Subscribe Us

जिल्हांतर्गत बदली झालेल्या शिक्षकांना ३१ मे पर्यंत कार्यमुक्त करण्याचे आदेश

 जिल्हांतर्गत बदली झालेल्या शिक्षकांना ३१ मे पर्यंत कार्यमुक्त करण्याचे आदेश 

ग्रामविकास विभागाचे आदेश दिनांक 24 फेब्रुवारी 2023

 दिनांक ०७.०४.२०२१ रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाच्या जिल्हांतर्गत बदल्या ह्या संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन पध्दतीने करण्याची कार्यवाही सद्यस्थितीत सुरु असून बदली प्रणालीमध्ये टप्पा क्र. १,२,३, ४ व ५ मधील कार्यवाही पुर्ण झालेली आहे.

 “शासन निर्णय दिनांक ०७.०४.२०२१ मधील मुददा क्र.४.७ येथे बदलीने पदस्थापनेचे आदेश निर्गमित करताना त्यामध्ये कार्यमुक्तीचा दिनांक नमूद करण्यात यावा, असे नमूद आहे. परंतु प्रत्यक्षात कालावधी नमूद करण्यात आलेला नाही. यास्तव, असे स्पष्ट करण्यात येते की, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित विचारात घेता, जिल्हांतर्गत बदली झालेल्या शिक्षकांना दि.०१.०५.२०२३ ते दि. १५.०५.२०२३ पर्यंत कार्यमुक्तीचे प्रशासकीय आदेश निर्गमित करावेत व कोणत्याही परिस्थितीत दि. १६.०५.२०२३ ते दि.३१.०५.२०२३ या कालावधीत अशा शिक्षकांना प्रत्यक्ष कार्यमुक्त करण्याबाबतची कार्यवाही करावी.

(,सदर आदेशात दिनांक 27 फेब्रुवारी च्या शासननिर्णय नुसार बदल होऊ शकतो)


ग्रामविकास विभागाचे आदेश दिनांक 24 फेब्रुवारी 2023



Post a Comment

0 Comments