) त्रुटी / आक्षेपाबाबतचे ऑनलाईन निवेदन भरण्याकरीता दिनांक १७/०२/२०२३ ते २३/०२/२०२३ रोजीपर्यंत मुदत देण्यात येत आहे.
  • ४) दि. २३/०२/२०२३ नंतर त्रुटी / आक्षेपाबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही.
  • (५) उपरोक्त ऑनलाईन निवेदनाशिवाय इतर कोणत्याही प्रकारे (टपाल, समक्ष अथवा ईमेलद्वारे) प्राप्त त्रुटी / आक्षेपाबाबतच्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही.
  • ६) उपरोक्तनुसार विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांना वैयक्तिकरित्या उत्तर पाठविले जाणार नाही.
  • (७) विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर संबंधित विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल.

ऑनलाईन आवेदनपत्र व शाळा माहिती प्रपत्रातील माहितीत दुरुस्ती करणेकरीताची कार्यपध्दती :-

  • (१) विद्यार्थ्याच्या ऑनलाईन आवेदनपत्रातील माहितीत व शाळा माहिती प्रपत्रात (विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडीलांचे नाव, आईचे नाव, लिंग इत्यादी) दुरुस्ती करण्यासाठी दिनांक १७/०२/२०२३ ते २३/०२/२०२३ रोजीपर्यंत शाळांच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे..
  • २) सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अजांचा विचार केला जाणार नाही.

Post a Comment

0 Comments