Subscribe Us

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत संवादसत्र

 मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत संवादसत्र


    राज्यामध्ये दिनांक १ जानेवारी २०२४ ते १५ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीमध्ये “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” या अभियानाची सुरवात करण्यात आलेली आहे. सदरच्या कालावधीमध्ये राज्यातील शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

याच अनुषंगाने शासनामार्फत दिनांक १६ जानेवारी, २०२४ रोजी दुपारी १ :०० वाजता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून सदरच्या उपक्रमाच्या अनुषंगाने सिनेअभिनेते श्री. मंगेश देसाई यांचे शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी संवाद सत्राचे आयोजन ऑनलाईन स्वरुपात करण्यात आलेले आहे.

You tube Link  CLICK HERE


तरी उपरोक्त लिंकवर क्लिक करून दिनांक १६ जानेवारी २०२४ रोजी दुपारी  १:०० वाजता आपल्या अधिनस्त सर्व शाळांना सदरच्या कार्यक्रमास उपस्थित राहणेबाबत अवगत करण्यात यावे.

Post a Comment

0 Comments