Subscribe Us

विद्यार्थी शालेय गणवेश खरेदी शाळा व्यवस्थापन समिती करणार

 विद्यार्थी शालेय गणवेश खरेदी शाळा व्यवस्थापन समिती  करणार  


समग्र शिक्षा अंतर्गत सन २०२३ २४ या शैक्षणिक वर्षामध्ये, लाभार्थी विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समितीस्तरावरुन शालेय गणवेश उपलब्ध करुन देण्यात येणार आहे 

प्रकल्प संचालक यांचे पत्र  CLICK HERE

मा प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई , यांच्या दिनांक 28 मे 2023 च्या पत्रानुसार  समग्र शिक्षा अंतर्गत वार्षिक कार्ययोजना व अंदापत्रक सन २०२३- २४ भारत सरकार यांचे प्रकल्प मान्यता मंडळाच्या (PAB) बैठकीत दि. २४ एप्रिल २०२३ रोजी समग्र शिक्षा अंतर्गत मोफत गणवेश योजना अंदाजपत्रक एकूण ३७.३८,१३१ लाभार्थ्याकरीता रु.२२४, २८,६९,०००/- लक्ष चा प्रस्तावास भारत सरकारकडून मंजूरी मिळाली आहे.


शासनाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार समग्र शिक्षा अंतर्गत मोफत गणवेश योजनेचा थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रक्रियेमधून कायम स्वरुपी वगळण्यात आला आहे. याकरिता सदर शासन निर्णयानुसार शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरुन कार्यवाही करण्यात यावी. याकरिता प्रति लाभार्थी दोन गणवेश संचाकरिता मंजूर तरतूद रु. ६००/- याप्रमाणे तरतूद मंजूर आहे. तथापि, शासनाने संदर्भ क्र. १ नुसार निर्गमित केलेल्या सूचना नुसार एक गणवेश याकरिता प्रति विद्यार्थी रु.३००/- प्रमाणे निधी या आदेशाद्वारे निर्गमित करण्यात येत आहे. शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरुन मागील शैक्षणिक वर्षाप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना एक गणवेश संच उपलब्ध करुन देण्यात यावा. जिल्हा परिषद / महानगरपालिकानिहाय भौतिक लक्ष व आर्थिक तरतूद कळविण्यात येत आहे. सदर तरतूदीच्या अधिन राहून कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य कार्यालयास सादर करण्यात यावा.


उर्वरित एका गणवेशाचा लाभ शासन निश्चित करेल त्याप्रमाणे या शैक्षणिक वर्षामध्ये देण्यात येणार आहे, याबाबत सर्व संबंधितांना शासनाच्या पुढील सूचना प्राप्त झाल्यानंतर तात्काळ कळविण्यात येईल.





Post a Comment

0 Comments