Subscribe Us

शैक्षणिक नवोपक्रम

 

शैक्षणिक नवोपक्रम

              महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण् परिषदेमार्फत  शैक्षणिक वर्षासाठी राज्यातील पा्रथमिकमाध्यमिक व उच्च्‍ माध्यमिक शिक्षकांसाठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असते . संशोधनात्मक कार्याची आवड असणा-या शिक्षकांनी या स्पर्धेत भाग घ्यावाअसे  आवाहन करण्यात येत आहे. प्राथमिकमाध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांनी आपले नवोपक्रम चार प्रतीत आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधित जिल्हयाच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडे दिनांक 31 ऑक्टोबर पर्यंत पाठवावे. स्पर्धेच्या सविस्तर माहितीसाठी संबंधित जिल्हयाचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक)प्राचार्यजिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थामहाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदपुणे या कार्यालयाकडे संपर्क साधावा. 
           स्पर्धेची उदिष्टये :- प्राथमिकमाध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाच्या क्षेत्रात अध्यायन अध्यापनाशी संबंधित क्षेत्रांमधील पारंपारिक पध्दती बदलून त्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी शिक्षकांना प्रोत्साहित करणेशिक्षकांनी प्रशिक्षण क्षेत्रामध्ये विविध विषयांवर केलेले मुलभूत आणि उपयुक्त संशोधनात्मक कार्य सर्वसामान्य शिक्षकांच्या व शैक्षणिक प्रशासकांच्या माहितीसाठी प्रस्तृत करणेप्राथमिकमाध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण क्षेत्रांमधील नवनवीन संकल्पनाविचारप्रवाहतंत्रे आणि अध्ययन- अध्यापन पध्दती यांचा निरंतर शोध घेणा-या शिक्षकांना उत्तेजन देऊन त्यांना त्यासाठी प्रोत्साहन
 स्पर्धकांची पात्रता :-  स्पर्धेत भाग घेणारे स्पर्धक हे जिल्हा परिष्दनगरपालिकामहानगरपालिकास्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिकमाध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये अथवा मान्यता प्राप्त प्राथमिकमाध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता ली ते 12 वीला शिकविणारे शिक्षक म्हणून काम करणारे असावेत. माध्यमिक शाळांमधील इयत्ता वी ते वी ला शिकविणारे शिक्षक प्राथमिक स्पर्धेत गणले जातील.
          स्पर्धेचे नियम : नवोपक्रम सादर केल्याच्या तारखेस स्पर्धक  प्राथमिकमाध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिकवित असावेतनिवडलेला नवोप्रकमप्राथमिकमाध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणा-यांना उपयुक्त ठरणा-या कोणत्याही विषयावरील असावा,  नवोपक्रम शिक्षकांच्या स्वत:च्या संशोधनावर अथवा अनुभवावर आधारलेला असावा. नवोप्रकमाच्या प्रकल्प अहवाल सोबत.
          राज्य व राष्ट्रीयस्तरावरील अन्य कोणत्याही स्पर्धेसाठी या अगोदर पाठविलेला नवोपक्रम या स्पर्धेसाठी पाठविण्यात येऊ नये. प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
            नवोपक्रमाची पृष्ठयसंख्या 40 ते 50 असावीअहवालात वापरलेले संदर्भ नवोपक्रमाच्या शेवटी नमुद करावेत. नवोपक्रमाला जोडलेली परिशिष्टे संक्षिप्त असावीत. मुख्याध्यापकप्राचार्य स्वाक्षरी नाव व शिक्का मराठीइंग्रजी किंवा हिंदी यापैकी कोणत्याही एका भाषेत लिहिलेला असावा.
          स्पर्धकाचे संपूर्ण नावशाळेचे नाव व पत्ताकायमाचा पत्ताजन्मतारीख्शैक्षणिक अर्हताशिक्षक म्हणून केलेल्या कामाचा अनुभवनवोपक्रमाचे शिर्षकनवोपक्रमाची पृष्ठसंख्या. नवोप्रकम ए साईज कागदच्या एकाच बाजूस सुवाच्च हस्ताक्षरात लिहिलेला असावा. कार्डशीट कव्हर वापरुन साधी बांधणी केलेला असावा.
          नवोपक्रमाचे जिल्हा व राज्यस्तरावर मूल्यांकन पुढील निकषांच्या आधारावर करण्यात येईल. नवीनता (कल्पाना कार्यवाही पध्दती) 20 गुणनियोजन (वेळापत्रक साधनेपुरावेसादीकरण इत्यादीचे) 25 गुणकार्यवाही 25 गुणयशस्विता 15 गुणअहवाल लेखन 10 गुणसंदर्भ व उद्दिष्टे गुण एकूण 100 गुण
          पारितोषिक :- जिल्हा पातळवरील पहिल्या तीन उत्कृष्ट नवोपक्रमाना अनुक्रमे  रु. 1000/, रु 800, रु. 600 रु. 400,रु 200 ची रोख पारितोषिक व प्रशस्तिपत्रके देण्यात येतील. तसेच क्रमांक ते 10 च्या नवोपक्रमांना फक्त उत्तेजनार्थ प्रशस्तीपत्रके देण्यात येतील. राज्यस्तरावरील स्पर्धेतील उर्वरित सहभागी सदस्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.
         स्पर्धेत भाग घेणा-या शिक्षकांनी आपला नवोपक्रम चार प्रतीत आवश्यक त्या सर्व प्रमाणपत्रांसह आपल्या जिल्हयाच्या प्राचार्यजिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडे दि. ३१ ऑक्टोबर  पर्यंत सादर करावेत.
(अधिक माहितीसाठी  दिशा नवोपक्रमाची हे पुस्तक वाचावे )

