Subscribe Us

मध्यान्ह भोजन आहार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी भरारी पथके आणि दक्षता पथके स्थापन - MDM FLYING SQOAD

मध्यान्ह  भोजन आहार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी भरारी  पथके आणि दक्षता पथके स्थापन 

 नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाली असून शाळांमधून विद्यार्थ्यांना मध्यान्ह  भोजन आहार योजनेअंतर्गत आहार उपलब्ध करून देण्यात येत आहे तथापि राज्यातील शाळांमधून शालेय पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीमध्ये  विद्यार्थ्यां
ना आहाराचे वाटप कमी करणे, निकृष्ट प्रतीचा आहार मुलांना देणे ,आहाराचे वाटप न करणे ,योजनेमध्ये गैरव्यवहार करणे इत्‍यादी स्वरूपाच्या तक्रारी शासनाकडे येत आहेत तसेच योजनेबाबत वर्तमानपत्रांमध्ये प्रतिकूल स्वरूपाच्या बातम्या छापून येत असतात विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे पोषण आहार मिळण्यासाठी योजनेची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे याकरता खालील प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी असे असे माननीय शिक्षण संचालक प्राथमिक यांनी खालील सूचनाद्वारे कळविले आहे 


  • शासन निर्णयानुसार शालेय पोषण आहार योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक जिल्हा स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली भरारी पथक स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे
  • जिल्हास्तरावरील भरारी पथक कार्यान्वित  करण्यासाठी जिल्हा परिषदेमधील एक अधिकारी आणि दोन कर्मचारी यांची भरारीपथकात नियुक्ती करण्यात यावी सदर पथकामार्फत जिल्ह्यातील शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजनेची अंमलबजावणी होत आहे किंवा कसे यावर तपासणी करण्यात यावी
  • भरारी पथकामार्फत जिल्ह्यातील ग्रामीण तसेच नागरी भागातील पात्र शाळांची आणि केंद्रीय स्वयंपाक गृह ची  तपासणी करण्यात यावी 
  • शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भरारी पथकामध्ये पाठविण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांची नावे निश्चित करावी त्यानंतर संबंधित पथकास  शाळा तपासणीचा कार्यक्रम निश्चित करून द्यावा भरारी पथकाचा शाळा तपासणीचा कार्यक्रम गोपनीय ठेवण्यात यावा  जेणेकरून अचानक शाळा तपासणी होऊन वस्तुस्थिती निदर्शनास येईल . भरारी पथक कार्यान्वित होण्यासाठी एक अधिकारी आणि किमान दोन कर्मचारी यांनी यांची वेळोवेळी नियुक्ती करण्यात यावी
  •  प्रत्येक जिल्ह्यामध्ये दरमहा किमान १० शाळांची  तपासणी पथकामार्फत करण्यात यावी  भरारी पथकास  आढळून आलेल्या बाबी , भरारी पथकामध्ये पथकाच्या प्रमुखाने  तीन दिवसाच्या आत अहवाल सादर करून मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या निदर्शनास आणाव्यात  सदर अहवाल प्राप्त झाल्या नंतर  ज्या शाळांच्या योजनेच्या अंमलबजावणीत त्रुटी आहेत  त्या शाळांमध्ये योजनेच्या अंमलबजावणीबाबत सुधारणा करण्यात यावेत   मात्र ही योजना राबविली जात असताना गैरव्यवहार झाला असल्यास  संबधितांवर  योग्य ती कारवाई करण्यात यावी 
  • जिल्हा स्तरावरील भरारी/ दक्षता पथकाप्रमाणे तालुकास्तरावर सुद्धा  भरारी पथके दक्षता पथके स्थापन करून योजनेची तपासणी करावी 
  • सदर भरारी पथकांकडून  आपण संदर्भीय शासन निर्णयानुसार योजनेच्या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व ठिकाणी शाळांना भेटी देऊन  तपासणी करावी  तपासणी दरम्यान   आढळून येणाऱ्या त्रुटीचे  तात्काळ निराकरण करणे तसेच योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना  उत्तम प्रकारे होण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करावी 
  • शालेय पोषण आहार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी साठी वरीलप्रमाणे पथकामार्फत  यादृच्छिक  पद्धतीने तसेच गोपनीय पद्धतीने तपासण्या कराव्यात.  सदर तपासणी बरोबर संबंधित यंत्रणांनी नियमित तपासणी करणे आवश्यक आहे .

भरारी दक्षता पथकाने तपासणी करण्याबाबी  संदर्भातील पत्र सोबत जोडलेल्या परिशिष्ट अ ब आणि क नुसार तपासणी नमुना घेणे यामुळे आवश्यकतेनुसार अधिकची माहिती समाविष्ट करण्यात यावी प्रत्येक जिल्हा व तालुका भरारी पथकाने केलेल्या शाळा भेटी कार्यक्रमाची माहिती संबंधित शिक्षणाधिकारी यांनी संकलित करून एकत्रित गोषवारा  परिशिष्ट  इ फ मधील तक्त्यात दरमहा दहा तारखेच्या आत mdmdep@gmail.com या मेल वर पाठवावा  असे मा शिक्षण संचालक प्राथमिक यानी दिनांक च्या परिपत्रकाद्वारे आदेश दिले आहे .

 शालेय पोषण आहार योजना शाळा तपासणी नमूना परिशिष्ट अ CLICK HERE

 संकलन  परिशिष्ट  ड  इ आणि फ  CLICK HERE

शालेय पोषण आहार योजना  केंद्रीय स्वयंपाकगृह तपासणी  प्रपत्र  परिशिष्ट ब  CLICK HERE

केंद्रीय स्वयंपाकगृह तपासणी  प्रपत्र  परिशिष्ट क  CLICK HERE

 भरारी  पथके आणि दक्षता पथके स्थापन करणे परिपत्रक  CLICK HERE

मध्यान्ह भोजन योजना  ( MDM )दैनंदिन उपस्थिती  भरण्यासाठी APP व WEBSITE  ची माहिती  CLICK HERE

 MDM योजनेचे 5 वर्षाचे ऑडिट होणार  https://bit.ly/3PxIIr5


🔰 मध्यान्ह भोजन आहार योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांचे आधार कार्ड असणे आवश्यक  CLICK HERE


नवीन शैक्षणिक बातमी व शासन निर्णय चे अपडेट साठी eZPschool(edunews&GR) या WhatsApp group Join करा

  https://bit.ly/3yMbj6G 

https://bit.ly/3nL4WtX




Post a Comment

0 Comments