Subscribe Us

जिल्हापरिषद शाळांचे HDFC या बँकेमध्ये शाळेचे आभासी खाते Virtual Account उघडणे बाबत.

सर्व शिक्षा अभियानांतर्गत पीएफएमएस प्रणालीवर शाळेला अनुदान प्राप्त होण्यासाठी  जिल्हापरिषद शाळांचे  HDFC या बँकेमध्ये शाळेचे आभासी खाते  Virtual Account उघडणे बाबत.



सर्व जिल्हापरिषद शाळांचे HDFC या बँकेमध्ये आभासी खाते (Vertual Account) उघडायचे आहेत. त्यासाठी HDFC बँकने एक लिंक तयार केलेली आहे सदरील लिंक मध्ये खालील प्रमाणे माहिती भरावयाची आहे. लिंक  भरण्याअगोदर सदरील माहिती पुर्ण व्यवस्थीत वाचून कोण कोणती कागदपत्र लागतात त्याची वेगवेगळी PDF फाईल २ Mb साईज पर्यंत कलर मध्ये Scan करुन तयार ठेवायची आहेत याची दक्षता घ्यावी. चेकर साठी दोन PDF आणि मेकर साठी २ PDF कलर स्कॅन करुन तयार करायाच्या आहेत. लिंक खालील प्रमाणे आहे.

http://sssnamh.org/schoolUser/SchoolUserDetailPage

लिंक मध्ये सर्व माहिती इंग्रजी Capital Letters मध्ये भरण्यात यावी.


एचडीएफसी बँकेत सर्व शिक्षा अभियानाचे शाळेचे अकाउंट ओपन करण्यासाठी संपूर्ण माहिती मराठीतून पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


एचडीएफसी बँकेत सर्व शिक्षा अभियानाचे शाळेचे अकाउंट ओपन करण्यासाठी संपूर्ण माहिती  इंग्रजीतून पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


पहिली स्टेप- शाळेचे रजिस्ट्रेशन

जिल्ह्याचे नांव, तालुक्याचे नांव, शाळेचा U-Dise क्रमांक, शाळेचे नांव (शाळेचे नांव लिहीतांना U-Dise या प्रणालीवर जसे नांव आहे त्या प्रमाणेच नांव लिहावे), शाळेचा किंवा मुख्याध्यापकांचा E-mail ID, मुख्याध्यापकचा मोबाईल नंबर


दुसरी स्टेप युजर डिटेल्स Maker Registration

१) मुख्याध्यापकाचे प्रथम नांव, मुख्याधपकाचे आडनांव, पद, User Type Maker या गोल चिन्हावर क्लिक करावे.

२) मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर व E-mail ID


तिसरी स्टेप लॉगीन डिटेल्स

१) User Name या मध्ये Capital Letter मध्ये शाळचे नांव टाकावे (उदा. Zppsशाळेचेनांव Maker असे लिहावे) शाळेच्या नावाच्या ठिकाणी आपआपल्या शाळेचे नाव लिहावे. कोणत्याही ठिकाणी स्पेस देवू नये.

२) Password  पासवर्ड टाकावयाचा आहे)

३) Repeat Password पासवर्ड टाकावयाचा आहे)


चौथी स्टेप Document Details (कागदपत्र अपलोड)

१) Document १ (Photo Identity proff) पॅनकार्ड किंवा मतदार ओळखपत्र (SMC अध्यक्षांचे) मुख्याध्यापक पदावर नियुक्तीचे मुख्याध्यापक पदाचा अतिरिक्त

२ ) Document २ (Govt. Appointment Document) - कार्यभार दिले बाबतचे वरिष्ठ कार्यायाचे आदेशाची प्रत.

वरील कागदपत्र स्कॅन करुन PDF अथवा JPEG या फॉरमॅटमध्ये २ Mb साईज पर्यंत अपलोड करावयाची आहेत. कादगदपत्र अपलोड केल्यानंतर Submit या बटनवर क्लि करावयाचे आहे. Succesfully असा मेसेज आल्यानंतर सदरील पेज बंद करायचे आहे.


पाचवी स्टेप Checker Registration -

 वरील प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर परत लिंकवर क्लिक करून नविन पेज Open करायचे आहे. लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यामध्ये जिल्हा, तालुका व शाळेचा U-Dise नंबर टाकावयाचा आहे. एवढी माहिती भरल्यानंतर आपण प्रथम स्टेप मध्ये भरलेली माहिती दिसेल.


सहावी स्टेप युजर डिटेल्स Checker Registration

 १) शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांचे प्रथम

२) अध्यक्षांचा मोबाईल नंबर व E-mail ID


सातवी स्टेप लॉगीन डिटेल्स

१) User Name- या मध्ये Capital Letter मध्ये शाळचे नांव टाकावे (उदा. Zppsशाळेचेनांव Checker असे लिहावे) शाळेच्या नावाच्या ठिकाणी आपआपल्या शाळेचे नाव लिहावे. कोणत्याही ठिकाणी स्पेस देवू नये. 

२) Password पासवर्ड टाकावयाचा आहे)

3) Repeat Password  पासवर्ड टाकावयाचा आहे)


आठवी स्टेप Document Details (कागदपत्र अपलोड)

१) Document (Photo Identity proff) पॅनकार्ड किंवा मतदार ओळखपत्र

२) Document २ (Govt. Appointment Document) SMC अध्यक्षांची निवड झाल्याचे प्रोसिडिंग रजिस्टरच्या पानाची मुख्याध्यापकाचा शिक्का व सही असलेली प्रत. वरील कागदपत्र स्कॅन करुन PDF अथवा JPEG या फॉरमॅटमध्ये २ Mh साईज पर्यंत अपलोड करावयाची आहेत. कागदपत्र अपलोड केल्यानंतर Submit या बटनवर क्लि करावयाचे आहे.


Submit केल्यानंतर Successfully असा मेसेज येईल.  या नंतर तालुकास्तरावरून सदरील माहिती तपासून त्याला अप्रूव्ह करण्यात येईल. ज्यांची माहिती चुकीची असेल त्यांचे फॉर्मरिजेक्ट करण्यात येतील व रिजेक्ट केलेल्या शाळांनी पुन्हा व्यवस्थित फॉर्म भरु सबमिट करावयाचा आहे.

नांव, आडनांव, पद, Eiser Type- Checker या गोल चिन्हावर क्लिक करावे. 

Post a Comment

0 Comments