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा प्रसिद्धीपत्रक 2019-20   CLICK HERE

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा माहितीपत्रक 2021-22  CLICK HERE

नवोपक्रम म्हणजे काय ?   नवोपक्रमाचे विषय    CLICK HERE

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा साठी अहवाल लेखन कसे करावे ?  CLICK HERE

नवोपक्रम तयार करताना करावयाची पूर्व तयारी:-

●समस्ययादी तयार करने--त्यांचा प्राधान्य क्रम लावणे-एक समस्या निवड-ती समस्या निवडिची गरज/ कारणे- शीर्षक-उद्दिष्टे निर्मिती-उपक्रमाचे नियोजन-कार्यवाही-यशस्विता/उपयुक्तता

नवोपक्रम अहवाल लेखनाचे मुद्दे
  • शीर्षक
  • गरज
  • उद्दिष्टे
  • नियोजन
  • कार्यवाही
  • निष्कर्ष(यशस्वित)
  • समारोप
  • संदर्भग्रंथ व परिशिष्टे

काही संकल्पना

गरज: a. पार्श्वभूमी

          b. क्षेत्रनिश्चिती ( जेथे हा उपक्रम राबविणार आहोत.उदा.आपली शाळा
         c. उपक्रमाचे वेगलेपण
          d. उपयुक्तता

उद्दिष्टे: 
उपक्रम का करायचा? कोणासाठी? कसा? इत्यादिंचा विचार करून ठरवावा.

नियोजन: 
  1. विषयाशी संबंधित तज्ञांशी चर्चा
  2. कोणती साधने वापरायची? या संबंधी चर्चा
  3.  करावयांच्या कृतिंची क्रम मांडणी
  4. कार्यवाहिचे टप्पे(वेळापत्रक)
  5. उपक्रमांचे फोटो,वर्तमानपत्रांत उपक्रमाचे आलेले फोटो येथे जोडावेत.

कार्यवाही-1500 ते 1800 शब्दामध्ये 

  •   पुर्वस्थितिचे वर्णन या ठिकाणी लिहून काढने.
  •  कार्यवाहिच्या दरम्यान निरिक्षणे/अनुभवाच्या नोंदी व माहिती संकलन
  •  उपक्रम पूर्ण झाल्यावर निरिक्षणे व त्याच्या नोंदी
  • कार्यवाहित आलेल्या अडचणी
  • आवश्यक असल्यास माहितीचे विश्लेषण,आलेख व तख्ते यांचा अंतर्भाव करावा

यशस्विता/ निष्कर्ष:-1000 ते 1300 शब्द/5पाने

उद्दिष्टानुसार उपक्रमाची कोणती उद्दिष्टे साध्य झाली याची माहिती
वर्णनात्मक किंवा आलेखात्मक माहिती

संदर्भग्रंथे व परिशिष्टे :

  यात वापरलेल्या संदर्भ ग्रंथांची यादी,भाग घेणार्या विद्यार्थ्यांची माहिती,सन्दर्भलेख इत्यादींची माहिती जोडणे 

सूचना:केलेल्या नवोपक्रमाची नोंद ठेवणे आवश्यक आहे

नवोपक्रम गुणदान
  1. नवीनता (कल्पक ,कार्यवाही व पद्धती)- 20 गुण
  2. नियोजन (वेळापत्रक,साधने,पुरावे ,सादरीकरण)-25 गुण
  3. कार्यवाही - 25 गुण
  4. यशस्विता -15 गुण
  5. अहवाल लेखन - 10 गुण
  6. संदर्भ- 05 गुण
  7. एकूण -100 गुण

Post a Comment

0 Comments