Subscribe Us

शिक्षकांच्या सेवाजेष्ठता बाबत शासनाची महत्त्वाची अधिसूचना दिनांक २५ मार्च २०२३

शिक्षकांच्या सेवाजेष्ठता बाबत शासनाची महत्त्वाची अधिसूचना  दिनांक २५ मार्च २०२३  १९८१ मधील अनुसूची फ मध्ये महत्त्वाचा बदल 

अधिसूचना पहा   CLICK HERE


 महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन अधिनियम, १९७७ - ( १९७८ चा महा. ३) याच्या कलम १६ ची पोट-कलमे (१) व (२) यांद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ मध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करीत आहे. हे नियम उक्त अधिनियमाच्या कलम १६ च्या पोट- कलम (३) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्वी प्रसिद्ध करण्यात आले आहेत :-

१. या नियमांस, महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) (सुधारणा) नियम, २०२३ असे म्हणावे.

२. महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ मधील अनुसूची फ च्या परिच्छेद 

" प्रवर्ग " क - पुढील अर्हता धारण करणारे:- -

(एक) प्रवर्ग "क " ऐवजी पुढीलप्रमाणे दाखल करण्यात येईल :- 

सामाजिक शास्त्र / मानव्य शास्त्र/विज्ञान/गणित/भाषा (५० % गुणांसह ) विषयातील पदव्युत्तर पदवी आणि एम.एड. (५०% गुणांसह ) / एम.ए. (शिक्षणशास्त्र) (५०% गुणांसह) (राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदद्वारे वेळोवेळी केल्या जाणाऱ्या बदलांसह) किंवा एम. ए. एम. एस्सी. / एम. कॉम., बी.टी./बी. एड., किंवा तत्सम ; किंवा बी.ए./बी.एस्सी. / बी. कॉम., बी. टी./बी. एड., किंवा तत्सम किंवा बी.ए./बी.एससी./बी. कॉम., डिप. टी. (दोन वर्षांचा जुना पाठ्यक्रम), डी. एड. (दोन वर्षांचा जुना पाठ्यक्रम); किंवा बी.ए./बी.एससी. / बी. कॉम., एस. टी. सी. /डिप. एड. /डिप. टी. (एक वर्षाचा पाठ्यक्रम ) इत्यादी झाल्यानंतर व १० वर्षांच्या सेवेनंतर : किंवा  बी. ए. किंवा समकक्ष या सोबत पाच वर्षांच्या अनुभवानंतर वरिष्ठ हिंदी शिक्षक सनद किंवा दहा वर्षांच्या अनुभवानंतर कनिष्ठ हिंदी शिक्षक सनद किंवा क्रीडा शिक्षकांसाठी २५० विद्यार्थ्यांसाठी एक शारीरिक शिक्षक व शारीरिक शिक्षण या विषयाचा किमान ५० टक्के कार्यभार या अटींची पूर्तता होत असलेल्या प्रकरणी बी. ए. बी. एस. सी./बी. कॉम., एच. डी. एड./ बी. पी. एड./बी.एड. (शारीरिक शिक्षण) किंवा कला शिक्षकांसाठी :- बी. ए./बी. एस. सी. / बी. कॉम./बी. एफ. ए./जी. डी. आर्ट पदविका ए. एम. प्रमाणपत्रासह / ए. एम. डिप्लोमा / डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन; किंवा बी.ए./बी.एस्.सी./बी.कॉम./बी.एफ.ए./जी. डी. आर्ट पदविका, डी.टी.सी./डी.एम./ए.टी.डी. इत्यादी झाल्यानंतर १० वर्षांच्या सेवेनंतर.";

(दोन) टीप (१) च्या ऐवजी पुढीलप्रमाणे दाखल करण्यात येईल :-

'टीप (१-अ ) . - आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणाऱ्या शिक्षकांच्या नियुक्तीनंतर अशा शिक्षकांची  ज्येष्ठता यादी ही प्रवर्गानुसार ठेवण्यात येईल.

टीप (१-ब). - प्रवर्ग क, ड अथवा ई यामध्ये समावेश होण्यासाठी नियुक्तीच्या वेळी संबंधीत शिक्षकाने, त्या त्या प्रवर्गाकरिता प्रकरणपरत्वे (उच्च माध्यमिक किंवा माध्यमिक) प्रशिक्षित शिक्षकास आवश्यक असलेली अर्हता धारण करणे आवश्यक असेल. त्या प्रवर्गातील त्याची ज्येष्ठता संबंधीत प्रवर्गात समाविष्ट झाल्याच्या तारखेपासून विचारात घेण्यात येईल.

टीप (१-क). - प्रवर्ग फ, ग किंवा ह मध्ये समाविष्ट असलेल्या एखाद्या शिक्षकाने सेवेत असताना प्रकरणपरत्वे प्रवर्ग क, ड किंवा ई प्रवर्गात अंतर्भूत असलेल्या प्रशिक्षित शिक्षकांसाठीची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण केली किंवा त्यात सुधारणा केल्यास संबंधीत शिक्षकाचा समावेश त्याच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेनुसार प्रशिक्षित शिक्षकांसाठी असलेल्या संबंधीत प्रवर्गात करण्यात येईल. तथापि, त्या शिक्षकाची संबंधीत प्रवर्गातील सेवाज्येष्ठता ही त्याच्या नियुक्ती दिनांकास विचारात न घेता त्याने आवश्यक अर्हता धारण केल्याच्या दिनांकापासून विचारात घेण्यात येईल व संबंधीत प्रवर्गात पूर्वीपासून कार्यरत असलेल्या शिक्षकांनतर त्याचा ज्येष्ठताक्रम निश्चित करण्यात येईल.

टीप (१-ड).- एखाद्या प्राथमिक गटातील (इयत्ता १ ली ते ५ वी) शिक्षकाने उच्च शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण केली किंवा त्यात सुधारणा केली असेल, तथापि माध्यमिक अथवा उच्च माध्यमिक गटासाठी त्याची नियुक्ती करण्यात आली नसल्यास, अशा प्रकरणी संबंधीत शिक्षक, माध्यमिक अथवा उच्च माध्यमिक सेवाज्येष्ठतेच्या सूची मध्ये ज्येष्ठतेचा दावा करू शकणार नाही. त्याच्या उच्च शैक्षणिक पात्रतेस केवळ अतिरिक्त पात्रता मानले जाईल.

(अनुसूची फ मध्ये सेवा जेष्ठता बाबत बदलामुळे आता शैक्षणिक पात्रता ज्या दिनांक ला असेल तेव्हापासून त्या त्या प्रवर्गात समावेश होईल आणि शैक्षणिक पात्रता धारण केल्यापासूनची सेवाज्येष्ठता मिळेल मूळ नियुक्ती दिनांक चा विचार होणार नाही , तसेच प्राथमिक गटातील (इयत्ता १ ली ते ५ वी) शिक्षकाने उच्च शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण केली किंवा त्यात सुधारणा केली तरी त्याला त्याचा लाभ मिळणार नाही)

Post a Comment

2 Comments

Pranita said…




This is a best website for every user Thank you sir for your great content.I am also writer could you please check my blog and suggest me sir.your are my Guru!
मराठी पाढे ,मराठी पाढे २ ते ३० PDF ,
हिंदी बाराखडी मराठी बाराखडी


Ravikant Joshi said…
या परिपत्रकानुसार शैक्षणिक पात्रता म्हणजे त्याने फक्त B.A. केले त्या तारखेपासून की त्याने B Ed केले त्या तारखेपासून त्याची सेवाज्येष्ठता मान्य करावी?