दुग्ध तंत्रज्ञान बी.टेक (डि. टी.) पदवी अभ्यासक्रम प्रवेश सुरू B.Tech. Dairy Technology admission starts
प्रवेश अधिसुचना - २०२३-२४
दुग्ध तंत्रज्ञान बी.टेक (डि. टी.) पदवी अभ्यासक्रम
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर मधील दुग्धतंत्रज्ञान [ B.Tech. (Dairy Technology)] पदवी अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक सत्र २०२३ - २४ च्या प्रवेशाकरीता ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर अभ्यासक्रमाची माहितीपुस्तिका व प्रवेश अर्ज www.mafsu.ac.in या संकेतस्थळावर दिनांक २१/०६/२०२३ पासून उपलब्ध राहतील.
शैक्षणिक पात्रता :
दुग्ध तंत्रज्ञान [बी. टेक (डी.टी.)] पदवी प्रवेशाकरीता उमेदवार १२ वी (१०+२) परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि इंग्रजी या विषयामध्ये एकत्रीतपणे अराखीव प्रवर्गाकरीता किमान ५०% गुण व राखीव प्रवर्गाकरीता किमान ४०% गुणासह उत्तीर्ण असणे आवश्यक असुन उमेदवाराने राज्य सामाईक प्रवेश परिक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेमार्फत घेण्यांत येणारी MHT-CET २०२१ ही सामाईक प्रवेश परीक्षा दिलेली असणे आवश्यक आहे.
प्रवेश अर्ज शुल्क :
प्रवेश अर्ज शुल्क अराखीव प्रवर्गाकरीता रु. १०००/- व राखीव प्रवर्गाकरीता रु ७००/- राहील. उमेदवाराने अर्जाचे शुल्क डेबिट कार्ड / क्रेडीट कार्ड / इंटरनेट बँकींग या द्वारे ऑनलाईन पध्दतीचा वापर करुनच भरावे.
अर्ज करण्याची कार्यपध्दती :
• उमेदवाराने ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
उमेदवाराने शैक्षणिक पात्रता, प्रवेशाची कार्यपध्दती, आरक्षण, प्रवेश फेरी, वेळापत्रक, इत्यादी करीता माहितीपुस्तीका काळजीपूर्वक वाचल्यानंतर अर्ज भरावा.
Online Application | ||||
|
Important Dates | ||||||
|
उमेदवाराला ऑनलाईन प्रवेश अर्ज विद्यापीठाच्या संकेतस्थळाद्वारे भरता येईल. ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख, प्रवेश शुल्क संबधीची माहिती व अर्ज सादर करण्याबाबतची माहिती उमेदवारांना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीपुस्तीकेत देण्यात आलेली आहे.
प्रमाणपत्राचे एका पेक्षा जास्त पृष्ठ असल्यास (उदा. एकापेक्षा जास्त प्रयत्नात उत्तीर्ण झाल्यास २ गुणपत्रीका, नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र, इ.) त्याची एक PDF किंवा JPEG फाईल करुन अपलोड करावी.
आवश्यक त्या संपूर्ण माहिती व प्रमाणपत्रांसह ऑनलाईन भरलेला अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दिनांक ०५/०७/२०२३ आहे.
महत्वाच्या सुचना :
ऑनलाईन अर्ज भरतांना उमेदवारांनी अपलोड केलेले प्रमाणपत्र स्पष्ट दिसत असल्याची खात्री करावी.
उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्ज केले असल्यास, संपुर्ण माहितीसह नव्याने सादर केलेला अर्ज गुणवत्ता यादी साठी ग्राहय धरला जाईल.
प्रमाणपत्रांच्या त्रृटीचे फेर सादरीकरण उमेदवारांनी चुकीचे किंवा अपूर्ण दस्तावेज अपलोड - केलेले असल्यास अशा उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिध्द केली जाईल. या उमेदवारांना विद्यापीठाने निर्दिष्ट केलेल्या विहित तारखेच्या आत केवळ सूचित कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक राहील. तथापि, सदर कागदपत्रांची जारी करण्याची तारीख अर्ज दाखल करण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असणे आवश्यक आहे.
ऑनलाईन अर्जात त्रृटीची पूर्तता करण्याच्या हेतुने दिलेल्या दिनांकानंतर कोणतेही अतिरीक्त प्रमाणपत्र स्विकारण्यात येणार नाही.
अर्ज करण्यास काही मदत आवश्यक असल्यास संबधीत महाविद्यालयात कार्यालयीन वेळे दरम्यान दुरध्वनी क्रमांक - दुग्धतंत्रज्ञान महाविद्यालय, वरुड (पुसद) ९४२२१६५५२७/ - ९४२३६३८७३३ किंवा दुग्धतंत्रज्ञान महाविद्यालय, उदगीर - ९४२०७०८६५८ ८४६९३६७१०१ वर संपर्क करावा. किंवा
दिनांक : २१/०६/२०२३
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ
नागपूर
0 Comments