Subscribe Us

Senior and selection grade training वरिष्ठ श्रेणी निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण नवीन सूचना

  वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणी प्रशिक्षण २०२३-२४नवीन सूचना





*राज्यातील सर्व शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा*

*वरीष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण महत्त्वाचे*

ज्या प्रशिक्षणार्थी यांनी वरीष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण १००% पूर्ण केले आहे त्यांनी https://training.scertmaha.ac.in/Certificate2023/
या लिंक वर जाऊन आपले प्रशिक्षण पूर्ण करून घ्यावे.


1. प्रस्तुत प्रमाणपत्र एकदाच बदल करता येणार आहे. म्हणून सर्व माहिती व्यवस्थित वाचून भरा.

२.प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यापूर्वी आपले पूर्ण नाव, शाळेचे नाव, पत्ता व्यवस्थित भरल्याची खात्री करा.

३. आपल्यास हवा असलेला प्रशिक्षण गट व प्रकार योग्य असल्याची करा. *प्रशिक्षण प्रकार व गट चुकला असल्यास प्रमाणपत्र डाऊनलोड करू नका. 

४. या कार्यालयाशी संपर्क साधून योग्य बदल करून घ्या.

५. एकदा चुकलेले प्रमाणपत्र पुन्हा दुरुस्ती करून मिळणार नाही, याची नोंद घ्यावी.

६. प्रशिक्षण १००% पूर्ण करूनही डाऊनलोड साठी प्रमाणपत्र  उपलब्ध न होणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांनी गोंधळून जावू नये. त्यांना 2 आठवड्यात प्रमाणपत्र प्राप्त होईल.

अमोल येडगे, भा. प्र. से.
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे



वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण महत्वाचे

प्रशिक्षण सुरू करण्यासाठी आय. डी व पासवर्ड बाबत..
.*वरीष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण - महत्त्वाचे*

१. सर्व प्रशिक्षणार्थी यांना आयडी व पासवर्ड त्यांनी नोंदविलेल्या ईमेल वर पाठविण्यात आलेले आहेत. ज्यांना inbox मध्ये मिळाला नाही त्यांनी junk or spam folder चेक करावे. आयडी व पासवर्ड न मिळाल्यास 

*आयडी - आपला ईमेल*
*Pasward- Springboard@!23*
टाकून प्रशिक्षण सुरू करावे.

२. ज्यांनी पूर्वीच infosys springboard app download केले आहे त्यांनी आयडी व पासवर्ड ची वाट न बघता *forget password* अथवा Google बटण खाली उपलब्ध *Generate your password* द्वारे नवीन पासवर्ड तयार करून प्रशिक्षण सुरू करावे.

1निवड श्रेणी वरीष्ठ श्रेणी springboard.अँप मध्ये प्रोफाईल edit करा 
 3तुमची .प्रोफाइल edit करा.
4 interest  इंटेरेस्ट सिलेक्ट करा
5 वरच्या search bar मध्ये MR म्हणजे मराठी select करून "प्रशिक्षण" हा शब्द search करा
6तुम्हाला तुम्ही निवडलेला प्रशिक्षण प्रकार निवड श्रेणी ,वरीष्ठ श्रेणी प्रकार दिसेल 
7यानंतर तुमचं प्रशिक्षण तुम्ही सुरु करू शकता 

१. ज्या प्रशिक्षणार्थी यांनी अजून Infosys springboard app download केले नसेल त्यांना दिनांक १०/०७/२०२३ रोजी सकाळी १०.०० वाजेपासून आय डी व पासवर्ड आपल्या नोंदणी केलेल्या ईमेल वर तसेच मोबाईल वर टेक्स्ट मेसेज द्वारा प्राप्त होतील.

२. जे प्रशिक्षणार्थी मागील वर्षी(२०२१-२२) आपले प्रशिक्षण काही कारणास्तव पूर्ण करू शकले नाहीत परंतु या वर्षी पुन्हा नवीन नोंदणी केली आहे त्यांना आय डी व पासवर्ड नवीन प्राप्त होणार नाही. त्यांनी आपला पूर्वीचाच ईमेल आयडी व पासवर्ड वापरून प्रशिक्षण दिनांक १०/०७/२०२३ सकाळी ११.०० वाजेपासून सुरू करावे.

