मतदान केंद्राध्यक्ष (Presiding Officer) व मतदान अधिकारी (Polling Officer) यांना IGOT KARMAYOGI पोर्टलद्वारे प्रशिक्षण
आगामी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकां २०२४ च्या अनुषंगाने मतदान केंद्राध्यक्ष (PAO) व मतदान अधिकारी (PO) यांना विहीत प्रशिक्षण देण्यापूर्वी ऑनलाईन कोर्स द्वारे प्रशिक्षण झाल्यास सदर अधिकाऱ्यांची निवडणूकीसंबंधी कामकाजासाठी चांगली पार्श्वभूमी तयार होवू शकते. ही बाब विचारात घेवून सदर अधिकाऱ्यांना Physical Training पुर्वी IGOT KARMAYOGI पोर्टलच्या माध्यमातून ध्वनीचित्रफितीच्याद्वारे (Audio-Visual) प्रशिक्षण देण्याची योजना राबवण्याचा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे.
IGOT KARMAYOGI पोर्टलवर तयार करण्यात आलेल्या ध्वनीचित्रफिती या Handbook For Presiding officer-२०२३ मधील प्रकरणानुसार राज्यातील उत्कृष्ट NLMT व SLMTS यांच्या सहाय्याने तयार करण्यात आलेल्या आहेत. अशा एकूण मराठी भाषेतील १४ ध्वनीचित्रफितीचा समावेश असलेला ऑनलाईन कोर्स दोन भागात IGOT KARMAYOGI पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर कोर्स पूर्ण केल्यानंतर त्याबाबतचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सदर ऑनलाईन कोर्स आयोगाच्या सूचनांनुसार घेण्यात येणाऱ्या विहीत प्रशिक्षणाला पर्याय नसून निवडणूक कामकाजाशी संबंधीत विहीत केलेले प्रशिक्षण प्रत्यक्षरित्या घेणे अनिवार्य आहे. सदर ऑनलाईन कोर्सचा हेतू केवळ विहित प्रशिक्षणाआधी विषयाची पार्श्वभूमी तयार होणे असा आहे. तसेच निवडणूक कामकाजाच्या दृष्टीने Handbook For Presiding officer- २०२३ मधील तरतुदी अंतिम असतील
सर्व मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना तसेच या कामासाठी Election duty लागण्याची शक्यता असलेल्या तसेच निवडणूक कामकाजाशी संबंधीत ज्ञान व कौशल्य वाढविण्याच्या दृष्टीने सदर ध्वनीचित्रफिती पाहण्याबाबत सूचित करण्यात आले आहे
ध्वनीचित्रफिती भारत सरकारच्या IGOT KARMAYOGI पोर्टलवर पाहता येणार आहेत. त्यासाठी नोंदणीकरीता Flow Chart चा अवलंब करावा. सदर पोर्टलवर लॉगिन होण्यासाठी gov.in किंवा nic.in यापैकी एक ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे. ज्या अधिकारी / कर्मचारी यांच्याकडे gov.in किंवा nic.in चा ई-मेल आयडी आहेत त्यांनी।GOT KARMAYOGI पोर्टलवर वर सदर कोर्स पूर्ण करावा. तसेच ज्या अधिकारी / कर्मचारी यांच्याकडे gov.in किंवा nic.in चा ई-मेल आयडी नाहीत त्यांच्यासाठी पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल.
आदेश वाचा
0 Comments