Subscribe Us

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT)-2022 ऑन-लाईन परीक्षेसाठी माहिती पुस्तिका



शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT)-2022 ऑन-लाईन परीक्षेसाठी माहिती पुस्तिका 

INFORMATION HANDOUT FOR ONLINE EXAMINATION FORT EACHER’S APTITUDE AND INTELLIGENCE TEST

माहिती पुस्तिका मराठी   CLICK HERE 

माहिती पुस्तिका इंग्रजी   CLICK HERE

उमेदवार देणार असलेल्या ऑन-लाईन परीक्षेच्या विविध पैलूंचा तपशील आणि संबंधित बाबीसंबंधात महत्वाच्या सूचना या पुस्तिकेत आहेत. परीक्षेची तयारी करण्यात मदत व्हावी म्हणून उमेदवारास या पुस्तिकेचे नीट अध्ययन करण्यास सुचविले जात आहे. खाली दर्शविल्याप्रमाणे ऑन-लाईन परीक्षेत वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या बहुपर्यायी प्रश्नावल्या असतील.


कृपया लक्षात घ्या: परीक्षेचे स्वरूप सर्वग्राही (Omnibus) असेल. प्रश्नपत्रिकेत कोणतेही विभाग / उपविभाग असणार नाहीत.

परीक्षेसाठी 120 मिनिटांचा अवधी आहे, तरीसुद्धा उमेदवारास परीक्षास्थानी साधारणतः 180 मिनिटे थांबावे लागेल ज्यामध्ये नोंद होणे (logging in), प्रवेशपत्र गोळा करणे, सूचना देणे इ. साठी लागणा-या कालावधीचासुद्धा समावेश आहे. भाषिक क्षमता (इंग्रजी) आणि भाषिक क्षमता (मराठी) व्यतिरिक्त सर्व प्रश्नावल्या, उमेदवाराने अर्ज भरतेवेळी निवडलेल्या द्विभाषी माध्यमात (मराठी- इंग्रजी किंवा उर्दू- इंग्रजी भाषेत) उपलब्ध असतील. दिलेल्या 120 मिनिटांच्या कालावधीत उमेदवार कोणताही प्रश्न सोडवू शकतात. सर्व प्रश्नांना बहुपर्याय असतील. प्रश्नासाठीच्या चार उत्तरांपैकी, फक्त एकच अचूक उत्तर असेल. उमेदवारास सर्वाधिक अचूक उत्तराची निवड करावयाची आहे आणि उमेदवारास वाटत असलेल्या योग्य / अचूक पर्यायावर 'माउस क्लिक करावयाचा आहे. उमेदवाराने क्लिक केलेला पर्याय ठळकपणे दर्शविला जाईल आणि त्यास उमेदवाराचे त्या प्रश्नाचे उत्तर म्हणून गणले जाईल. उमेद्वाराने दर्शविलेल्या चुकीच्या उत्तरासाठी नकारात्मक गुणांकन केले जाणार नाही. तथापि उमेद्वारांना सल्ला दिला जातो की त्यांनी अंदाज लावून उत्तर देणे टाळावे.

कृपया लक्षात घ्या की या पुस्तिकेत दिलेले प्रश्नांचे प्रकार हे उदाहरणादाखल आहेत आणि सर्वसमावेशक नाहीत. प्रत्यक्ष परीक्षेत तुम्हाला यापैकी काही किंवा सर्व प्रकारांचे अधिक काठीण्य पातळीचे प्रश्न आढळतील, शिवाय या ठिकाणी नमूद न केलेल्या इतर प्रकारांवरही प्रश्न आढळतील.


.

Post a Comment

0 Comments