Subscribe Us

समाजकल्याण वर्ग 1 ते 10 वा मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती साठी MAHADBT पोर्टल वर शाळा प्रोफाईल update कशी करावी ? School profile update on MAHADBT portal pre matric scholarship

 समाजकल्याण  वर्ग १ ते  १० वा मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती साठी  MAHADBT  पोर्टल वर शाळा प्रोफाईल update कशी करावी ?

School profile update on MAHADBT p  ortal for social welfare classes 1st to 10t  h pre matric scholarship



MAHADBT   पोर्टल login करा. CLICK HERE

USER MANUAL मार्गदर्शिका  वाचा  CLICK HERE


शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून केंद्र शासनाने दिलेल्य निर्देशानुसार खालील मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन पध्दतीने महाडीबीटी प्रणालीद्वारे राबविण्य येणार आहेत.

  • 1. सैनिकी शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता
  • 2.इ.9 वी 10 वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती
  • 3. साफ सफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती
  • 4.इ.5 वी ते 7 वी आणि इ.8 वी ते 10 वी मधील अनुसूचित जातीच्या विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती 5. माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती


वर नमूद केलेल्या सर्व योजनांची ऑनलाईन अर्ज नोंदणी करणेकरीता खालीलप्रमाणे कार्यप्रणाली अवलंबण्यात यावी.

1. महाडीबीटी प्रणाली वेब लिंक जा 

CLICK HERE 








PROFILE UPDATE साठी VIDEO पहा  

CLICK HERE

2. मुख्याध्यापक लॉगीन तयार करणे- महाडीबीटी पोर्टलवर प्री-मॅट्रिक योजनांसाठी अर्जाच्या नोंदणीसाठी, शाळेच्या मुख्याध्यापकांनी यूजर आयडीमध्ये  Pre_SE27XXXXXXXXX_Principal आणि पासवर्डमध्ये Pass@123 टाइप करून लॉग इन करावे.

मुख्याध्यापक यांचे आधार verify करणे आवश्यक आहे  otp द्वारे वverify करावे 



3. शाळेचे प्रोफाईल अद्ययावत करणे- यामध्ये शाळेची, मुख्याध्यापकांची व लिपिकाची माहिती अद्ययावत करावी.

 मुख्याध्यापकांची व लिपिकाची माहिती अद्ययावत करण्यासाठी email व mobile वर otp verify करणे आवश्यक 


4. विद्यार्थी प्रोफाईल अद्ययावत करणे- यामध्ये विद्यार्थ्यांची वैयक्तिक व शैक्षणिक माहिती अद्ययावत करावी


5. योजनेची निवड करणे- यामध्ये संबंधित विद्यार्थी ज्या योजनेसाठी पात्र आहे त्या योजनेकरीता अर्ज नोंदणी करणे.


योजनांचे पात्र सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज महाडीबीटी प्रणालीमध्ये तात्काळ नोंदणी करणेकरीता आपले स्तरावरून संबंधित सर्व गटशिक्षणाधिकारी तसेच शाळेच्या मुख्याध्यापकांना तात्काळ आदेशित करावे. याबाबत मा.आयुक्त महोदय साप्ताहिक बैठकीमध्ये आढावा घेणार आहेत. त्यामुळे सर्व शाळांची 100 टक्के अर्ज नोंदणी होईल याकरीता आपले स्तरावरून कार्यवाही करावी. याबाबतीत दिरंगाई होणार नाही याची दक्षता घ्यावी





Post a Comment

0 Comments