Subscribe Us

केंद्रप्रमुख पदे प्राथमिक शिक्षकांमधून 50 टक्के पदोन्नतीने व 50 टक्के विभागीय स्पर्धा परीक्षाने भरणार


केंद्रप्रमुख  पदे प्राथमिक शिक्षकांमधून  50 टक्के पदोन्नतीने   व 50 टक्के विभागीय स्पर्धा परीक्षाने भरणार 

दिनांक १ डिसेंबर २०२२ चा शासननिर्णय  CLICK HERE

 दिनांक १ डिसेंबर २०२२ चा शासननिर्णयानुसार केंद्र प्रमुख पदभरती संदर्भात यापूर्वी पारीत करण्यात आलेला शासन निर्णय दिनांक १६.०२.२०१८ अधिक्रमित करण्यात येत आहे व याबाबतीत तद्नुषंगिक शासन निर्णय / शासन शुध्दीपत्रक अधिक्रमित करण्यात येत आहेत.

०२. केंद्र प्रमुखाची सद्यस्थितीत रिक्त असलेली पदे तसेच सेवानिवृत्ती, राजीनामा, बडतर्फी इत्यादी कारणांनी यापुढे रिक्त होणाऱ्या पदावर, ती पदे जसजशी रिक्त होतील, तसतशी ५० टक्के पदे पदोन्नतीने व ५० टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे त्या त्या कोट्याच्या मर्यादेत भरण्यास मान्यता देण्यात येत आहे.

०३. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी त्यांच्या जिल्हयातील उर्दू शाळांची संख्या विचारात घेऊन केंद्रप्रमुखाची पदे निश्चित करावीत.

०४. केंद्रप्रमुखांची रिक्त पदे विभागीय मर्यादीत स्पर्धा परीक्षा तसेच पदोन्नतीने भरण्याबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी:-

४.१ विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा:- विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येईल.

४.२ परीक्षेचे आयोजन व स्वरुपः- विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षाद्वारे केंद्रप्रमुखाच्या निवडीसाठी अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षेचे आयोजन शासन निश्चित करेल, अशा परीक्षा यंत्रणेमार्फत आयोजित करण्यात येईल. सदर परीक्षा यंत्रणेकडून राज्यातील सर्व जिल्ह्यामधील परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात येतील. 

या चाचणी परीक्षेचे आयोजन व स्वरुप खालीलप्रमाणे राहील:-

१. अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षा घेण्यात येईल. अर्थात विषयनिहाय चाचणी घेतली जाणार नाही. सदर परीक्षा आवश्यकतेनुसार ऑनलाईन / ऑफलाईन पध्दतीने घेण्यात येईल. सदर परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असेल.

२. ऑनलाईन परीक्षा घेताना समान काठिण्य पातळीच्या किमान १० प्रश्नपत्रिका संच सदर परीक्षा यंत्रणा तयार ठेवेल. परीक्षार्थ्यांना समान काठिण्यपातळीचे विविध प्रश्नपत्रिका देण्यातयेतील. 

३. उपलब्ध रिक्त पदे विचारात घेऊन सदर परीक्षा घेण्यात येईल.

४. परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक परीक्षा परीषदेमार्फत जाहीर करण्यात येईल.

४.३ परीक्षेचे माध्यम व अभ्यासक्रम:- परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असेल. परीक्षेचे माध्यम गुणवत्तेसाठी विचारात घेतले जाणार नाही. सदर परीक्षा एकूण २०० गुणांची राहील व त्यासाठी दोन तासाचा कालावधी राहील. परीक्षेसाठी पुढीलप्रमाणे घटक व गुणांकन राहील.


Kendrapramukh All GR  केंद्रप्रमुख पदाचे विविध शासन निर्णय (पद निर्मिती , कर्तव्य व जबाबदारी)  १९९४ ते आजपर्यत  CLICK HERE 

अनुक्रमांक २ मधील उपघटकांचे स्वरुप : 

उपघटक १ : भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतूदी, बालकांशी संबंधित सर्व कायदे, योजना व अद्ययावत शासन निर्णय-

अ) भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतूदींची (कलमांची माहिती (अद्ययावत दुरुस्त्यांसह)

(ब) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ व सदर अधिनियमातील महाराष्ट्र राज्य नियमावली, २०११ (अद्ययावत दुरुस्त्यांसह) विश्लेषण,बलस्थाने व अडचणी

क) बाल हक्क संरक्षण कायदा, २००५- बाल संरक्षण आणि सुरक्षा, भय आणि चिंता ड) विद्यार्थी लाभाच्या विविध योजना (केंद्र व राज्य शासन) व शिष्यवृत्ती

इ) विशेष गरजा असणाऱ्या व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विविध योजना

उपघटक २ शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था/संघटन व त्यांचे कार्य

UNICEF, NCERT, NUEPA, NCTE, CCRT, TISS, TIFR, Homi Bhabha Center of Science Education, RTE, EFLU, MPSP, SCERT,M, MIEPA,

SISI, DIET, राज्य आंग्लभाषा इ.

