विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने दिनांक १८, १९ व २० नोव्हेंबर, २०२४ रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबत.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने दिनांक १८,१९ व २० नोव्हेंबर, २०२४ रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबतचा प्रस्ताव मा आयुक्त शिक्षण यांनी शासन मान्यतेसाठी सादर केला होता. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ राज्यात सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल, त्या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय घेणेबाबत आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात, असे शासन उपसचिव, महाराष्ट्र शासन यांनी कळविले आहे
0 Comments