जिल्हा स्तरावर पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आगाऊ वेतनवाढीचे लाभ देणेबाबत.
शासनाच्या समक्रमांकित दि.१.७.२०२२ व दि.६.१०.२०२३ रोजीची पत्रांन्वये मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने सन-२०१८ पर्यंत ज्या आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आगाऊ वेतनवाढीचा लाभ देण्यात आलेला नाही, अशा आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांना, जिल्हा परिषदेकडे प्राप्त होणाऱ्या स्वनिधीतून आगाऊ वेतनवाढीपोटी अनुज्ञेय देय होणारी रक्कम तात्काळ अदा करण्याबाबत शासनाच्या संदर्भाधिन पत्रांन्वये मुख्य कार्यकारी अधिकारी यांना यापूर्वीच कळविण्यात आले आहे. जिल्हा परिषदेने स्वनिधी अर्थसंकल्पात त्याप्रमाणे तरतुद करावी.
दि.१.७.२०२२ व दि.६.१०.२०२३ रोजीच्या पत्रान्वये दिलेल्या सूचना स्वयंस्पष्ट असून त्यानुसार तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. सदर प्रकरणी मा. न्यायालयाचा अवमान होणार याची दक्षता घेण्याबाबतीत उपसचिव यांनी या कळविले आहे
परिपत्रक वाचा
0 Comments