Subscribe Us

शालार्थ प्रणालीतून मिळणार आता मेडिकल बिले माहे डिसेंबर पासून अदा करण्याचे आदेश

 शालार्थ प्रणालीतून मिळणार आता मेडिकल बिले माहे डिसेंबर पासून अदा करण्याचे आदेश 




शासन निर्णयान्वये विम्स प्रणालीवर उपलब्ध असलेल्या अनुदानातून माहे डिसेंबर, २०२३ च्या वेतनासोबत ७ व्या वेतन आयोगाचे १,२,३ हप्ते व वैद्यकीय देयके अदा करावयाचे आहेत. वेद्यकीय देयके ऑनलाईन पध्दतीने अदा करणेसाठी ऑनलाईन सुविधा देण्यात आलेली आहे. त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी. असे आदेश शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद बुलडाणा यांनी दिले आहेत

शालार्थ प्रणालीतून वैद्यकीय देयके  अदा करण्याची पद्धती CLICK HERE

सौजन्य संदीप जढाल शालार्थ समन्वयक बुलडाणा 


वैद्यकीय देयके अदा करताना ती आवक नोंद रजिस्टर मधील आवक ज्येष्ठतेने (प्रथम आवक प्रथम प्राधान्य) अशा ऑनलाईन पध्दतीने अदा करण्यात यावी.

 सर्व शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे वैदयकीय प्रतीपुर्ती देयक मंजूर झालेनंतर त्यासाठी अनुदानाची मागणी सद्यस्थितीत प्रचलीत पद्धतीने (Offline) देयक तयार करून जिल्हा कार्यालयास करण्यात येत आहे.


  मा. शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्रामध्ये तसेच संदर्भ क्रमांक 02 चे VC मध्ये दिलेल्या निर्देशानुसार यापुढे  कार्यरत सर्व शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे वैद्यकीय प्रतीपुर्ती देयकबमंजूर झालेनंतर त्यासाठी अनुदानाची मागणी शालार्थ प्रणालीअंतर्गत ऑनलाईन सादर करण्यातयावी. त्यानुषंगाने जिल्हा समन्वयक यांनी संदर्भ क्रमांक 03 नुसार तयार केलेल्या User Manualचा उपयोग करण्यात यावा. यापुढे वैद्यकीय देयकाचे अनुदानाची मागणी करणेबाबत खालीप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.


• सर्वप्रथम वैद्यकीय प्रतीपुर्तीचा मंजुरी आदेशाची नोंद शालार्थ प्रणालीअंतर्गत DDO-1 (मुख्याध्यापक) यांचे लॉगीन मध्ये असलेल्या सुविधेचा उपयोग करून करण्यात यावी. यामध्ये मंजुरी आदेशाची मूळ प्रत Scan करून Pdf स्वरूपात शालार्थ प्रणालीमध्ये Upload करावी. याठिकाणी Xerox प्रत Upload करू नये.


मुख्याध्यापक लॉगीन मधून मंजूरी आदेश Upload केल्यानंतर सदर आदेशाच्या दोन छायांकीत प्रतीसह देयकाची मुळ फाईल पंचायत समिती मध्ये शिक्षण विभागामध्ये जमा करण्यात यावी.


* पंचायत समिती स्तरावर प्राप्त झालेल्या वैद्याकीय देयकांची प्रथम आवक प्रथम प्राधन्य या क्रमाने पंचायत समिती अंतर्गत सर्व प्राप्त देयकांची संकलीत यादी तयार करून त्यासोबत प्रत्येकाचा मंजुरी आदेशाची छायांकीत प्रत जोडून गटशिक्षणाधिकारी यांचे स्वाक्षरीनिशी प्रमाणित हार्ड कॉपी शिक्षण विभाग (प्राथमिक) येथे सादर करावी.


* आपण यापुर्वी देयक जिल्हा कार्यालयास प्रचलीत पद्धतीने सादर केलेले असतील, तर ती सर्व देयके या स्तरावरून रद्द करण्यात आलेली आहेत. तरी आपण नव्याने शालार्थ प्रणालीअंतर्गतच ऑनलाईन पद्धतीने देयके या कार्यालयास सादर करावी. तसेच जिल्हा कार्यालयास देयके सादर केले


* जो देयके शालार्थ प्रणाली अंतर्गत ऑनलाईन सादर होणार नाहीत त्यांचे देयकांना अनुदान उपलब्ध होणार नाही.


* सन 2023-24 मध्ये वैद्यकीय देयकाकरिता मागणीपेक्षा कमी अनुदान प्राप्त झालेले असल्यामुळे जी देयके दिनांक 10 जानेवारी 2024 पर्यंत जिल्हा कार्यालयास प्राप्त झालेली आहेत. केवळ त्यांनाच अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल.


* यानंतर वैद्यकीय प्रतीपुर्ती आदेश मंजूर झालेनंतर शालार्थ प्रणालीमध्ये सदर आदेशाची नोंद करूनच ऑनलाईन देयक कोषागार कार्यालयास सादर करावयाची असल्याने पंचायत समिती स्तरावर मंजूर झालेले देयक प्रलंबीत राहणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी.

.












Post a Comment

0 Comments