Subscribe Us

प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत दाखल झालेल्या न्यायालयीन प्रकरणांच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत

  जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत दाखल झालेल्या न्यायालयीन प्रकरणांच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत

शासन निर्णय व  परिपत्रक  ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्र. जिपव- ४८२०/प्र.क्र.२९०/आस्था- १४, दि.०७.०४.२०२१, ,ग्रामविकास विभाग, शासन पत्र क्र. संकीर्ण २०२२/प्र.क्र.३४/आस्था- १४. दि.२०.०६.२०२२ व शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. संकीर्ण- २०२३/प्र.क्र. १७४ / टीएनटी-१, दि. २१/०६/२०२३  प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीप्रक्रीयेत दाखल झालेल्या रिट याचिकांमध्ये मा. न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे अनुपालन न केल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे.

 शालेय शिक्षण विभागाने शासन निर्णय दि. २१/०६/ २०२३ अन्वये जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांबाबत ग्रामविकास विभागास निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे जिल्हांतर्गत बदलीचे सुधारित धोरण अद्याप निर्गमित करण्यात आलेले नाही. त्यामुळे, सन २०२३-२४ ची ऑनलाईन बदली प्रक्रिया सुरु करता आलेली नाही.


मा. न्यायालयाने प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रीयेतील विविध रिट याचिकांप्रकरणी दिलेल्या आदेशांच्या अनुषंगाने शासन निर्णय दि. ०७/०४/२०२१ तसेच प्रचलित धोरणानुसार ऑफलाईन पध्दतीने समुपदेशन करण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी व मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे अनुपालन करावे. कोणत्याही परिस्थितीत मा. उच्च न्यायालयाच्या आदेशांचा अवमान होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. असे आदेश ग्रामविकास विभागाने  दिलेले आहे 





Post a Comment

0 Comments