Subscribe Us

जिल्हाअंतर्गत शिक्षक बदलीच्या शासन निर्णयामध्ये बदल करणे साठी द्यावाच्या सूचना हरकती



जिल्हाअंतर्गत  शिक्षक बदलीच्या शासन निर्णयामध्ये बदल करणे साठी द्यावाच्या सूचना हरकती 

शासनाने दिनांक १४ मार्च रोजी शासन निर्णय काढून जिल्हाअंतर्गत  शिक्षक बदलीच्या शासन निर्णयामध्ये बदल करणे साठी द्यावाच्या सूचना हरकती मागितल्या आहेत 

पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी यांनी  सर्व नागरिक, लोकप्रतिनिधी, शिक्षक संघटना, शिक्षक यांना ७ एप्रिल २०२१ च्या जिल्हाअंतर्गत  शिक्षक बदलीच्या शासन निर्णयामध्ये बदल सुचवायचे असल्यास खालील गुगल फॉर्म भरावे. कृपया प्रत्येक नवीन बदल सुचवताना नवीन फॉर्म भरावा. सदरील फॉर्म अंतिम दिनांक ३० मार्च २०२३ पर्यंत भरावा. 

1. खालील फॉर्म हा  जिल्हाअंतर्गत  शिक्षक बदलीसाठी आहे. 

2. आंतर जिल्हा बदलीसाठी बदल सुचिवण्यासाठीचा फॉर्म २५ मार्च २०२३ रोजी बंद करण्यात आला आहे.
3. आपल्याला अपेक्षित प्रत्येक नवीन तरतुदीसाठी स्वतंत्र फॉर्म भरावा.

4. सदरील फॉर्म अंतिम दिनांक ३० मार्च २०२३ पर्यंत भरावा.

गुगल फॉर्म लिंक - CLICK HERE 

बदली अभ्यासगट शासन निर्णय - CLICK HERE

फॉर्म मधील मह्त्त्वाचे मुद्दे  खालील माहिती अगोदर तयार करून ठेवावी 

नमुना दाखल भरलेला फॉर्म 

आपले नाव/ Name

-------------------------

 जिल्हा / District 

------------------------

 

मोबाईल नंबर / Mobile No

-------------------------

 

पद/ Designation

----------------------

 

संघटनेचे नाव / name of the Organization

 

------------------------------

 

संघटना स्तर

----------------------

 

आपण बदल सुचवू इच्छिणाऱ्या तरतुदीचा ७ एप्रिल २०२१ च्या  शासन निर्णयामधील पृष्ठ क्र./  Page no of provision, you want to suggest the change in G.R. dated 7 April 2021

Page 1 to 9

आपण बदल सुचवू इच्छिणाऱ्या तरतुदीचा ७ एप्रिल २०२१ च्या  शासन निर्णयामधील तरतूद क्र./ Provision No, which you wish to suggest the change  in G.R. dated 7 April 2021

1.10 , 2.1 ,3 ,4

७ एप्रिल २०२१ च्या  शासन निर्णयामधील तरतुदीचा मजकूर
(
जी. आर. मधून कॉपी करावा/ टायपिंग करावे) /  The text of the provision contained in G.R. (To be copied/ type from G.R.)

व्याख्या, शिक्षकांची जिल्हांतर्गत माहिती प्रसिद्ध करणे ,४ बदली प्रक्रिया कार्यपद्धती

 

वरील तरतुदीमध्ये आपणास अपेक्षित असलेला बदल / 
The change you expect

शिक्षकांच्या बदल्या ह्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार विशेष परिस्थितीच करण्यात याव्यात . बदल्या ह्या तालुका स्तरवर फक्त विनंती बदल्या करण्यात याव्या नवीन भरती व पदोन्नतीने अवघड क्षेत्रातील जागा भरण्यात याव्यात व शिक्षकांना बदली या विषयातून स्थैर्य प्राप्त करून द्यावे .शिक्षकामध्ये सध्याच्या बदली धोरणामुळे निर्माण झालेले विशेष संवर्ग बंद करावेत अशी आपणास विनंती करण्यात येत आहे

०७/०४/ २०२१ च्या बदली धोरणात करावयाच्या सुधारणा .

