राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करण्याची व सानुग्रह अनुदान मागणीची कार्यपध्दती.
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना शासनाने शासन निर्णय दिनांक ०१ ऑक्टोबर २०१३ अन्वये सदर योजना सन २०१२-१३ पासून नियमित स्वरुपात राबविण्याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत. सदर शासन निर्णयान्वये इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत शिकणाऱ्या मुला-मुलीसाठी सदर योजना सन २०१३-१४ पासून नियमित राबविण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. शासन निर्णय दिनांक २१ जून, २०२२ नुसार सुधारीत शासन निर्णय काढून सदर योजना राबविण्याचे व त्यासाठी जिल्हास्तरी समिती गठीत करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. त्यामध्ये संदर्भिय क्र.४ चे शासन शुध्दीपत्रकानुसार सदर योजनेअंर्तत प्रस्ताव निकाल काढण्यासाठी प्रत्येक जिल्हयात खालीलप्रमाणे जिल्हास्तरीय समिती गठीत करण्याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत.
- १. जिल्हाधिकारी- अध्यक्ष
- २. मुख्यकार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद) / महापालिका उपआयुक्त - सदस्य
- ३. पोलिस अधीक्षक/पोलीस उपायुक्त (प्रशासन)-सदस्य
- ४ शिक्षणाधिकारी (माध्यमिक) / प्रशासन अधिकारी (शिक्षण) / शिक्षण निरीक्षक =- सदस्य
- ५ जिल्हा आरोग्य अधिकारी/सिव्हिल सर्जन/सक्षम वैद्यकीय अधिकारी- सदस्य
- . शिक्षणाधिकारी (योजना), (सर्व) / शिक्षण निरीक्षक, (योजना) बृहन्मुंबई ६- सदस्य सचिव
शासन निर्णय दिनांक ०१ ऑक्टोबर, २०१३ नुसार लाभार्थी निवडीचे निकष :-
- विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू :- ७५००००/-
- अपघातामुळे कायमचे अपंगत्व (२ अवयव/२ डोळे किंवा १ अवयव व १ डोळा) :-५००००/-
- अपघातामुळे कायमचे अपंगत्व (१ अवयव/१ डोळा) कायम निकामी ३००००/-
- अपंगत्वाच्या कारणाबाबतचे सिव्हिल सर्जन यांचे कायम अपंगत्वाचे प्रमाणपत्र
शासन निर्णय दिनांक २१.०६.२०२२ नुसार लाभार्थी निवडीचे निकष :-
- विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू: १५००००/-
- अपघातामुळे कायमचे अपंगत्व (२ अवयव/२ डोळे किंवा १ अवयव व १ डोळा) :-१०००००/-
- अपघातामुळे कायमचे अपंगत्व (१ अवयव/१ डोळा कायम निकामी):- ७५०००/-
- विद्यार्थ्यास अपघातामुळे शस्त्रक्रिया करावी लागल्यासः प्रत्यक्ष हॉस्पीटलचा खर्च किंवा जास्तीत जास्त १,००,०००/-
- -विद्यार्थी आजारी पडून, सर्प दंशाने किंवा पोहताना मृत्यु झाल्यास :-१५००००/-
- विद्यार्थी कोणत्याही कारणाने जखमी झाल्यास (क्रिडा स्पर्धेत खेळताना, शाळेतील जड वस्तू पडून, आगीमुळे, विजेता धक्का, विज पडून):- प्रत्यक्ष हॉस्पीटलचा खर्च किंवा जास्तीत जास्त १,००,०००/- शस्त्रक्रिये बाबतचे हॉस्पिटलचे प्रमाणपत्र सिव्हिल सर्जन यांच्या प्रति स्वाक्षरीसह.
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ हा लाभार्थ्यां पर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने व सदर योजनेबाबत संपूर्ण राज्यात एकसुत्रि पणा रहावा या करीता या योजनेबाबतची लाभार्थ्यांपासून ते संचालनायपर्यंतची करावयाची कार्यवाही/कार्यपध्दती खालीलप्रमाणे विहित नमून्यात सादर करण्यात येत आहे.
सोबतः - दाव्यासाठी करावयाच्या अर्जाचा नमूना विवरण पत्र-अ जोडले आहे. सदरचे विवरण पत्र हे पालकांनी मुख्याध्यापक/प्राचार्य यांचेकडे सादर करावे.
मा. संचालक यांचे कार्यपद्धती बाबत परिपत्रक CLICK HERE
संपूर्ण दावा प्रस्ताव नमुना CLICK HERE
दाव्यासाठी करावयचा अर्ज नमुना CLICK HERE
मुख्याध्यापक प्राचार्य यांनी दाव्यासाठी करावयचा अर्ज CLICK HERE
गट शिक्षणाधिकारी यांनी शिक्षणाधिकारी यांचेकडे दाव्यासाठी करावयचा अर्ज CLICK HERE
१) मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती यांचेकडे सादर करावयाच्या अर्जाचे विहित प्रपत्र-१ ता.जि.
२) गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती-- ता.-- जि. यांनी
शिक्षणाधिकारी (योजना) जिल्हा परिषद ३) शिक्षणाधिकारी (योजना) जिल्हा परिषद- यांचे कडे सादर करावयाच्या अर्जाचे विहित प्रपत्र-२ यांनी जिल्हास्तरीय समितीची बैठकीसाठी वेळ वदिनांक मिळणेसाठी जिल्हास्तरीय समितीसमोर करावयाच्या अर्जाचे विहित प्रपत्र-३
४) जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीबाबतचा इतिवृत्ताचा नमूना-प्रपत्र-४
) राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेबाबतचा (फ्लो चार्ट) करावयाची कृती प्रपत्र-५
६ ७) शिक्षणाधिकारी (योजना) जिल्हा परिषद यांनी सानुग्रह अनुदान मागणीचा प्रस्ताव शिक्षण
संचालक (योजना) महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडे सादर करावयाचा नमूना प्रपत्र-६
८) उपयोगिता प्रमाणपत्र नमूना प्रपत्र-७
विहित नमूना व तपासणी सूची जोडली आहे. (हार्ड कॉपी व सॉप्ट कॉपी)
0 Comments