Subscribe Us

NMMS EXAM 2023 - वर्ग 8 वीतील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षाबाबत संपूर्ण माहिती

NMMS EXAM 2022 - वर्ग 8 वीतील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक  शिष्यवृत्ती योजना परीक्षा

8 वी चे विद्यार्थी साठी सुवर्णसंधी 48,000 रुपये मिळवा NMMS परीक्षा इयत्ता 8 वी साठी

वर्ग आठवी साठी दरवर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेते जाणून घेऊया या शिष्यवृत्ती परीक्षे बद्दल सविस्तर माहिती. महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा मर्यादित जागांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा/ नवोदय प्रवेश परीक्षा सोबतच या परीक्षेची तयारी केल्यास विद्यार्थ्यांना पुढील चार वर्ष प्रति महिना एक हजार रुपये एवढी शिष्यवृत्ती मिळते NMMSS National Means Cum merit Scholarship Scheme. 

ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या https://www.mscepune.in/   https://nmmsmsce.in  या संकेतस्थळावर शाळांना भरता येतात .

योजनेचे उद्दिष्ट-

सन २००७-०८ पासून इयत्ता 8 वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुध्दिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावेत्यानुसार विद्यार्थ्याचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी. आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हे या योजनेचे उद्दिष्ट आहे

इ. ८ वी तील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उत्पन्न रु.१,५०,००० पेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे सदर शिष्यवृत्तीचे वाटप होईल

१. अर्ज करण्याची पध्दत :

२. पात्रता :

a) महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीयशासनमान्य अनुदानितस्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थी/विद्यार्थीनीस या परीक्षेस बसता येते

b) पालकांचे (आई व वडील दोघांचे मिळून) वार्षिक उत्पन्न १,५०,०००/- पेक्षा कमी असावे. नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापना प्रमुखांचा व इतरांनी तहसीलदारांचा / तलाठ्यांचा सन २०२०-२१ च्या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा. सदरचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करून ठेवावा.

आवश्यक बाबी :

1)  उत्पन्न 1,50,000 पेक्षा कमी 2)  वर्ग 7 मध्ये कमीत कमी 55 % 3) Form शाळेच्या माध्यमातून Online भरावा लागतो 4) आधार कार्ड  5)Bank Pass Book ( नसल्यास आई / वडिलांचे सुद्धा चालेल) 6) उत्पन्न दाखला  7)फोटो, सही 8) आई किंवा वडील सरकारी सेवेत नसावे 9) ही परीक्षा फक्त वर्ग 8 मधीलच विध्यार्थी देऊ शकतात  10) या परीक्षेत करीता विद्यार्थी हा जिल्हा परिषद, नगरपरिषद, महानगरपालिका किंवा इतर शासनमान्य शाळेत शिकणारा असावा  11) विद्यार्थी Student ID 12) एकूण बहीण भाऊ संख्या  13) परीक्षा फी 100 रु  (Online खर्च व Late fees सोडून )( वरील dacument मध्ये बदल होऊ शकतो )

c) विद्यार्थी/विद्यार्थीनी इ.७ वी मध्ये किमान ५५% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. (SC / ST चा विद्यार्थी किमान ५०% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा.)

d) खालील विद्यार्थी NMMS परीक्षेसाठी अपात्र आहेत.

  •  विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी.
  •  केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.
  •  जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.
  •  शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचाभोजनव्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी.
  •  सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी.

३. विद्यार्थ्याची निवड:-

विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षेमधून करण्यात येईल. संबंधित लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे व राज्याने निश्चित केलेल्या मागासवर्गीयांसाठीच्या आरक्षणानुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.

४. परीक्षेचे वेळापत्रक :-

महाराष्ट्रातील विविध केंद्रावरशिक्षणाधिकारी (माध्यमिक) किंवा शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई यांचे मार्फत  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही परीक्षा घेणार आहे. सदर परीक्षेचे वेळापत्रक खालील असते .

अ क

विषयाचे नाव

एकूण गुण

एकूण प्रश्न

कालावधी

वेळ

पात्रता गुण

बौद्धिक क्षमता चाचणी Mental Ability Test(MAT)

९०

९०

दीड तास(फक्त दृष्टी दिव्यांग ३० मिनिटे जड वेळ )

१०.३० ते १२.००

४०%

विश्रांती १२.३० ते १३.३०

शालेय क्षमता चाचणी Scholastic AptitudeTest(SAT)

९०

९०

दीड तास(फक्त दृष्टी दिव्यांग ३० मिनिटे जड वेळ )

१०.३० ते १२.००

 

सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ४०% मिळणे आवश्यक आहेत. (SC, ST व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ३२% मिळणे आवश्यक आहेत.)

५. परीक्षेसाठी विषय:-

सदर परीक्षेसाठी २ विषय असतील.

a) बौध्दिक क्षमता चाचणी (MAT) :- ही मानशास्त्रीय चाचणी असूनत्यामध्ये कार्यकारणभावविश्लेषणसंकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित ९० बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात.

b) शालेय क्षमता चाचणी (SAT):- ही सामान्यतः इयत्ता ७ वी व इयत्ता ८ वीच्या अभ्यासक्रमांवर आधारित असेल. त्यामध्ये १. सामान्य विज्ञान एकूण (गुण-३५) २. समाजशास्त्र (एकूण गुण ३५ ) ३. गणित (एकूण गुण २०) असे तीन विषय असतील या तीन विषयांचे एकूण ९० प्रश्न सोडवायचे असतात.