३. ज्या प्रशिक्षणार्थी यांनी यावर्षी (२०२३-२४) नोंदणी केली आहे परंतु दिनांक १०/०७/२०२३ रोजी आय डी व पासवर्ड मिळण्यापूर्वीच infosys springboard app download करून ठेवले आहे त्यांनाही आय डी व पासवर्ड नवीन प्राप्त होणार नाही. त्यांनी Infosys springboard app मध्ये आपला ईमेल व app sign in करते वेळी वापरलेला password वापरावा 

Infosys Springboard हे  प्रशिक्षण अँप click here वर टच करून मोबाईलवर अँप डाउनलोड करा CLICK HERE

प्रशिक्षणाचे सविस्तर मार्गदर्शन पत्र  CLICK HERE


नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थ्यास सदरचे ऑनलाइन प्रशिक्षण हे  https://infyspringboard.onwingspan.com/web/en/login  

या लिंकवर क्लिक करून सुरु करता येईल.  

महत्त्वाच्या मार्गदर्शक YoutubeVideo ची लिंक 

वरिष्ठ  व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण सुरूवात कशी करावीCLICK HERE

वरिष्ठ  व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण कसे पूर्ण करावे CLICK HERE

स्वाध्याय कसा सोडवावा CLICK HERE

वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण - चाचणी कशी सोडवावी?CLICK HERE

वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण - अभिप्राय कसा द्यावा?   CLICK HERE

 

वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण अधिकृत टेलिग्राम चॅनल


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या तर्फे राज्यातील शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य, अध्यापक विद्यालयातील अध्यापक, प्राचार्य यांच्या साठी वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड या प्रणालीवर सुरू करण्यात आले आहे.याबाबतच्या सूचना वेळोवळी ईमेल, पत्र व https://training.scertmaha.ac.in/ या वेबसाईटद्वारे  दिल्या जातात.

  सर्व प्रशिक्षणार्थी यांच्यापर्यंत तात्काळ पोहोचता यावे, सूचना जाव्यात यासाठी सदर प्रशिक्षणाचे अधिकृत टेलिग्राम चॅनल तयार करण्यातआले आहे 

 प्रशिक्षणार्थी आपल्या सोयीसाठी खालील टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकतात.

टेलिग्राम चॅनल JOIN होण्यासाठी खालील  टेलिग्रामच्या चिन्हाला टच करा .  https://t.me/scertmaha  ( टेलिग्राम APP आपल्या मोबाईल मध्ये नसल्यास  PLAYSTORE मधून डाऊनलोड  करा )








 Infosys springboard app माहिती व प्रशिक्षण कसे पूर्ण करावे 

महत्त्वाची सूचना -

10जुलै पासून सुरू होणाऱ्या प्रशिक्षणाचे सविस्तर मार्गदर्शन पत्र  CLICK HERE

प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व अध्यापक विद्यालय या चार गटातील पात्र शिक्षक/ मुख्याध्यापक/प्राध्यापक / प्राचार्य यांनी नोंदणी केलेली असून सद्यस्थितीमध्ये सदरच्या पात्र सर्व शिक्षक /मुख्याध्यापक /प्राध्यापक/प्राचार्य यांचे प्रशिक्षण हे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयामार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये एकाच टप्प्यामध्ये पूर्ण करू शकणार आहेत. सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करणेसाठी आवश्यक सूचना पुढीप्रमाणे आहे

सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण हे https://infyspringboard.onwingspan.com/web/en/login या लिंकवर क्लिक करून आपणास सुरु करता येईल

सदरचे प्रशिक्षण हे पात्र प्रशिक्षणार्थ्यास दिनांक १० जुलै, २०२३ पासून २४ ऑगस्ट, २०२३ या कालावधीमध्ये पूर्ण करावयाचे आहे.

प्रशिक्षणार्थी यांनी सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण हे सुरु झाल्यापासून एकूण ४५ दिवसांच्या कालावधी मध्येच पूर्ण करणे अनिवार्य आहे. तदनंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ सदरच्या प्रशिक्षणास मिळणार नाही, याची नोंद सर्व पात्र प्रशिक्षणार्थी यांना देण्यात यावी.

वरिष्ठ वेतन श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण  2023-24 Infosys springboard या app वर होणारआहे 

Infosys Springboard हे  प्रशिक्षण अँप click here वर टच करून मोबाईलवर अँप डाउनलोड करा CLICK HERE

प्रशिक्षणाचे सविस्तर मार्गदर्शन पत्र  CLICK HERE


नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थ्यास सदरचे ऑनलाइन प्रशिक्षण हे  https://infyspringboard.onwingspan.com/web/en/login  

या लिंकवर क्लिक करून सुरु करता येईल.  

