विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ जिल्हांतर्गत बदलीबाबत संपूर्ण महिती
विशेष संवर्ग शिक्षक भाग - १
खाली नमूद संवर्गाचे शिक्षक हे विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ म्हणून गणले जातील.
१. पक्षाघाताने आजारी शिक्षक (Paralysis)
२. दिव्यांग शिक्षक (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णय दिनांक १४.१.२०११ मधील नमूद प्रारुपाप्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक), मानसिक विकलांग मुलांचे व दिव्यांग मुलांचे पालक (पालक म्हणजे आई वडील किंवा ते नसल्यास बहिण भाऊ).
तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत असे शिक्षक.
३. हृदय शस्त्रक्रिया झालेले शिक्षक
४. जन्मापासून एकच मूत्रपिंड (किडनी) असलेले / मूत्रपिंड रोपण केलेले शिक्षक / डायलीसीस सुरु असलेले शिक्षक
५. यकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक.
६. कॅन्सरने (कर्करोग) आजारी शिक्षक
७. मेंदूचा आजार झालेले शिक्षक
८. थॅलेसेमिया विकारग्रस्त मुलांचे पालक / जन्मजात गुणसुत्रांच्या दोषांमुळे उद्भवणारे आजार (उदा. Methyl Malonic Acidemia (MMA) Classical type (Mutase defiency व इतर आजार)} (पालक म्हणजे आई-वडील किंवा ते नसल्यास बहिण भाऊ
९. माजी सैनिक तसेच आजी/माजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी / विधवा *
१०. विधवा शिक्षक
११. कुमारीका शिक्षक
१२. परित्यक्ता / घटस्फोटीत महिला शिक्षक
१३. वयाची ५३ वर्षे पूर्ण झालेले शिक्षक झालेले शिक्षक
१४. स्वांतत्र्य सैनिकांचा मुलगा / मुलगी / नातू / नात (स्वातंत्र्य सैनिक हयात असेपर्यंत)
खालील आजाराने ज्या शिक्षकांचे जोडीदार व्याधिग्रस्त आहेत असे शिक्षक
१५. हृदय शस्त्रक्रिया झालेले.
१६. जन्मापासून एकच मूत्रपिंड (किडनी) असलेले / मूत्रपिंड रोपण केलेले कर्मचारी / डायलिसीस सुरु असलेले.
१७. यकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक
१८. कॅन्सरने (कर्करोग) आजारी असलेले शिक्षक
१९. मेंदूचा आजार झालेले.
२०. थॅलेसेमिया विकारग्रस्त असलेले.
विशेष संवर्ग 1 व 3 यांना निव्वळ रिक्त मिळणार नाही Vinsys चे अधिकारी यांनी केलेले मार्गदर्शन audio viral CLICK HERE
विशेष संवर्ग शिक्षक भाग -१ अर्जाचा नमुना विवरण पत्र ३ CLICK HERE
विशेष संवर्ग भाग 1 व 2 साठी फॉर्म भरणे. दि. /11/2022 ते /11/2022
- विशेष संवर्ग भाग 1 मध्ये येत असलेल्या शिक्षकांनी पोर्टलवर लॉगिन करून आपल्याला बदली पाहिजे असल्यास वरील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये होकार नोंदवावा जेणेकरून बदली यादी मध्ये आपले नाव समाविष्ट केले जाईल
- व विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 नुसार पात्र असलेल्या शिक्षकाचे नाव बदली पात्र शिक्षक यादीमध्ये येत असल्यास व बदली नको असल्यास वरील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये ऑनलाईन पोर्टलवर नकार नोंदवावा जेणेकरून आपले नाव यादीतून कमी केले जाईल
