दहावी व बारावीच्या उत्तरपत्रिका गुणपडताळणी (Verification of Marks) करावयाची असेल तर वाचा अटी शर्ती व सूचना
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सूचना व अधिकृत लिंक.
परिपत्रक CLICK HERE
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेसाठी http://verification.mh-ssc.ac.in
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेसाठी http://verification.mh-hsc.ac.in
उत्तरपत्रिका गुणपडतळणीसाठी (Verification of Marks) पुढीलप्रमाणे अटी/ शर्ती व सूचना आहे :
- 1) माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या कोणत्याही विद्यार्थ्यास त्या परीक्षेतील स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त ) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची पडताळणी करण्यासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून (website) स्वतः किंवा शाळा / कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करता येईल. ज्या विषयांसाठी गुणपडताळणी करणे आवश्यक आहे ते सर्व विषय एकाचवेळी ऑनलाईन भरणे आवश्यक आहे. एकदा अर्ज केल्यानंतर पुन्हा अर्ज करता येणार नाही
- 2) ऑनलाईन अर्ज मंडळाच्या संकेतस्थळावरील विहित नमुन्यात प्रत्येक परीक्षेच्या वेळी ऑनलाईन निकाल जाहीर केल्याच्या दिनांकापासून १० दिवसांपर्यंत करणे आवश्यक राहील. अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिनांक प्रत्येक परीक्षेच्या निकालाच्या दिवशी जाहीर करण्यात येईल.
- 3) गुणपडताळणीसाठी प्रती विषयास रु. ५०/- इतके शुल्क ऑनलाईन पद्धतीने (Debit Card/Credit Card/UPI/Net Banking ) भरता येईल.
- 4) गुणपडताळणीसाठी ऑनलाईन अर्जातील सर्व माहिती भरणे अनिवार्य असेल . अपूर्ण माहिती भरलेले अर्ज, कमी शुल्क भरलेले , शुल्क न भरलेले व मुदतीनंतर प्राप्त झालेले ऑनलाईन अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
- 5) गुणपडताळणी नंतर गुणात बदल झाल्यास सदरचा बदल विद्यार्थ्यावर बंधनकारक राहील. त्यानुसार गुणपडताळणीनंतर संबंधित विद्यार्थ्याची मूळ संपादणूक आपोआप रद्द होईल व गुण कमी झाले तरी सुधारित संपादणूक स्विकारणे विद्यार्थ्यास बंधनकारक राहील.
- 6) सवलतीचे गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याने सवलतीचे गुण मिळालेल्या विषयाच्या गुणपडताळणीसाठी अर्ज केला असेल व गुण पडताळणीत विद्यार्थ्याचे अशा विषयातील गुण कमी झाल्याने तो सवलतीच्या गुणासाठी अपात्र ठरत असेल तर अशा प्रकरणी विद्यार्थ्याच्या उत्तीर्ण निकालात बदल करण्यात येईल व तो स्विकारणे बंधनकारक असेल.
- 7) उत्तीर्ण होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यानी गुणपडताळणी च्या निकालाची वाट न पाहता पुढील परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी विहित मुदतीत परीक्षेचे आवेदनपत्र संबंधित विभागीय मंडळाकडे माध्यमिक /उच्च माध्यमिक शाळेमार्फत / कनिष्ठ महाविद्यालयामार्फत सादर करणे आवश्यक आहे. निर्धारित मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत पुढील परीक्षेचे आवेदनपत्र स्विकारले जाणार नाही.
- 8) गुणपडताळणीमधील गुण वाढीमुळे विद्यार्थी सवलतीचे गुण मिळण्यास पात्र ठरत असल्यास त्यास ते गुण देय असतील.
- 9) गुणात बदल नसलेल्या विद्यार्थ्याचे गुणपडताळणी शुल्क परत केले जाणार नाही मात्र गुणात बदल झालेल्या प्रकरणी विद्यार्थ्याने भरलेले शुल्क परत दिले जाईल.
