पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 8 वी फेब्रुवारी 2023 मधील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या बँक खात्याची माहिती भरणेबाबत...
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी ) फेब्रुवारी 2023 चा अंतिम निकाल दि. 13/07/2023 रोजी जाहीर झाला आहे. सदर परीक्षेत शिष्यवृत्तीधारक ठरलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम वितरीत करण्याच्या अनुषंगाने त्यांच्या बँक खात्याची माहिती ऑनलाईन भरणेसाठी संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
शिष्यवृत्ती परीक्षा 2023 साठी देण्यात आलेल्या लॉगीनमध्ये जिल्हा / तालुका / वाडमधील बँक खात्याची माहिती भरलेल्या / न भरलेल्या शाळांची / विद्याथ्र्यांची माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यानुसार माहिती न भरलेल्या शाळांना आपल्यास्तरावरून आधार क्रमांकाशी लिंक असलेल्या बँक खात्याची अचूक माहिती दि. 31/07/2023 रोजीपर्यंत भरणेबाबत आदेश देण्यात आले आहे .
0 Comments