बुलडाणा जिल्हा परिषदची अवघड क्षेत्र बदलीसाठी रिक्त पदे व शिक्षकांची संभाव्य सेवाजेष्ठता यादी प्रसिद्ध
संभाव्य रिक्त पदाची यादी CLICK HERE
बुलडाणा जिल्हा परिषद मध्ये अवघड क्षेत्रात सहाय्यक शिक्षक 19 पदे ,मुख्याध्यापक 1 पद ,भाषा 1पद, गणित विज्ञान 2 पदे सामाजिक शास्त्र 1पद रिक्त आहे सेवाजेष्ठता यादीतील इतक्याच शिक्षकांना या क्षेत्रात बदली देण्यात येणार आहे
शिक्षकांची संभाव्य सेवाजेष्ठता यादी पहा CLICK HERE
(सदर यादीत विशेष संवर्ग 1 मधील शिक्षकांनी नकार दिल्यावर त्यांची नावे वगळण्यात येणार आहेत)
जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सन 2022 करिता टप्पा क्र. 6 (विस्थापित शिक्षकांच्या बदल्या) पूर्ण झाल्यानंतर अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यापूर्वी विशेष संवर्ग 1 मधील शिक्षकांना बदलीतून सूट हवी किंवा नको याबाबतचा योग्य तो पर्याय निवडणेकरिता सुविधा उपलब्ध करून दिलेबाबत...
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्याबाबतचे सुधारित धोरण शासन निर्णयामध्ये विहित करणेत आलेले आहे. सदरच्या शासन निर्णयामध्ये अवघड क्षेत्रातील पदे भरावयाची कार्यपद्धती नमूद केलेली आहे. सध्या बदलीचे 1 ते 6 टप्पे पूर्ण झाले असून जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील शाळांमधील रिक्त पदे भरणे आवश्यक असल्यामुळे शासन निर्णयामध्ये नमूद असल्याप्रमाणे ज्या शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रात 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत अशा शिक्षकांना विद्यमान शाळेतील 5 वर्षे सेवेची अट लागू राहणार नाही
संवर्ग 1 मधील काही शिक्षकांनी अनावधानाने बदलीतून सुट मिळणेबाबतचा पर्याय न स्विकारल्यामुळे असे शिक्षक व ज्या शिक्षकांची सेवा विद्यमान शाळेत ३ वर्षापेक्षा कमी झालेली आहे अशा शिक्षकांना बदलीतून सुट मिळणेबाबतची संधी यापूर्वी दिलेली नव्हती. त्यामुळे ज्या शिक्षकांची सेवा सर्वसाधारण क्षेत्रात 10 वर्षे किंवा 10 वर्षापेक्षा जास्त झालेली आहे अशा सर्व शिक्षकांची यादी वरिष्ठ स्तरावरून प्राप्त झालेली असून सदरची यादी सर्व शिक्षकांच्या माहितीसाठी आज दि. 06/03/2023 रोजी जिल्हा स्तरावरून ऑनलाईन/ऑफलाईन प्रसिद्ध करण्यात येत आहे.
या यादीतील जे शिक्षक दि. ३० जून २०२२ पर्यंत विशेष संवर्ग 1 ची पात्रता धारण करीत असतील अशा सर्व शिक्षकांना दि.06/03/2023 ते 08/03/2023 या कालावधीत बदलीतून सूट हवी किंवा नको याबाबतचा योग्य तो पर्याय निवडण्यासाठी पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे आज दि. 06/03/2023 ते 08/03/2023 या कालावधीमध्ये आपले गटाकडील विशेष संवर्ग १ ची पात्रता धारण करीत असणा-या शिक्षकांना आपले स्वतःचे लॉगईन करून बदलीतून सूट हवी किंवा नको याबाबतचा योग्य तो पर्याय निवडणेबाबत सूचित करावे.. तसेच दि. 08/03/2023 नंतर बदलीतून सूट हवी किंवा नको याबाबतचा पर्याय निवडणेकरीता मुदतवाढ दिली जाणार नाही.
संवर्ग एकच्या शिक्षकांनी मोबाईल वरून नकार कसा नोंदवावा? CLICK HERE
ग्रामविकास विभागाचे पत्र वाचा CLICK HERE
ज्या शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रात 10 वर्ष झाले परंतु शाळेवर 5 वर्ष झाले नाहीत अशा शिक्षकांना येत असलेल्या स्वीकारा मेसेज बाबत स्पष्टीकरण* CLICK HERE
अवघड क्षेत्रातील रिक्त राहिलेल्या जागा भरण्यासाठीच्या राऊंड संदर्भात स्पष्टीकरण कोणाचा समावेश होणार?
विशेष संवर्ग 1 मधील शिक्षकांना अवघड क्षेत्रात बदलीपासून सूट मिळवण्यासाठी नकाराची पुन्हा संधी उपलब्ध
बुलडाणा जिल्हा यादी पहा
0 Comments