१.  अवघड क्षेत्र -   शासन निर्णयातील व्याख्या बदलून अवघड क्षेत्र हे फक्त आदिवासी उपयोज़न अंतर्गत आदिवासी विभागाने घोषित केलेल्या व पेसा क्षेत्रातील गावे यांचा समावेश या अवघड क्षेत्रात करण्यात यावा . त्यामुळे मानवी हस्तक्षेप अवघड क्षेत्र ठरवताना होणार नाही .

२. शासन निर्णयात जिल्हास्तर व तालुका स्तर बदल्या असे दोन भाग समाविष्ट करून  -

 i ) पेसा व आदिवासी क्षेत्र असलेल्या जिल्ह्यात अवघड क्षेत्रातून सर्वसाधारण क्षेत्रात विनंती बदल्या व प्रशासकीय बदल्या करण्यात याव्यात .

  ii )  पेसा व आदिवासी क्षेत्र नसलेल्या जिल्ह्यात  एका तालुक्यामधून  दुसऱ्या तालुक्यात फक्त विनंती बदल्या करण्यात याव्यात.

iii )  तालुकास्तर बदल्या समाविष्ट करून  तालुक्यातील तालुक्यात एका शाळेवरून दुसऱ्या शाळेवर बदल्या करण्यात याव्यात

सर्व संवर्ग रद्द करून ५३ वर्ष आतील सर्व शिक्षकांना अवघड क्षेतात कमीत कमी १ वर्ष व जास्तीत ३ वर्ष सेवा देणे बंधनकारक करावे

 

जिल्हा स्तर बदलीसाठी i )अवघड क्षेत्र व सर्वसाधारण क्षेत्र असलेल्या जिल्हयात कार्यरत असलेल्या शिक्षकांसाठी अवघड क्षेत्रनिहाय व सर्वसाधारण क्षेत्रनिहाय  यादी तयार करावी . यामध्ये अवघड क्षेत्र निहाय यादी करताना एकूण सेवेत अवघड क्षेत्रात केलेली एकूण सेवा , सर्वसाधारण क्षेत्रनिहाय  यादी करताना एकूण सेवेत सर्वसाधारण क्षेत्रात केलेली एकूण सेवा. ( यामुळे जे शिक्षक कधीच अवघड क्षेत्रांत गेले नाही त्यांना तेथे सेवा द्यावी लागेल.यासाठी TRANSFER पोर्टल वर शाळानिहाय एकूण  सेवेचा तपशील नोंदवण्याची सुविधा देण्यात यावी . )

ii ) सर्व जिल्हा सर्वसाधारण क्षेत्रात मोडत असल्यास (जेथे अवघड क्षेत्र नाही) त्या जिल्ह्यात तालुका बाहेर बदली करताना  कार्यरत असलेल्या तालुक्यातील सलग सेवाजेष्ठता . फक्त विनंती बदली करण्यात यावी

तालुका स्तर बदली साठी  एका शाळेवर ५ वर्ष झालेली सलग सेवा  धरण्यात यावी .

. जिल्हास्तर  व तालुका स्तर बदल्यांची टक्केवारी

जिल्हास्तर i )प्रशासकीय बदली साठी कार्यरत शिक्षकांच्या प्रत्येक संवर्गाच्या ५ % असावी .

ii ) विनंती बदलीसाठी कार्यरत शिक्षकांच्या प्रत्येक संवर्गाच्या ५ % असावी .