- तसेच विशेष संवर्ग भाग 2 मध्ये दोन्हीही शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये येत असल्यास ज्यांना आपल्या जोडीदाराजवळ जायचे आहे त्यांनी वरील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये ऑनलाईन पोर्टलवर होकार नोंदवावा जेणेकरून त्यांचे नाव यादीमध्ये समाविष्ट करण्यात येईल
- व ज्या जोडीदाराजवळ जायचे आहे त्यांचा नकार नोंदवावा त्यांचे नाव यादीतून कमी करण्यात येईल
- दोघांपैकी (म्हणजेच जोडीदारांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व एक इतर कर्मचारी ) एकच जण बदली प्रक्रियेमध्ये येत असल्यास एकानेच ऑनलाइन पोर्टलवर होकार नोंदवावा
- विशेष संवर्ग भाग 2 चे शिक्षक दोघांची सेवा क्षेत्रनिहाय सलग दहा वर्षापेक्षा कमी असेल व बदलीने सोय होत नसल्यास दोघांनाही नकार देता येतो अर्थातच पसंती क्रमांक न दिल्यास नकार समजला जातो तरीसुद्धा पोर्टलवर नका देण्याचा प्रयत्न करावा हा मुद्दा GR प्रमाणे लागू होतो
- विशेष संवर्ग भाग 1 साठी प्राधान्यक्रम भरणे- दि.24/11/2022 ते 26/11/2022 (3 दिवस)
- विशेष संवर्ग भाग 1 मध्ये येत असणाऱ्या शिक्षकांनी वरील 3 दिवसांमध्ये पोर्टलवर आपला 30 किंवा आपल्या आवश्यकतेनुसार पोर्टलवर प्राधान्यक्रम नोंदवावा
- या शिक्षकांना आपल्या प्राधान्य क्रमानुसार शाळा न मिळाल्यास पूर्वीचीच शाळा कायम राहील
- जिल्हांतर्गत बदली शासन निर्णय दिनांक ७ एप्रिल २०२१ CLICK HERE
४.२ टप्पा क्र. २ :- विशेष संवर्ग शिक्षक भाग -१ यांच्या बदल्या
४.२.१. टप्पा क्र.१ प्रमाणे कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व विशेष संवर्ग-१ शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी (Submit) तिन दिवसांचा अवधी देण्यात येईल.
गावांचा पसंती क्रम भरताना कमीत कमी 1 व जास्तीत जास्त 30 गावांचा पसंती क्रम देणे अनिवार्य राहील तद्नंतर विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ यांच्या बदल्या करण्यात याव्यात.
४.२.२. विशेष संवर्ग माग- १ शिक्षकांना केवळ त्यांच्या विनंतीवरुनच बदली देण्यात येईल. ज्या विशेष संवर्गातील शिक्षकांना बदली नको असेल, मात्र त्यांचे नाव बदलीस पात्र शिक्षकांच्या यादीत आले असल्यास त्यांनी सोबत जोडलेल्या विवरणपत्र क्र. ३ मध्ये स्वयंघोषित प्रमाणपत्र देणे आवश्यक राहील.
४.२.३. विशेष संवगांतर्गत विनंती बदलीसाठीचा प्राधान्यक्रम हा विशेष संवर्ग शिक्षकांच्या वरील व्याख्येमध्ये नमूद केलेल्या क्रमवारीनुसार राहील.
४.२.४. एखाद्या विशिष्ट संवर्गामध्ये अनेक कर्मचाऱ्यांनी विनंती बदली मागितली असल्यास त्यांच्या सेवाज्येष्ठता विचारात घेऊन जेष्ठ कर्मचार्यास प्रथमतः बदली अनुज्ञेय राहील.
४.२.५. सेवाज्येष्ठता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचार्यास प्राधान्याने बदली अनुज्ञेय राहील.
४.२.६. या संवर्गातील शिक्षकांचे बदल्यांसाठी प्राधान्यक्रमानुसार यादी तयार करण्यात येईल. या यादीच्या आधारे बदली करताना, शिक्षकांचा पसंतीक्रम विचारात घेऊन ज्या शाळांमध्ये बदलीस पात्र शिक्षक उपलब्ध असतील त्या शाळेत प्राधान्यानुसार शिक्षकांची बदली करण्यात येईल. जर एखाद्या विशेष संवर्ग शिक्षकाला त्यांच्या पसंतीक्रमाप्रमाणे एकाही शाळेमध्ये (तेथे बदलीस पात्र शिक्षक उपलब्ध नसल्याने) बदली देता आली नाही तर त्याची बदली होणार नाही.
