Subscribe Us

NMMS परीक्षा 2024-25 निकाल जाहीर

NMMS परीक्षा 2024-25  निकाल जाहीर


राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) 2024-25

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दि.२/१२/२०२३  रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची  निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे 

प्रसिद्धी पत्रक    CLICK HERE

निकाल पाहण्यासाठी आपला रोल नंबर व आई चे नाव टाकून click Here वर टच करून टाका

   CLICK HERE

To view Result touch link below and enter roll number and mother name 

शाळा login वरून सर्व विद्यार्थ्यांचा निकाल पहा CLICK HERE

अधिकृत वेबसाईट CLICK HERE 

गुणयादी बाबत सूचना....

१) राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची गुणयादी दि. ०७/०२/२०२५ रोजी परिषदेच्या https://www.mscepune.in व https://mscenmms.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.

२) सदर यादीमध्ये विद्यार्थ्यांचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव, आईचे नाव यामधील स्पेलिंग दुरुस्ती असल्यास (कोणत्याही परिस्थितीत पूर्ण नावात बदल केला जाणार नाही.) तसेच जन्मतारीख, जात, आधारकार्ड, इत्यादीमध्ये दुरुस्ती असल्यास सदर दुरुस्ती करण्यासाठी दि. १८/०२/२०२५ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. ऑनलाईन आलेल्या अर्जा व्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीने पाठविलेल्या दुरुस्त्या (टपाल, समक्ष, अथवा ईमेलद्वारे) तसेच विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या दुरुस्त्या / अर्जाचा विचार केला जाणार नाही.

३) आलेल्या सर्व दुरुस्त्यांचा विचार करून शिष्यवृत्तीसाठीची निवडयादी परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.

४) सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कार्बानलेस उत्तरपत्रिका देण्यात आलेली असल्याने पेपरची गुणपडताळणी केली जात नाही.

५) शिष्यवृत्तीसाठीची निवडयादी जाहीर झाल्यानंतर निवडयादीत कोणताही बदल करण्यात येणार नाही.

६) सदर परीक्षेसाठी उत्तीर्ण होण्यासाठी दोन्ही विषयात एकत्रित ४० % गुण मिळणे आवश्यक आहेत. (अनुसूचीत जाती (SC) / अनुसूचीत जमाती (ST) व दिव्यांग विद्यार्थ्यासाठी दोन्ही विषयात एकत्रित ३२ % गुण मिळणे आवश्यक आहेत)





Post a Comment

0 Comments