Subscribe Us

जिल्हाधिकारी होईल मी प्रेरणादायी गीत inspirational songs I will become collector

   प्रेरणादायी गीत जिल्हाधिकारी होईल मी


ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रेरणा मिळावी जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न त्यांनीही उराशी बाळगावे आणि परिस्थितीवर मात करून त्यांनीही जिल्हाधिकारी व्हावे ही प्रेरणा त्यांना महानायिकांच्या त्यागातून मिळावी या उद्देशाने हे गीत तयार करण्यात आले आहे तरी पालकांनी व शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना हे प्रेरणादायी गीत ऐकवावं आणि त्यांना सुद्धा जिल्हाधिकारी होण्याची प्रेरणा द्यावी

Youtube link CLICK HERE


मित्र श्री राजेश चोखाजी साळवे सर, सहाय्यक अध्यापक जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा सवणा तालुका चिखली जिल्हा बुलढाणा यांनी स्वतः लिहिलेले, कंपोज केलेले व रेकॉर्डिंग करून घेतलेले " जिल्हाधिकारी होईल मी " या गीताचे अनावरण शाळेच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते तसेच मुख्याध्यापक श्री मुकीम पटेल सर यांच्या हस्ते करण्यात आले.विशेष बाब म्हणजे अनेकांनी सुचविले की माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या हस्ते आपण या गीताच्या अनावरन करू. परंतु आदरणीय श्री साळवे सरांची इच्छा अशी होती की भविष्यातील जिल्हाधिकारी म्हणजेच शाळेतील विद्यार्थी यांच्या हस्ते  या गीताचे अनावरण झाले पाहिजे म्हणून  शाळेत छोटेखानी कार्यक्रम करण्यात आला. कृपया सर्वांनी या गीताला युट्युब वर लाईक व सबस्क्राईब करावे व त्यामधून मिळणाऱ्या निधीचा उपयोग आदरणीय साळवे सर विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठीच करणार आहेत ...साळवे सरांच्या उपक्रमाला मानाचा मुजरा


Post a Comment

0 Comments