Subscribe Us

१० वी व १२ वी च्या परीक्षा प्रश्नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या वेळेपूर्वी १० मिनिटे अगोदर आता बंद होणार ..

१० वी व १२ वी च्या परीक्षा प्रश्नपत्रिकांचे १० मिनिटे अगोदर वाटप आता बंद...

१० वी व १२ वी च्या परीक्षा प्रश्नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या वेळेपूर्वी १० मिनिटे अगोदर आता बंद होणार ....तर  पेपरच्या निर्धारीत वेळेनंतर शेवटी दहा मिनीटे वेळ विद्यार्थ्यांना वाढवून मिळणार ... 

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी ) फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेपासून प्रश्नपत्रिका दहा मिनिटे अगोदर वितरीत करण्याच्या कार्यपध्दतीबाबत.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) फेब्रु मार्च २०१५ परीक्षेपासून परीक्षार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी (आकलन होण्यासाठी) परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर करण्यात येत होते.


इ. १० वी व इ. १२ वी च्या परीक्षा विद्यार्थ्याच्या जीवनातील एक महत्वपूर्ण टप्पा असल्यामुळे पालक व समाज घटक यांचे या परीक्षांकडे बारकाईने लक्ष असते. परंतु प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच अन्य समाज माध्यमातून व्हायरल झाल्याच्या अफवा व काही अंशी अशा घटना निदर्शनास आलेल्या आहेत. पेपरफुटीच्या अशा अफवांमुळे परीक्षायांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. तसेच यामुळे मंडळाची प्रतिमा जनमानसात मलिन होते. यापूर्वी परीक्षा दालनात परीक्षार्थ्यांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी १० मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिकांचे वितरण केल्यामुळे परीक्षा केंद्रावर निर्धारीत वेळेनंतर पोहोचणा-या विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिकेचा आशय आढळून आल्याच्या घटना निदर्शनास आलेल्या आहेत.

अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध व्हावा तसेच परीक्षा निकोप, भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरीत करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेपासून रद्द करण्यात येत  आहे.

राज्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्याचे  शासनाचे आदेश CLICK HERE

शासन निर्णय वाचा  CLICK HERE

तथापि विद्यार्थी हित लक्षात घेता व पालक, विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करून सदरची दहा मिनिटे परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर वाढवून देण्यात येत आहे. फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेपासून सकाळ सत्रात स. ११.०० वाजता तसेच दुपार सत्रात दु. ३.०० वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल व लेखनास प्रारंभ होईल. सकाळी ११.०० पूर्वी व दुपारी ३.०० पूर्वी कोणत्याही परिस्थितीत प्रश्नपत्रिकांचे वितरण होणार नाही 

परीक्षा दालनात ज्या कमाने परीक्षार्थ्यांना प्रश्नपत्रिकांचे वाटप होईल, त्याच कमाने परीक्षेचा कालावधी संपल्यानंतर लिखित उत्तरपत्रिका परीक्षार्थ्यांकडून गोळा करण्याच्या सूचना सर्व दालन पर्यवेक्षकांना संबंधित परिरक्षक व केंद्रसंचालक यांचेमार्फत देण्यात आलेल्या असून, पेपरच्या निर्धारीत वेळेनंतर शेवटी दहा मिनीटे वेळ विद्यार्थ्यांना वाढवून देण्यात यावा. परीक्षा कालावधीत द्यावयाचे घंटेचे सुधारीत नियोजन सोबत जोडण्यात आलेले असून, सदर बाब आपल्या कार्यकक्षेतील सर्व शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय तसेच सर्व परिरक्षक, केंद्र संचालक यांना लेखी परिपत्रकाव्दारे तातडीने निदर्शनास आणावी अशा सूचना बोर्डाने दिल्या आहेत .





Post a Comment

0 Comments