पाचवी व आठवी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यासाठी आता चालणार पालकांचे खाते शासन निर्णय Parents' account management decision will now run for fifth and eighth scholarship eligible students
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी स्तर) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी स्तर) करीता अटी व शर्ती निश्चित करणेबाबत- शुद्धीपत्रक.
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन शुद्धीपत्रक क्रमांकः- एफईडी ४०१४/६४३/प्र.क्र.४/ एसडी-५ मंत्रालय विस्तार भवन, मुंबई ४०००३२ दिनांक :- ०७ मे, २०२४
शासन निर्णय क्र. एफईडी ४०१४/६४३/प्र.क्र.४/एसडी-५, दि.१५.११.२०१६मधील "मुद्दा क्र. १४ (शिष्यवृत्तीचे वितरण):- शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत असल्याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अर्जासोबत त्यांच्या बँक खात्याची माहिती (बँकेचे नाव, खाते क्रमांक व IFSC कोड इ.) व आधार क्रमांकाची माहिती घ्यावी."
याऐवजी
"मुद्दा क्र. १४ (शिष्यवृत्तीचे वितरण):- शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या किंवा विद्यार्थ्यांचे
आई/वडील/पालक यांच्या संयुक्त बँक खात्यात (विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न
करुनच देय रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात) जमा करण्यात येत असल्याने
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्याच्या अर्जासोबत विद्यार्थी किंवा
विद्यार्थ्यांचे आई / वडील / पालक यांच्या बँक खात्याची माहिती (बँकेचे नाव, खाते क्रमांक व IFSC
कोड इ.) व आधार क्रमांकाची माहिती घ्यावी." असे वाचण्यात यावे
शासन निर्णय वाचा CLICK HERE
0 Comments