Subscribe Us

सन २०२२-२३ च्या संच मान्यता व वेतन देयके आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येच्या आधारे करण्याचे आदेश

स२०२२-२३ सन २०२२-२३ च्या संच मान्यता व वेतन देयके आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येच्या आधारे करण्याचे आदेश

पात्र शाळांतील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दि.३१.०३.२०२३ पूर्वी वेतन अदा करणे आवश्यक आहे. सन २०२२-२३ च्या संच मान्यता “आधार प्रमाणित विद्यार्थी” संख्येच्या आधारे करण्यात येत असून सद्यस्थितीत आधार वैध (Valid) असलेले विद्यार्थी विचारात घेऊन ऑनलाईन अंतरिम संच मान्यता करावी. त्यानुसार अंतरिम संचमान्यतेत मंजूर होणाऱ्या पदांना दि. ३१.०३.२०२३ पर्यंत वेतन अदा करण्याची कार्यवाही करावी.

तसेच, दि. २३.०३.२०२३ ते ३०.०४.२०२३ पर्यंत आधार वेध (Valid) होणारे विद्यार्थी विचारात घेऊन सन २०२२-२३ ची सुधारित व अंतिम संच मान्यता करावी. त्यानुसार अंतिम संच मान्यतेमध्ये मंजूर झालेल्या पदांना तद्नंतर ऑनलाईन प्रणालीमधून जानेवारी २०२३ पासूनचे वेतन अदा करण्यात यावे.

, शासन निर्णय दि.०६.०२.२०२३ च्या अनुषंगाने पात्र शाळांतील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता देणाऱ्या अधिकाऱ्यांना म्हणजेच प्राथमिक शाळांतील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक), माध्यमिक शाळांतील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्याबाबतीत संबंधित शिक्षणाधिकारी (माध्यमिक) / शिक्षण निरीक्षक आणि उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी दि.३१.०३.२०२३ पर्यंत शालार्थ प्रणालीत नाव समाविष्ट करण्याची कार्यवाही करावी.

सक्षम प्राधिकारी म्हणून शिक्षण निरीक्षक / शिक्षणाधिकारी प्राथमिक/ माध्यमिक व उपसंचालक यांनी सदर मान्य शालार्थ प्रकरणांची Online नोंद शालार्थ आदेश प्राप्त दिनांकास अनुक्रमे संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक आणि विभागीय अध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी त्यांच्या लॉगीन मधून त्वरीत शालार्थ ID जनरेट करावा अश्या सुचना आदेश देण्यात आले आहे

Student portal update

1.स्टुडन्ट पोर्टल कालपासून कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यामध्ये लॉगिन करताना अडचणी येत होत्या त्या अडचणी आता दूर झालेल्या आहेत.

2. मुख्याध्यापक यांच्या स्टुडन्ट पोर्टल या लॉगिन वर Report मेनू मध्ये Report >>  Status >> Aadhaar Status  या सब मेनू मध्ये शाळेतील विद्यार्थ्यांच्या आधारविषयक विविध प्रकार प्रकारची संख्यात्मक खालील माहिती उपलब्ध करून  देण्यात आलेली आहे

   1) Validated Students by UIDAI – असे विद्यार्थी जे कि UIDAI (भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण) कडे पडताळणीसाठी पाठविल्यानंतर वैध (Valid) आढळून आलेली विद्यार्थी होय.

  2) Invalid Students by UIDAI - असे विद्यार्थी जे कि UIDAI (भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण) कडे पडताळणीसाठी पाठविल्यानंतर अवैध (Invalid) आढळून आलेली विद्यार्थी होय.

  3) Unprocessed Students - असे विद्यार्थी जे कि UIDAI (भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण) कडे पडताळणीसाठी पाठविण्यात आलेले नाहीत असे विद्यार्थी होय.

  4) Aadhaar available Students - असे विद्यार्थी जे कि ज्यांच्या आधार कार्डची माहिती शाळेने Student Portal मध्ये नोंद केलेली आहे असे विद्यार्थी होय.

  5) Aadhaar not available Students - असे विद्यार्थी जे कि ज्यांच्या आधार कार्डची माहिती शाळेकडे उपलब्ध नाही अथवा शाळेने Student Portal मध्ये नोंद केलेली नाही असे विद्यार्थी होय.

  6) Total Students – शाळेतील चालू शैक्षणिक वर्षामध्ये शिकत असलेले विद्यार्थी होय.

  7) U-DISE Code खाली नमूद संख्येवर क्लिक केल्यानंतर इयत्ता निहाय विद्यार्थी माहिती दिसेल.

Post a Comment

0 Comments