प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या मोबाईल मध्ये Infosys Springboard या नावाचे अॅप्लीकेशन प्ले स्टोअर मधून डाऊनलोड करून सदरच्या अॅपद्वारे प्रशिक्षण पूर्ण करता येईल. सदरचे अॅप्लीकेशन हे https://play.google.com/store/apps/details?id=com.infosysit.springboard या लिंकवरून देखील प्रशिक्षणार्थी डाऊनलोड करू शकतात.


पात्र प्रशिक्षणार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण (वरिष्ठ / निवड श्रेणी प्रशिक्षण) हे पूर्ण करण्याकरीता राज्य


शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयामार्फत आवश्यक आय.डी व पासवर्ड या पूर्वीच मोबाईल SMS / ई-मेल द्वारे पाठविण्यात आलेला आहे. प्राप्त आय.डी. वा पासवर्ड च्या साह्याने प्रशिक्षणार्थी अॅप्लीकेशन अथवा सोबतच्या लिंकच्या माध्यमातून पोर्टल वर जाऊन प्रशिक्षणास सुरुवात करू शकतात.


प्रशिक्षण प्रकाराबाबत महत्वाचे • शिक्षकांना यापूर्वी नोंदणी पोर्टलच्या माध्यमातून नोंदणी केलेल्या प्रशिक्षण प्रकारासाठी (वरिष्ठ वेतन श्रेणी


/ निवड श्रेणी) पात्र असल्याबाबतची नोंद घेण्याबाबत योग्य त्या सूचना देण्यात याव्यात.


प्रशिक्षण चाचणी व स्वाध्यायाबाबत सूचना सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करतांना प्रशिक्षणार्थ्यांना घटकनिहाय वाचनसाहित्य ( ३० मि.), चित्रफिती अभ्यासणे (अंदाजे २ ते ३ तास), चाचणी सोडविणे ( १५ मि.), स्वाध्याय पूर्ण करणे ( २ तास) तसेच अभिप्राय देण्यासाठी विहित वेळ पुरविण्यात आलेला आहे. प्रशिक्षणार्थी यांना प्रत्येक घटक पूर्ण झाल्यानंतर आवश्यक चाचणी सोडविण्यासाठी फक्त १५ मि. तर स्वाध्याय पूर्ण करण्यासाठी २ तास वेळ राखीव आहे. त्यामुळे प्रशिक्षणार्थी यांनी आपली चाचणी ज्या वेळेस सोडवायची आहे त्याच वेळेस start बटन दाबावे. तसेच ज्या वेळेस आपले स्वाध्याय लिहून पूर्ण झाले असतील त्याच वेळेस start वर क्लिक करून पोर्टलवर ऑनलाईन नोंदवावे. विहितवेळेच्या समाप्तीनंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये संबंधित प्रशिक्षणार्थ्यास सदरची चाचणी अथवा स्वाध्याय पूर्ण करता येणार नाही, याची नोंद सर्व पात्र प्रशिक्षणार्थी यांना देण्यात यावी.


१. प्रत्येक घटकानंतर सदरच्या घटकावर आधारित चाचणी व स्वाध्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.


२. सर्व मोड्यूल्सनिहाय चाचण्या मिळून एकूण ४०% गुण पात्र प्रशिक्षणार्थ्यास प्राप्त करणे अनिवार्य राहील; तरच संबंधित प्रशिक्षणार्थ्यास डिजिटल प्रशिक्षण प्रमाणपत्र डाऊनलोड साठी उपलब्ध होणार आहे.


३. सदरच्या प्रशिक्षणास सुरुवात करणे, घटक सोडविणे, चाचणी व स्वाध्याय सोडविणे, प्रमाणपत्र डाऊनलोड करणे इत्यादी सर्व बाबी तपशीलवार पाहण्यासाठी http://training.scertmaha.ac.in/ या लिंकवर क्लिक करून मार्गदर्शनपर व्हिडीओ आपण पाहू शकता. तसेच सोबत जोडलेल्या SOP ची देखील मदत घेऊ शकता. (मोबाईल SOP, Desktop SOP)


४. कोणत्याही प्रशिक्षणार्थ्याने अथवा इतर शिक्षकाने सदरच्या प्रशिक्षणातील चाचणी / स्वाध्यायाशी संबंधित व्हिडीओ, pdf आपल्या ब्लॉग किंवा युट्युब चॅनेल वर अथवा इतर सामाजिक माध्यमांवर प्रसिद्ध केल्यास संबंधित व्यक्ती माहिती तंत्रज्ञान कायदा २००५ कलम ६६ अन्वये कायदेशीर कारवाईस पात्र राहील याची नोंद सर्व पात्र प्रशिक्षणार्थी यांना देण्यात यावी.


