Subscribe Us

NMMS शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन प्रक्रिया- HOW TO REGISTER NMMS SELECTED STUDENT FOR SCHOLARSHIP


मा शिक्षण संचालक  माध्यमिक व उच्च माध्यमिक यांचे सविस्तर सूचना पत्र CLICK HERE


NMMS शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन प्रक्रिया सूचना 

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक 19 जून 2022 9  वी मधील Fresh व Renewal मधील विद्यार्थ्यांची माहिती संकेतस्थळावर विद्यार्थी शाळा जिल्हा नोडल ऑफिसर केंद्रशासन या पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने भरून  verify करणे आवश्यक आहे 

याबाबत पात्र विद्यार्थ्यांच्या याद्या  ई-मेल द्वारे शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना पाठविण्यात आलेल्या आहेत  2021 22 करिता केंद्र शासनाकडून वेळोवेळी ज्या सूचना प्राप्त होतील त्याप्रमाणे कार्यवाही  करणे आवश्यक आहे 

  1.  केंद्र शासनाच्या दिनांक 28 जुलै 2022 मधील परिपत्रकामधील खालील सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात यावे 
  2. ज्या पालकाचे उत्पन्न दीड लाख 150000 पेक्षा जास्त आहे अशा विद्यार्थ्यांना या  शिष्यवृत्ती साठी अपात्र करणे 
  3. खाजगी विनाअनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना अपात्र करणे
  4.  केंद्रीय विद्यालय जवाहर नवोदय विद्यालय तसेच  राज्यशासनाकडून वस्तीगृहाची सवलत असलेल्या शासकीय तसेच खाजगी अनुदानित शाळेतील,सैनिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अपात्र करणे (इयत्ता 9 वी इयत्ता 10 वी , इयत्ता11वी , इयत्ता12वी साठी लागू )
  5.  इयत्त्ता 9 वी , इयत्ता11वी ,  नूतनीकरणाची माहिती सादर करताना सर्वसाधारण विद्यार्थ्यांचे जनरल 55 टक्के पेक्षा व अनुसूचित जाती /जमाती विद्यार्थ्यांचे 50 टक्के पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे
  6.  इयत्ता दहावी नंतर शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश घेतला असल्यास त्यास अपात्र   करण्यात यावे
  7. इयत्ता दहावी मधील सर्वसाधारण (जनरल) विध्यार्थ्यास  60 टक्के पेक्षा जास्त व अनुसूचित जाती /जमाती विद्यार्थ्यांचे 55  टक्के पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे
  8.   इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांची माहिती सादर करताना विद्यार्थ्यांना राष्ट्रीयकृत बँकेत स्वतंत्र खाते काढणे आवश्यक आहे   पालकांसोबत संयुक्त खाते काढण्यात येऊ नये
  9.  पात्र विद्यार्थ्याचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे असून आधार क्रमांक बँक  खातेशी संलग्न करण्यात यावा त्याशिवाय विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा केली जाणार नाही
  10. उपलब्ध करून देण्यात आलेल्या यादीतील विद्यार्थ्याच्या प्रवर्गात कोणताही बदल करण्यात येय नये 
  11. online  माहिती भरण्यासाठी पालक विद्यार्थ्याचा मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे 






 ऑनलाईन माहिती भरताना पुढील सूचनांचे पालन करण्यात यावे 

वेबसाईट लिंक https://scholarships.gov.in/





 शिक्षणाधिकारी यांनी त्यांच्या अधिपत्याखाली सर्व शाळांचे   profile update करणे तपासणे आवश्यक आहे निवड यादीतील पात्र Fresh- Renewal विद्यार्थी माहिती भरण्याची अंतिम दिनांक 30 सप्टेंबर 2022 पर्यंत आहे शिष्यवृत्तीधारक कोणताही विद्यार्थी हा ऑनलाईन माहिती भरली नाही म्हणून शिष्यवृत्ती पासून वंचित राहिल्यास त्याची जबाबदारी  शिक्षणाधिकारी मुख्याध्यापकांची राहील 



Post a Comment

0 Comments