Subscribe Us

सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरिता सारथी शिष्यवृत्ती इयत्ता नववी व दहावीच्या NMMS परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी माहिती भरणेबाबत Sarathi Scholarship


सन
 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरिता छत्रपती राजाराम महाराज सारखी शिष्यवृत्तीसाठी इयत्ता नववी व इयत्ता दहावीच्या मराठा, कुणबी ,कुणबी-मराठा व मराठा -कुणबी या  लक्षीत गटातील पात्र  विद्यार्थ्यांची माहिती भरणेबाबत 

राज्यातील NMMS परीक्षा उत्तीर्ण झालेले पण केंद्र सरकारची शिष्यवृत्तीसाठी पात्र (NOT SELECTED) नसणारे मराठा, कुणबी ,कुणबी-मराठा व मराठा -कुणबी  या लक्षित गटातील  तसेच आर्थिक दुर्बल घटकातील इयत्ता नववी ते बारावीपर्यंत नियमित  शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी  यांचे मार्फत छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना सन 2021-22 या वर्षापासून सुरू केलेली आहे 

सदर शिष्यवृत्ती योजनेत  यावर्षी ९ नववी मध्ये शिकत असलेले तसेच मागील वर्षी नववी मध्ये सारथी शिष्यवृत्ती मिळालेली आहे व यावर्षी दहावी मध्ये शिकत असलेल्या  मराठा, कुणबी ,कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या  लक्षीत गटातील गटातील पात्र विद्यार्थ्यांना लागू करण्यात येत आहे 

  1. मुख्याध्यापकांनी वर्ग शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांची ऑनलाइन माहिती सारथीने  दिलेल्या पुढील लिंक वर भरावी इयत्ता नववी व इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्रपणे लिंक देण्यात आली आहे.   (महत्त्वाचे - विद्यार्थ्यांनी सदर लिंक भरू नये आपले वर्ग शिक्षक यांना कागदपत्र द्यावे व त्यांना लिंक भरण्यास सांगावे  )

    1. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना    https://forms.gle/DX3tLdkyGzhqtK1v8  या वरील लिंक वरून माहिती इंग्रजी भाषेत भरावी.
    2. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी https://forms.gle/f3Uf1tpETtLxcAyX9  या वरील लिंक वरून माहिती इंग्रजी भाषेत भरावी.

पात्र विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षकाच्या मदतीने खालील लिंक वर आपली माहिती भरावी माहिती (इंग्रजी भाषेमध्ये भरावी )

NMMS परीक्षा अंतिम निवड यादी जाहीर   SELECTION LIST 2022

इयत्ता 9 वी ते इयत्ता12 वी मधील विद्यार्थ्यांना वार्षिक 9600 रुपये शिष्यवृत्ती -छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना 

या शिष्यवृत्तीसाठी खालील प्रमाणे कागदपत्र सादर करण्यात यावी 

  1. विद्यार्थ्यांची स्वाक्षरीत विहित नमुन्यात अर्ज
  2.  मुख्याध्यापक स्वाक्षरीत विहित नमुन्यातील शिफारस पत्र प्रपत्र क 
  3. विद्यार्थ्यांच्या पालकाचा तहसीलदाराची सन 2022-23 या वर्षातील उत्पन्नाच्या दाखल्याची सत्यप्रत 
  4. विद्यार्थ्यांची आधार कार्डची सत्यप्रत 
  5. विद्यार्थ्यांचे बँक खाते पासबुकची पहिल्या पानाची सत्यप्रत 
  6. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची नववी मधील गुणपत्रिका
  7. NMMS ची परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रिका 

सदर माहिती  भरल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढून विद्यार्थ्यांनी आपल्या मुख्याध्यापकामार्फत /गटशिक्षणाधिकारी मार्फत  शिक्षणाधिकारी क यांच्याकडे सदर कागदपत्र पोहोच करावीत

NMMS परीक्षा अंतिम निकाल जाहीर Eaxm Result declared 

NMMS  EXAM - सन २०१५ ते २०२१  प्रश्नपत्रिका संच (इयत्ता ८ वी)  


Post a Comment

0 Comments