तालुकास्तर बदल्या मध्ये  विशेष संवर्ग १ व २  मधील शिक्षकास एकाच शाळेवर  ५ वर्ष झालेल्या सर्व  शिक्षकांना बदली करणे अनिवार्य करण्यात यावे. एका शाळेवर ५ वर्ष सेवा दिल्यानंतर बदली करणे बंधनकारक राहील . शिक्षकास विशेष संवर्ग १ व २ चा आधार घेऊन नकार देता येणार नाही .

 

आपण सुचिवलेल्या बदलाचा चांगला परिणाम /  A good result of the change you suggested 

राज्यात सन २०१८ पासून प्राथमिक शिक्षकांच्या बदल्याचे धोरण राबविण्यात येत आहे याबाबत अनेक शिक्षकांवर अन्याय झाल्याने न्यायलयीन प्रकरणे निर्माण होत आहेत  प्राथमिक शिक्षकांच्या कोणतेही टक्केवारीचे बंधन नसलेल्या बदल्या सध्या ऑनलाईन संगणीकृत ONLINE द्वारे सुरू असून यामध्ये विविध प्रकारचे शिक्षक संवर्ग तयार करण्यात आलेले आहेत . सध्या करण्यात येणाऱ्या  बदल्यांना कुठल्याही प्रकारची टक्केवारीचे बंधन नाही.  सदरची ऑनलाईन बदली प्रक्रिया (अर्ज भरणे व बदली होणे) वर्षभर सुरू राहत असून जे शिक्षक बदली पात्र आहेत त्यांची शाळेवर शिकवण्याची कोणत्याही प्रकारची मानसिक अवस्था राहत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जा व गुणवत्तेवर परिणाम होत आहे त्याचप्रमाणे शिक्षक संवर्गामध्ये विविध प्रकारचे विशेष  संवर्ग निर्माण करण्यात आलेले असल्यामुळे शिक्षकांमध्ये आपसी द्वेष गटतट  मतभेद शाळांमध्ये दिसून येत आहे या सर्वांचा परिणाम शाळा व विद्यार्थ्याच्या गुणवत्तेवर होत आहे 

 

राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे शासनाने स्वीकारले असून सदर शैक्षणिक धोरणामध्ये मुद्दा क्रमांक 5 शिक्षक - शिक्षक भरती आणि नियुक्ती मधील मुद्दा ५.३ शिक्षकांच्या वांरवार होणाऱ्या त्रासदायक बदल्यांची पद्धत बंद करण्यात येईल, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांचे आदर्श शिक्षक आणि शैक्षणिक वातावरण यामध्ये सातत्य मिळेल. राज्ये / केंद्रशासित प्रदेशातील शासनाद्वारे योग्यपणे घालून दिलेल्या संरचित पद्धतीनुसार अगदी विशेष परिस्थितीत बदल्या होतील. शिवाय, पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी बदली एका ऑनलाईन संगणकीकृत प्रणाली द्वारे करण्यात येईल असा स्पष्ट उल्लेख आहे

सदरचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे शासनाने स्वीकारले असल्याचे समजते त्यानुसार सदरची परिस्थिती लक्षात घेऊन आपणास विनंती की शिक्षकांच्या बदल्या ह्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार विशेष परिस्थितीच करण्यात याव्यात . बदल्या ह्या फक्त विनंती बदल्या करण्यात याव्या नवीन भरती व पदोन्नतीने अवघड क्षेत्रातील जागा भरण्यात याव्यात व शिक्षकांना बदली या विषयातून स्थैर्य प्राप्त करून द्यावे .शिक्षकामध्ये सध्याच्या बदली धोरणामुळे निर्माण झालेले विशेष संवर्ग बंद करावेत अशी आपणास विनंती करण्यात येत आहे


Post a Comment

1 Comments

Pranita said…




This is a best website for every user Thank you sir for your great content.I am also writer could you please check my blog and suggest me sir.your are my Guru!
मराठी पाढे ,मराठी पाढे २ ते ३० PDF ,
हिंदी बाराखडी मराठी बाराखडी