५. स्वाध्याय व चाचणी सोडविताना घ्यावयाची आवश्यक काळजी ही सोबतच्या माहितीदर्शक चित्रफितीमध्ये सविस्तर विषद करण्यात आलेली आहे. सर्व पात्र प्रशिक्षणार्थी यांनी सदरच्या चित्रफिती काळजीपूर्वक पाहून त्यानुसार आवश्यक कार्यवाही करावी.


६. सदरच्या प्रशिक्षणाच्या अनुषंगाने आवश्यक सूचना व महत्वपूर्ण बाबी या सर्व सदरच्या ऑनलाईन प्रशिक्षण प्रणालीवर वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच प्रशिक्षणाच्या आवश्यक समन्वयासाठी महत्वाचे संपर्क क्रमांक देण्यात आलेले आहेत.


७. तसेच प्रशिक्षणाच्या आवश्यक समन्वयासाठी प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संबंधित जिल्हासपर्क करावा.

८. सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण म्हणजे संबंधित शिक्षक / प्राचार्य हे वरिष्ठ वेतन / निवड श्रेणीसाठी पात्र ठरतीलच असे नाही ; याबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा संबंधित सक्षम प्राधिकारी यांचा असेल याकडे आपले लक्ष वेधण्यात येत आहे.


९. प्रशिक्षण प्रमाणपत्र हे प्रशिक्षणार्थ्यास सदरच्या ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये डिजिटल पद्धतीने डाउनलोड साठी http://training.scertmaha.ac.in/ येथे उपलब्ध होणार आहेत याची नोंद घेण्यात यावी.


१०. सदरच्या ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षण प्रोफाईल मध्ये प्रशिक्षणार्थ्याचे नाव ज्या लिपीमध्ये (मराठी / इंग्रजी) असेल तसेच नाव प्रशिक्षणार्थ्याच्या डिजिटल प्रमाणपत्रावर येणार आहे याची नोंद घ्यावी. त्यामुळे प्रशिक्षण प्रमाणपत्र हे मराठी मध्ये असल्याने प्रशिक्षणार्थ्याने आपल्या प्रोफाईल मधील नाव हे मराठी मध्येच ठेवावे.


११. प्रशिक्षणाच्या आवश्यक समन्वयासाठी तसेच प्रशिक्षणार्थ्यांच्या प्रशिक्षणासंबंधी काही अडचणी अथवा शंका समाधानासाठी दररोज सकाळी ११.३० ते १२.३० या वेळेमध्ये प्रशिक्षण शंका समाधानाच्या सत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरच्या ऑनलाईन मिटिंग चा आय. डी. व पासकोड सोबत जोडण्यात आलेला आहे.


दैनिक शंका समाधान सत्र तपशील


Topic: SCERT Maharashtra's Senior and Selection Training Zoom Meeting


Time: 11.30 am to 12.30 pm Meeting ID: 99156392904


Passcode: 175287



ऑनलाईन वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण दुरुस्ती प्रक्रीयेबाबत...

          प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी यांनी नोंदणी केलेली  आहे  प्रशिक्षण सुरू झाल्यावर माहिती चुकीची असल्यास प्रशिक्षण सुरु करण्यात / पूर्ण करण्यात अडचणी येऊ  शकतात त्यामुळे ज्या  प्रशिक्षणार्थी यांना दुरुस्ती करावयाची असेल त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयामार्फत  http://training.scertmaha.ac.in/  या संकेतस्थळावर दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी दुरुस्तीची अंतिम मुदत बुधवार दिनांक २८.०६.२०२३ रात्री १२.०० पर्यंत देण्यात आलेली आहे.

   सदरच्या दुरुस्तीच्या सुविधेमार्फत खालील दुरुस्ती प्रशिक्षणार्थी करू शकणार आहेत,

१. प्रशिक्षण प्रकार
२. प्रशिक्षण गट
३. दुबार नोंदणी रद्द
४. ईमेल आयडी बदल
इ.गोष्टीत बदल करावयाचा आहे त्यांनी कृपया https://training.scertmaha.ac.in/येथे जावून आपले बदल विहित मुदतीत नोंदवावेत.

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण   

दुरुस्ती प्रक्रिया  LINK  CLICK HERE






Post a Comment

0 Comments