Subscribe Us

विज्ञान पदवीधर शिक्षकांची शैक्षणिक अहर्ता पूर्ण न केलेल्या शिक्षकांची पदावनती करण्याचे sciene graduate teachers will be demoted if not qualified आदेश

 विज्ञान पदवीधर शिक्षकांची शैक्षणिक अहर्ता पूर्ण न केलेल्या शिक्षकांची पदावनती करण्याचे आदेश 



शासन निर्णय दिनांक 23 जून 2023

 विज्ञान विषय घेऊन इ. १२ वी उत्तीर्ण शिक्षकांना विज्ञान विषय समुहातील पदवीधर शिक्षक पदावर पदोन्नती दिल्यानंतर पदवी अर्हता धारण न केलेल्या शिक्षकांची पदस्थापना मूळ पदावर करणेबाबत

विज्ञान विषय समूहातील पदवीधर शिक्षकांची कमतरता विचारात घेऊन, विज्ञान विषय घेऊन इ. १२ वी ची परीक्षा उत्तीर्ण शिक्षकांना मान्यताप्राप्त मुक्त विद्यापीठाची पदवी प्राप्त करण्यास प्रवृत्त करावे. अशा शिक्षकांची पदस्थापना विज्ञान विषय समूहातील पदवीधर शिक्षकाच्या जागेवर करण्यात यावी आणि प्रत्यक्ष पदवी प्राप्त करेपर्यंत त्यांना पदवीधर वेतनश्रेणी देण्यात येऊ नये, अशी तरतूद 2016च्या शासन परिपत्रकान्वये करण्यात आली होती.   शिक्षकाची एका स्तरामधून दुसऱ्या स्तरामध्ये पदोन्नती करताना एनसीटीई ने निश्चित केलेली किमान अर्हता धारण करणे आवश्यक आहे. यामधील तरतुदीनुसार इ. ६ वी ते ८ वी वर्गाकरीता असलेली प्रशिक्षीत पदवीधर अर्हता तसेच सद्यस्थितीत विज्ञान शाखेतील पदवीधर उमेदवारांची उपलब्धता विचारात घेता, शासन परिपत्रक दि. १३.१०.२०१६ मधील अ. क्र. ६  तरतुद कालबाह्य ठरत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आलेले आहे. त्याअनुषंगाने खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात आल्या आहे 

शासन परिपत्रक-

शासन परिपत्रक दिनांक १३.१०.२०१६ मधील अ. क्र. ६ येथील तरतूद वगळण्यात येत असुन, सदर तरतुदीनुसार विज्ञान विषय घेऊन इ. १२ वी उत्तीर्ण असलेल्या शिक्षकांना विज्ञान विषय समुहातील पदवीधर शिक्षक पदावर पदोन्नती दिल्यानंतर सदर परिपत्रकाच्या दिनांकापर्यंत या शिक्षकांनी पदवी अर्हता धारण केली नसल्यास, अशा शिक्षकांची पदस्थापना मूळ पदावर करण्यात यावी.

आता 6 ते 8 चे विज्ञान शिक्षक बी एस्सी शैक्षणिक पात्रता पूर्ण करणे आवश्यक

12वी science या शैक्षणिक पात्रतेवर विज्ञान शिक्षक म्हणून नेमणूक झाली असेल व आता बी एस्सी. पूर्ण केली नसेल तर पदावनती करण्यात येईल 

शासन निर्णय  वाचा   CLICK HERE










Post a Comment

0 Comments