बालभारती मार्फत शिक्षकांसाठी उद्बोधन सत्र
वहीचे पृष्ठे असलेल्या पुस्तकाचा वापर कसा करावा ?
दिनांक 14 जून 2023
वेळ सकाळी 11 वाजता
Youtube link Click Here
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीने इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय वर्ष २०२३- २४ साठी एकात्मिक पाठ्यपुस्तके चार भागांमध्ये उपलब्ध करून दिली आहेत. ही पुस्तके यावर्षी मराठी, इंग्रजी, हिंदी व उर्दू या चार माध्यमांसाठी पथदर्शी प्रकल्पांतर्गत लागू करण्यात आली आहेत. या पाठ्यपुस्तकांमध्ये विषयनिहाय पाठ, धडे व कविता इत्यादींच्या आवश्यकतेनुसार वहीची पृष्ठे समाविष्ट केलेली आहेत.
पाठ्यपुस्तकातील पृष्ठांचा वापर विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे करावा या संदर्भातील तज्ज्ञ मार्गदर्शकांचे उद्बोधन सत्र मंडळाने उपलब्ध करून दिले आहे. इयत्ता पहिली ते आठवीला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पाठ्यपुस्तक मंडळाचे संचालक श्री.कृष्णकुमार पाटील यांनी केले आहे.
0 Comments