Subscribe Us

पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती विद्यार्थी परीक्षा फी शेष फंडातुन भरण्याची व मार्गदर्शिका उपलब्ध करून देण्याची जिल्हापरिषदांना विनंती

पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती विद्यार्थी परीक्षा फी


शेष फंडातुन भरण्याची व मार्गदर्शिका उपलब्ध  करून देण्याची परीक्षा परिषेदेची  जिल्हापरिषदांना विनंती


 पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्याचे परीक्षा शुल्क भरणा व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद निर्मित शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शिका संच जिल्हा परिषद सेस फंड / मनपा निधीतून उपलब्ध करुन देणेबाबत...... 


शिष्यवृत्ती परीक्षा सन 2024 साठी परीक्षा परिषदेच्या https://www.mscepuppss.in/ या संकेतस्थळावर दिनांक  01/09/2023 रोजीपासून शाळांना ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची  सुविधा सुरु करण्यात येणार आहे.


जिल्ह्यात इ. 5 वी व इ. 8 वी मध्ये शिकणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सदर परीक्षेला प्रविष्ठ होण्यास प्रोत्साहित करण्याबाबतच्या उपाययोजना जिल्हापरिषद यांनी त्यांच्या स्तरावरुन करण्यात याव्यात अशी विनंती  परीक्षा परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे  तसेच  सर्व प्रविष्ठ विद्यार्थ्यांचे शुल्क जिल्हा परिषदेच्या सेस फंड / मनपा निधीतून अदा केल्यास जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सदर परीक्षेला बसण्याची संधी मिळेल 


 शासन निर्णयानुसार शिष्यवृत्ती रकमेत इ. 5 वीच्या सर्व संचांकरीता रु.500/- प्रतिमाह प्रमाणे (रु.5000/- प्रतिवर्ष) व इ. 8 वीच्या सर्व संचांकरीता रु.750/- प्रतिमाह प्रमाणे (रु.7500/- प्रतिवर्ष) इतकी भरीव वाढ करण्यात आलेली आहे. त्याचा फायदाही विद्यार्थ्याचे मनोबल वाढविण्यात निश्चितच होईल असे नमूद करण्यात आले आहे 


 जिल्ह्यातील शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्ता विकासाकरीता जिल्हा परिषद सेस फंड, मनपा / इतर निधीतून परीक्षा परिषद निर्मित मार्गदर्शिका संच उपलब्ध करुन देण्यात यावेत अशी  विनंती परीक्षा परिषदेच्या वतीने करण्यात  आली आहे

परिपत्रक वाचा



Post a Comment

0 Comments