उपविषयावर गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल.

a. सामान्य विज्ञान ३५ गुण: भौतिकशास्त्र ११ गुणरसानशास्त्र ११ गुणजीवशास्त्र १३ गुण

b. समाजशास्त्र ३५ गुण:- इतिहास १५ गुणनागरिकशास्त्र ०५ गुणभूगोल १५ गुण

c. गणित २० गुण.

NMMS परीक्षा 2022 अंतिम निकाल जाहीर Eaxm Result declared  CLICK HERE

NMMS EXAM - सन २०१५ ते २०२१ प्रश्नपत्रिका संच (इयत्ता ८ वी) राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा    CLICK HERE

NMMS EXAM 2022 - प्रवेश अर्ज नमुना व शाळा नोंदणी अर्ज pdf   CLICK HERE

६. माध्यम :-

प्रश्नपत्रिका मराठीइंग्रजीहिंदीगुजराथीउर्दूसिंधीकन्नड व तेलुगू या आठ माध्यमातून उपलब्ध असतील. (सर्व विद्यार्थ्यांना मूळमाध्यमाबरोबर इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका एकत्र देण्यात येणार आहे.) यापैकी कोणतेही एकच माध्यम घेता येईल. दोन्ही प्रश्नपत्रिकांसाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिल्या जातील प्रत्येक प्रश्नक्रमांकापुढे पर्यायांसाठी ४ वर्तुळे असतील. योग्य पर्यायाचे वर्तुळ निळे/काळे बॉलपेनने पूर्णत: रंगवून उत्तर नोंदवायचे आहे. पेन्सिलचा वापर केलेली / अपुरी / अशंत: रंगवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत. एकापेक्षा अधिक वर्तुळात नोंदविलेली/उत्तरे/चुकीच्या पध्दतीने नोंदवलेली उत्तरे/ व्हाईटनर /खाडाखोड करुन नोंदविलेली किंवा गिरवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत.

७. आरक्षण व शिष्यवृत्ती संख्या:

अखिल भारतील पातळीवर NMMS शिष्यवृत्तींची संख्या एक लाख इतकी आहे. महाराष्ट्रासाठी ११६८२ इतका कोटा निश्चित करुन दिलेला आहे. कोटयानुसार व राज्याच्या संवर्गनिहाय आरक्षणानुसारगुणवत्तेच्या आधारे जिल्हानिहायसंवर्गनिहाय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते. दिव्यांगासाठी (अपंगासाठी) प्रत्येक संवर्गात राज्याच्या दिव्यांग आरक्षणानुसार आरक्षण असेल. जिल्हयासाठीचा कोटा व विद्यार्थ्यांच्या जातसंवर्गाप्रमाणे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्या प्रदान करण्यात येतील.

८. शुल्क :-

परीक्षेसाठी खालीलप्रमाणे शुल्क आकारण्यात येते.

अ क्र

तपशील

दिनांक

शुल्क

शाळा संलग्नता फी

ऑंनलाइन आवेदनपत्र सादर करणे

०६/०४/२०२२ ते २६/०४/२०२२

१००/-

 


शाळा संलग्नता फी रु २००/- प्रति संस्था शैक्षणिक वर्षासाठी

ऑंनलाइन विलंबाने आवेदनपत्र सादर करणे

२७/०४/२०२२ ते ०१/०५/२०२२

२००/-

ऑंनलाइन अति विलंबाने आवेदनपत्र सादर करणे

(शाळा/संस्थाजबाबदार असेल तर )

०२/०५/२०२२ ते ०६/०५/२०२२

३००/-

 

 

 

४००/-

 

९. निकाल घोषित करणे :-

सदर परीक्षेचा निकाल साधारण जून च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवडयात जाहीर करण्यात येतो . सदर परीक्षेचा निकाल व निवडयादी फक्त परिषदेच्या संकेतस्थळावरच उपलब्ध केली जाईल. जिल्हयांनी शाळांनी व विद्यार्थ्यांनी सदरचा निकाल परिषदेच्या संकेतस्थळावरुनच काढावयाचा आहे.

१०. शिष्यवृत्ती दर :-

शिष्यवत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास इ.९ वी ते १२ वी पर्यंत दरमहा रु. १,०००/ ( वार्षिक रु.१२,०००/-) शिष्यवृत्ती दिली जाते.

 शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी इ.९ वी व इ. ११ वी मध्ये किमान ५५% गुण मिळणे आवश्यक आहे (SC/ST विद्यार्थ्यांना किमान ५०% गुणांची आवश्यकता आहे)

 इ. १० वी मध्ये किमान ६०% गुण मिळणे आवश्यक आहेत. (SC/ST विद्यार्थ्यांना किमान ५५% गुणांची आवश्यकता आहे)

सदर शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे मुख्याध्यापकशिक्षणाधिकारी (माध्य.) व मा. शिक्षण संचालक (माध्य. व उच्च माध्य.) यांचे मार्फत केले जाते

११. अनधिकृततेबाबत इशारा :-

मानव संसाधन विकास मंत्रालय (MHRD), नवी दिल्ली / महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदपुणे यांचे शिवाय अन्य कोणत्याही संस्थेस या प्रकारची परीक्षा किंवा पूर्व परीक्षा घेणेप्रमाणपत्र देणे. शिष्यवृत्ती देणे या करिता महाराष्ट्रात प्राधिकृत करण्यात आलेले नाही. अशा संस्थाबाबतची कोणतीही जबाबदारी मानव संसाधन विकास मंत्रालय (MHRD), नवी दिल्ली / महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदपुणे यांचेवर राहणार नाही

 



Post a Comment

0 Comments