Subscribe Us

राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षणा (SLAS) चे आयोजन आता दिनांक २४ मार्च २०२३ रोजी

राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षणा (SLAS) चे आयोजन आता दिनांक २४ मार्च २०२३ रोजी 


राज्यातील इयत्ता तिसरी, पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षणा (SLAS) चे आयोजन दिनांक १७ मार्च २०२३ रोजी करण्याबाबत कळविण्यात आलेले होते.  मात्र जुन्या पेन्शन योजनेबाबत शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप दिनांक २० मार्च २०२३ रोजी मिटलेला आहे. तरी राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षणा (SLAS) चे आयोजन दिनांक २४ मार्च २०२३ रोजी करण्यात यावे.

सर्वेक्षण पूर्वतयारी म्हणून दिनांक २३ मार्च २०२३ रोजी क्षेत्रीय अन्वेषक यांच्या ताब्यात सर्वेक्षण साहित्य द्यावे. दिनांक २४ मार्च २०२३ रोजी प्रत्यक्ष सर्वेक्षण करणेबाबत सूचना द्याव्यात. सर्वेक्षणाच्या दिवशी अथवा दुसऱ्या दिवशी तालुकास्तरावर सर्वेक्षण साहित्य संकलन करण्यात यावे. जिल्हास्तरावर दिनांक २६ मार्च २०२३ रोजी सर्वेक्षण साहित्य संकलन करण्यात यावे. दिनांक २७ किंवा २८ मार्च २०२३ रोजी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे येथे जिल्हा समन्वयक यांचेमार्फत इयत्तानिहाय व शाळानिहाय वापरण्यात आलेल्या OMR शीटची पाकिटे जमा करणेबाबत अवगत करण्यात यावे. SLAS प्रश्नपत्रिका व न वापरलेल्या OMR शीट DIET स्तरावर जपून ठेवाव्यात. इयत्तानिहाय व शाळानिहाय वापरण्यात आलेल्या OMR शीटची पाकिटे आणण्याचा वाहतूक खर्च व जिल्हा समन्वयक यांचा राज्यस्तरावर साहित्य पोहोच करण्यासाठीचा T. A. D. A. हा कार्यालयीन खर्चातून काढण्यात यावा.

 दिनांक २४ मार्च २०२३ रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षण (SLAS) बाबत जिल्हा समन्वयक, तालुका समन्वयक, क्षेत्रीय अन्वेषक, संबधित शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांना याबाबत सूचित करण्यात यावे. आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वेक्षणाची यशस्वीरित्या अंमलबजावणी होईल यादृष्टीने प्रयत्न करण्यात यावे. सर्वेक्षण पूर्ण होताच जिल्हा समन्वयक यांचेमार्फत दिनांक २८ मार्च २०२३ रोजी विहित नमुन्यातील मूळ उपयोगिता प्रमाणपत्र व खर्च अहवाल परिषदेस विनाविलंब सादर करण्यात यावे. असे आदेश देण्यात आले आहे 

विद्यार्थी शिक्षक सूचना व प्रश्नावली ,नमुना प्रश्नपत्रिका OMR  SHEET 

प्रश्नपेढी -Question Bank  CLICK HERE


दिनांक २४ मार्च २०२३ रोजी चे आदेश  CLICK HERE 

Post a Comment

0 Comments