Subscribe Us

state government employ DA increases राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दिनांक १ जानेवारी, २०२३ पासून चार टक्के वाढ

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या  महागाई भत्त्यात  दिनांक १ जानेवारी, २०२३ पासून चार टक्के वाढ  



राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्यात आली आहे 

शासन निर्णय पहा CLICK HERE

शासन निर्णयानुसार , दिनांक १ जानेवारी, २०२३ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ३८ % वरुन ४२% करण्यात यावा. सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ जानेवारी, २०२३ ते दिनांक ३१ मे, २०२३ या कालावधीतील थकबाकीसह माहे. जून, २०२३ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी.

माहे 1 जानेवारी 2023 ते  मे2023 महागाई भत्ता थकबाकी  मिळणार 

माहे 1 जानेवारी 2023 ते  मे 2023 महागाई भत्ता थकबाकी किती होणार  CLICK HERE

तुमचा पगार किती वाढला पहा एका क्लिकवर    CLICK HERE

 महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपध्दती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहील.

यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात, त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. अनुदानप्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उप लेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो, त्या उप लेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा..

असा  शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३०६३०१८३२१४२२०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.


Post a Comment

0 Comments