- 10) उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुणपडताळणीअंती पाठविण्यात येणाऱ्या ' नो चेंज' (No change) या निर्णयाचा अर्थ गुणपडताळणीत कोणताही बदल न होणे व उत्तीर्ण होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणीअंती पाठविण्यात येणाऱ्या ' नो चेंज' (No change) या निर्णयाचा अर्थ गुणपडताळणीनंतर गुणात कोणताही बदल न होणे किंवा गुणात पाच टक्क्यांहून कमी गुणांचा बदल झाल्यामुळे उत्तीर्ण होऊ न शकलेल्या विषयाच्या निकालात व एकूण निकालात कोणताही बदल न होणे असा असेल.
- 11) गुणपडताळणीमध्ये विद्यार्थ्याच्या गुणात बदल झाल्यास तसे संबंधित विद्यार्थ्यास व संबंधित माध्यमिक शाळेस / उच्च माध्यमिक शाळेस / कनिष्ठ महाविद्यालयास कळविण्यात येईल.त्यानुसार विद्यार्थ्याचे मूळ गुणपत्रक विभागीय मंडळाकडे जमा केल्यानंतर त्यास सुधारित गुणपत्रक देण्यात येईल.
- 12) उत्तरपत्रिका गुणपडताळणी/छायाप्रत/पुनर्मूल्यांकन/ यासाठी माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेसाठी http://verification.mh-ssc.ac.in व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेसाठी http://verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावरून आलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येतील
- 13) माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेनंतरच्या स्थलांतर पप्रमाणपत्रासाठी http://verification.mh-ssc.ac.in व इ. ११ वी तसेच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेनंतरच्या प्रमाणपत्रासाठी http://verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावरून आलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येतील
- 14) विध्यार्थ्याने उत्तरपत्रिका गुणपडताळणी/छायाप्रत/पुनर्मूल्यांकन/स्थलांतर प्रमाणपत्र यासाठी करावयाच्या ऑनलाईन भरावयाची माहिती बिनचूक भरावी. अर्ज प्रणालीमध्ये SUBMIT केल्यानंतर त्यात कोणताही बदल करता येणार नाही
- 15) ऑनलाईन प्रणालीमध्ये विद्यार्थ्यास उत्तरपत्रिका गुणपडताळणी/छायाप्रत/पुनर्मूल्यांकन/स्थलांतर प्रमाणपत्र या प्रत्येक बाबीसाठी फक्त एकदाच अर्ज करता येईल. त्यामुळे अर्ज भरण्यापूर्वी विषयाची संख्या निश्चित करूनच अर्ज भरण्याची कार्यवाही करावी .कोणत्याही परिस्थितीत दुबार अर्ज स्विकारले जाणार नाहीत
- 16) उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकन करण्याकरिता अर्ज करतांना विषय शिक्षकांचा अभिप्राय PDF File स्वरूपात (File Size १५ MB पर्यंत) अपलोड करणे अनिवार्य आहे तसेच सदर अभिप्राय सुस्पष्ट असणे आवश्यक आहे
- 17) विध्यार्थ्यानी तांत्रिक बाबीसंदर्भात अडचणी/शंका असल्यास (support@msbshse.ac.in) या ई-मेल आयडी वर अथवा ०२०-२५७०५२०७,२५७०५२०८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
- 18) ऑनलाईन अर्ज भरण्यासंदर्भात व्हिडीओ पाहण्यासाठी विध्यार्थ्यानी HELP या पर्यायाची निवड करावी.उत्तरपत्रिका गुणपडताळणी/छायाप्रत/पुनर्मूल्यांकन/स्थलांतर प्रमाणपत्र या चारही प्रकारासाठी स्वतंत्र व्हिडीओ देण्यात आलेले आहेत
- 19) विद्यार्थ्याने ऑनलाईन प्रकीयेद्वारे केलेल्या अर्जाची सद्यस्थिती (status) संकेतस्थळावर पाहता येईल.आपल्या अर्जावरील प्रकिया पूर्ण झाल्यानंतरच आवश्यकता भासल्यास संबंधित विभागीय मंडळाशी संपर्क साधावा.
http://verification.mh-hsc.ac.in/HSC_Verification/Instructions#
0 Comments