जिल्हांतर्गत बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश
सन २०२२ मधील जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेतील ज्या न्यायालयीन प्रकरणांमध्ये याचिकाकर्त्यांची बदली करण्यात येवू नये किंवा याचिकाकर्त्यांच्या बदलीस स्थगिती देण्याबाबत मा. न्यायालयाचे निर्देश आहेत, असे शिक्षक वगळता अन्य शिक्षकांना शासनाने संदर्भ क्र. २ येथील दि. २४.०२.२०२३ च्या पत्रान्वये दिलेल्या निर्देशानुसार कार्यमुक्त करण्याची कार्यवाही तातडीने करण्यात यावी. असे आदेश ग्राम विकास विभागाने 4 मे 2023 रोजी दिले आहेत
24 फेब्रुवारी 2023 चे ग्रामविकास विभागाचे पत्र
“शासन निर्णय दिनांक ०७.०४.२०२१ मधील मुददा क्र.४.७ येथे बदलीने पदस्थापनेचे आदेश निर्गमित करताना त्यामध्ये कार्यमुक्तीचा दिनांक नमूद करण्यात यावा, असे नमूद आहे. परंतु प्रत्यक्षात कालावधी नमूद करण्यात आलेला नाही. यास्तव, असे स्पष्ट करण्यात येते की, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित विचारात घेता, जिल्हांतर्गत बदली झालेल्या शिक्षकांना दि.०९.०५.२०२३ ते दि. १५.०५.२०२३ पर्यंत कार्यमुक्तीचे प्रशासकीय आदेश निर्गमित करावेत व कोणत्याही परिस्थितीत दि. १६.०५.२०२३ ते दि.३१.०५.२०२३ या कालावधीत अशा शिक्षकांना प्रत्यक्ष कार्यमुक्त करण्याबाबतची कार्यवाही करावी.
A
असे
0 Comments