४.२.७ विशेष संवर्ग भाग -१ अंतर्गत एकदा बदलीचा लाभ घेतल्यानंतर संबंधित शिक्षकांना पुढील तीन वर्ष विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही.
४.२.८ विशेषसंवर्ग भाग -१ मध्ये गणले जाण्यासाठी संबंधित शिक्षकांनी त्याबाबतचे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे अनिवार्य राहील. सदरच्या अर्जाच्या पात्रतेबाबत संबंधित गटाचे गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी व तालुका आरोग अधिकारी यांची समिती निर्णय घेईल.
संवर्ग १ व २ मधील शिक्षकांनी ठेवावयाचे आवश्यक पुरावे CLICK HERE
विशेष संवर्ग भाग 1 संदर्भात शंका समाधान
1 शाळांच्या प्राधान्यक्रमात किती शाळांचा प्राधान्यक्रम देणे अनिवार्य आहे?
विशेष संवर्ग भाग 1 ने फॉर्म भरताना फॉर्म मध्ये कमीत कमी 1 व जास्तीत जास्त 30 शाळंचा प्राधान्यक्रम भरणे गरजेचे आहे
2. बदली फॉर्म मधील प्राध्यान्यक्रमातील शाळांना न मिळाल्यास विस्थापित होईल काय?
विशेष संवर्ग भाग 1 बदली प्रक्रियेमध्ये आपण दिलेल्या प्राधान्यक्रमातील शाळा न मिळाल्यास आपल्याला पूर्वीच्याच शाळेवर कायम ठेवण्यात येत
3 विशेष संवर्ग भाग 1 बदली प्रक्रियेमध्ये नकार किंवा होकार देऊ शकतो काय?
विशेष संवर्ग भाग 1 मधील शिक्षकांच्या बदल्या ह्या फक्त विनंतीवरून होऊ शकतात विशेष संवर्ग भाग 1 मधील शिक्षक बदली पात्र यादीमध्ये येत असतील तर त्यांना बदली हवी असल्यास बदली मागू शकतात अन्यथा बदलीला नकार म्हणून बदली पूर्वीच विकल्प भरून देऊ शकतात.
४ सध्याच्या शाळेवर ३ वर्ष पूर्ण होत नसल्यास विशेष संवर्ग भाग एक १ मधून बदली होईल का?
सध्याचा कार्यरत शाळेवर ३ वर्ष पूर्ण होत नसल्यास बदली होणार कि नाही अजून स्पष्टता नाही .याबाबत Vinsys IT Services Pvt Ltd चे बदली बाबत विचारलेल्या महत्त्वाचे प्रश्नांची उत्तरे ३ जून २०२२ च्या ग्रामविकास विभागाने दिलेल्या उत्तरानुसार शाळेवर ३ वर्ष पूर्ण होणे आवश्यक आहे . तसेच शासन निर्णयात सेवेच्या अटबाबत कोठेही उल्लेख नाही . पोर्टल सुरु झाल्यावर हे स्पष्ट होईल .
विशेष संवर्ग भाग-१ शिक्षक बदलीबाबत संपूर्ण माहिती CLICK HERE
विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ जिल्हांतर्गत बदलीबाबत संपूर्ण माहिती CLICK HERE
विशेष संवर्ग शिक्षक भाग-३ बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या बदल्या संपूर्ण माहिती CLICK HERE
विशेष संवर्ग शिक्षक भाग-४ बदलीपात्र शिक्षकांच्या बदल्या संपूर्ण माहिती CLICK HERE
जिल्हांतर्गत बदलीबाबत धोरणात्मक बाबी -प्रतिनियुक्ती व इतर CLICK HERE
Vinsys IT Services Pvt Ltd चे बदली बाबत विचारलेल्या महत्त्वाचे प्रश्नांची उत्तरे ३ जून २०२२
जिल्हापरिषद शिक्षक बदली २०२२ सर्व महत्त्वाचे अपडेट https://bit.ly/3n5wl9A
2 Comments