Subscribe Us

महाज्योति मार्फत MHT-CET-JEE-NEET 2025 करीता पुर्व प्रशिक्षण योजनाकरीता अर्ज सुरु APPLICATION FORM FOR JEE-NEET-MHT-CET TRAINING 2024-25

 महाज्योति मार्फत MHT-CET-JEE-NEET 2025 करीता पुर्व प्रशिक्षण  योजनाकरीता अर्ज सुरु 

विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB/Day इंटरनेट डाटा मिळणार ...

महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती- विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून MHT-CET/JEE/NEET 2025 करीता पुर्व प्रशिक्षण या योजने अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहे.

 महाज्योती मार्फत MHT-CET / JEE / NEET परिक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB/Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येते.

त्यासाठी संबंधितांनी      https://mahajyoti.org.in/   या संकेतस्थळावरील सूचनाफलक नोटीस बोर्ड मध्ये उपलब्ध     संकेतस्थळावर अर्जाचा नमुना व तपशीलवार माहिती उपलब्ध आहेत

ADVERTISEMENT  CLICK HERE 

APPLICATION FORM FOR JEE/NEET/MHT-CET TRAINING 2024-25 CLICK HERE 

तपशील  CLICK HERE 






























अ. योजनेच्या लाभासाठी पात्रता:

1. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा/ असावी. 

2. उमेदवार हा इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा/ असावी.

3. उमेदवार हा नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा/ असावी

 4. जे विद्यार्थी सन 2023 मध्ये 10 वी ची परिक्षा देत आहेत ते विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असून त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करतांना 10 वी चे प्रवेश पत्र व 9 वी ची गुणपत्रिका जोडावी. 5. विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेणारा असावा. ज्या बाबतची कागदपत्रे त्याने भविष्यात सुचनांनूसार अपलोड करणे आवश्यक आहे.

ब. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

1. 9 वी ची गुणपत्रिका

2. 10 वी परिक्षेचे ओळखपत्र

3. आधार कार्ड

4. रहिवासी दाखला

5. जातीचे प्रमाणपत्र 6. वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र

क. अर्ज कसा करावा.

1. महाज्योतीच्या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील "Application for MHT CET / JEE / NEET 2025 Training" यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा. 

2. अर्जासोबत 'ब' मध्ये नमूद कागदपत्रे स्वाक्षांकीत करुन स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून अपलोड करावे.

ड. अटी व शती:

1. अर्ज करण्याचा अंतिम दि.31/03/2023 आहे. 

2. पोस्टाने किंवा ई-मेल व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.

3. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्विकारणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांचे राहतील.

4. अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या Call Centre वर संर्पक करावा संर्पक क्र. 0712-2870120/21 :E-mail Id mahajyotijeeneet24@gmail.com 5. 10 वी चा निकाल लागल्यावर विद्यार्थ्याकडून 10 वी ची गुणपत्रिका, विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला (बोनाफाईट सर्टिफिकेट) व MHT-CET/JEE / NEET या परिक्षेची तयारी करत आहोत असे हमीपत्र मागविण्यात येतील.

Post a Comment

0 Comments