Subscribe Us

अखेर आंतरजिल्हा बदलीचा संभ्रम दूर ; ३९४३ बदल्यांवरच ग्रामविकास चे शिक्कामोर्तब ...!

अखेर आंतरजिल्हा बदलीचा संभ्रम दूर ; ३९४३ बदल्यांवरच ग्रामविकास चे शिक्कामोर्तब ...!

जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया काल दि.२१ ऑगस्ट रोजी विंसिस या खाजगी कंपनीकडून ओटीटी सॉफ्टवेअर द्वारे पार पडली होती.या प्रक्रियेत ३१ तासात ३९४३ शिक्षकांच्या बदल्या ३४ जिल्हा परिषद मधून पूर्ण झाल्याची जिल्हा निहाय आकडेवारी सोशल मीडिया वर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती.या आकडेवारी बाबत अनेक शिक्षकांनी शंका उपस्थित केल्याने संघटनेकडून बदली झालेल्या आकडेवारी बाबत सत्यता व खातरजमा पळताळून पाहण्यासाठी बदली अभ्यास गटाचे अध्यक्ष मा.आयुष प्रसाद व राज्य समन्वयक मा.सचिन ओंबासे साहेब यांचेशी सविस्तर चर्चा करण्यात आली.त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ३९४३ शिक्षकांच्या आकडेवरीला दुजोरा दिला.मात्र त्याचवेळी विन्सिस कंपनीचे अधिकारी निलेश देवदास यांनी आम्ही कंपनीकडून कुठलीही अधिकृत व कार्यालयीन प्रमाणित माहिती आंतरजिल्हा बदली विषयी जाहीर केलेली नसून जी माहिती सोशल मीडियावर पसरविल्या गेली ती कंपनीकडून देण्यात आलेली नसून प्रमाणित व अधिकृत नसल्याचे सांगण्यात आले.या दोन्ही परस्पर विरोधी भूमिकेने आंतरजिल्हा बदली च्या सत्य आकडेवारी बाबत मोठा संभ्रम निर्माण झाला होता


आंतरजिल्हा बदली प्रक्रिया २०२२  व आंतरजिल्हा बदलीचे सर्व  शासन निर्णय 

.अखेआंतरजिल्हा बदली प्रक्रिया २०२२  व आंतरजिल्हा बदलीचे सर्व  शासन निर्णय Inter district transfer GRर आज नुकतीच ग्रामविकास विभाग स्तरावर मा.अतिरिक्त मुख्य सचिव यांचेसोबत माजी राज्यमंत्री मा. बच्चुभाऊ कडू यांच्या माध्यमातून भ्रमणध्वनीद्वारे चर्चा करण्यात आली.झालेल्या आंतरजिल्हा बदल्या ह्या मराठी व उर्दू दोन्ही माध्यमाच्या एकत्रित असून ३४ जिल्हा परिषदेची आउटगोइंग अंतिम आकडेवारी ही ३९४३ हिच असल्याचे सांगण्यात आले.मात्र ती कंपनीकडून ऑफिशियली अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.झालेल्या बदल्या ह्या साखळी व रिक्त अश्या दोन्ही प्रक्रियेने झाल्याचेही सांगण्यात आले.याबाबत अधिक सविस्तरपणे असे की , प्रत्येक ५० शिक्षकांपैकी एकाची त्यांच्या आवडीनुसार नवीन जिल्ह्यात सेवा देण्यासाठी बदली करण्यात आलेली आहे.अंदाजे १,९४८५९ जिल्हा परिषद शिक्षकांपैकी २.०२% शिक्षकांच्या बदल्या या प्रक्रियेत झाल्या आहेत.


आंतरजिल्हा बदलीसाठी एकूण ११ हजार ८७१ शिक्षकांनी ओटीटी सॉफ्टवेअर द्वारे अर्ज केले होते . अर्जदारांपैकी ३३.२१% शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत.ही आतापर्यंतची सर्वाधिक बदली संख्या असून २०१९ मध्ये झालेल्या तिसऱ्या टप्प्यात  ती ८.९१%  , २०१८ दुसऱ्या टप्प्यात १८.३६% आणि २०१७ मध्ये झालेल्या पहिल्या टप्प्यात ती २४.५६% इतकी होती.झालेल्या बदल्या ह्या अधिकाधिक शक्य तितक्या करण्यात आलेल्या असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


अखेर ग्रामविकास विभागाकडून याबाबत स्पष्ट चित्र पुढे आल्याने आंतरजिल्हा बदल्या ह्या ३९४३ इतक्याच असल्याचे स्पष्ट झाले आहे.सर्व शिक्षक बांधवांचा संभ्रम वेळीच दूर व्हावा या उद्देशाने मंत्रालय स्तरावरील चर्चेतून ही माहितीपर पोस्ट देण्यात येत आहे.


*यापूर्वी झालेल्या बदल्यांची आकडेवारी थोडक्यात पुढीलप्रमाणे ,*

२०१७ टप्पा १ - एकूण अर्ज २१,९७४ , पैकी बदल्या ५,३९९ , सन २०१८ टप्पा २- एकूण अर्ज १९,३४७ पैकी बदल्या ३,५५३ , सन २०१९ टप्पा ३ - १३,५५८ पैकी बदल्या १,२११ , सन २०२० टप्पा ४ - अर्ज १२,३४७ पैकी बदल्या १,८९० अश्या प्रकारे मागील चार टप्प्यात एकूण १२ हजार ५३ शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत.तर आता यावर्षीच्या २०२२ मध्ये ३,९४३ मिळून आज रोजी पर्यंत १५ हजार ९९६ शिक्षकांच्या ऑनलाईन आंतरजिल्हा बदल्या पूर्ण झाल्या आहेत.


उपरोक्त माहिती ही वस्तुनिष्ठ स्वरूपाची असून ग्रामविकास विभाग स्तरावरून नुकतीच घेण्यात आलेली आहे.आज दि.२२ रोजी दुपारी आंतरजिल्हा बदलीचे आदेश ग्रामविकास मंत्री मा.ना.गिरीष महाजन साहेब यांचे हस्ते प्रकाशित केली जाणार असून नंतर ती लगेच शिक्षकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. जिल्हांतर्गत बदली विषयी सविस्तर माहिती लवकरच देण्यात येईल. 

Post a Comment

0 Comments