उपघटक ३ : माहिती तंत्रज्ञानाचा वापर (प्रात्यक्षिक)

अ) इंटरनेटचा प्रभावी वापर

ब) शाळास्तरावर विविध माहिती भरणे

क) शासनाच्या उपलब्ध Portal वरील माहिती वापरासंबंधीचे ज्ञान (SARAL, U-DISE +)

ड) संगणक वापराविषयीचे ज्ञान

इ) माहितीचे विश्लेषण

फ) शाळास्तरावरील अंदाजपत्रक व हिशोब

उपघटक ४ : अभ्यासक्रम व मूल्यमापन, अध्ययन-अध्यापन पध्दती अ) पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतचा अभ्यासक्रम

ब) अध्ययन निष्पत्तीतील उणीवा

क) सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन व पूरक मार्गदर्शन

ड) प्रश्न निर्मिती ( स्वाध्याय) कौशल्य : ASER, NAS, PISA

इ) प्रगत अध्ययन-अध्यापन शास्त्र

फ) निकालासंबंधीची कामे

उपघटक ५ : माहितीचे विश्लेषण मूल्यमापन 

अ) प्राप्त माहितीचे विश्लेषण

(ब) शासनाच्या विविध पोर्टलवरील माहितीचे विश्लेषण करता येणे

क) ASER, NAS, PSM चाचण्या, शाळांचे निकाल या माहितीचे विश्लेषण करता येणे. ड) संप्रेषण कौशल्य समाज संपर्काची विविध साधने

उपघटक ६ विषयनिहाय आशयज्ञान आणि सामान्यज्ञान, इंग्रजी विषयाचे आशयज्ञान

अ) मराठी, गणित, विज्ञान, इंग्रजी, भूगोल, इतिहास माध्यमिक स्तरापर्यंत विषयांचे ज्ञान

ब) चालू घडामोडी विशेषत: शैक्षणिक बाबी 

क) क्रीडा विषयक घडामोडी,

केंद्रप्रमुख पदाच्या भरतीसाठी शैक्षणिक पात्रताबाबत शासनाचे नवे शुद्धीपत्रक दिनांक ९ मार्च २०२३ च्या नुसार खालील शैक्षणिक पात्रता  मध्ये बदल केला आहे  CLICK HERE 

५. १. शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता :- विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे निवडीसाठी ज्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ए./बी.कॉम / बी.एस्सी. ही पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि ज्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमीत सेवा ( शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे.

५.२ मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत कमाल वयोमर्यादा ५० वर्ष राहील.

५.३ विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असेल त्याच जिल्ह्यासाठी पात्र राहतील.

०६. पदोन्नतीने नियुक्तीसाठी:- ज्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा ( शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण केली असेल अशा उमेदवारामधून सेवाज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे पात्र उमेदवारांच्या पदोन्नतीने नेमणूक करण्यात येईल. 


७. कागदपत्रांची पडताळणी:- केंद्रप्रमुख पदी विभागीय मर्यादित परीक्षेद्वारे निवड झालेल्या उमेदवारांच्या शैक्षणिक व व्यावसायिक प्रमाणपत्राची पडताळणी संकेतस्थळावर उमेदवारांची सूची जाहीर झाल्यानंतर १५ दिवसाच्या मुदतीत खालील समितीमार्फत करण्यात येईल.

संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे समिती राहील:-

१. संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अध्यक्ष

२. समाजकल्याण अधिकारी सदस्य

३. शिक्षणाधिकारी (माध्यमिक)सदस्य

४. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सदस्य सचिव

कागदपत्रांच्या पडताळणीस उपस्थित असलेल्या उमेदवारांच्या उपस्थितीत नोंद ठेवणे आवश्यक राहील. उमेदवारांची मुळ कागदपत्रे तपासल्याची नोंद घेऊन उमेदवारांकडून प्रमाणपत्राच्या प्रतीचा एक संच घ्यावा व त्यावर कागदपत्राच्या पडताळणीचा दिनांक व नोंद क्रमांक नोंदविण्यात यावा. मूळ प्रमाणपत्रे उमेदवारास तात्काळ परत करण्यात यावीत.

०८. कागदपत्र पडताळणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल..

०९. शासन निर्णय, दिनांक ०२.०२.२०१० ते दि. १०.०६.२०१४ या कालावधीत अभावितपणे नियुक्त केंद्रप्रमुखांच्या सेवा दिनांक १६.०२.२०१८ रोजीच्या शासन निर्णयान्वये नियमित करण्यात आल्या आहेत. सदर आदेश कायम राहतील.

१०. तक्रारीचे निवारणः- उमेदवाराच्या तक्रारीचे निराकरण करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची राहील. उमेदवाराने याबाबत लेखी तक्रार संबंधित प्राधिकाऱ्यांकडे करावी. प्राप्त झालेल्या तक्रारीचे निवारण संबंधित प्राधिकाऱ्यांनी १५ दिवसांत करणे आवश्यक राहील. याबाबत शिक्षण संचालक (प्राथमिक) हे अपिलीय प्राधिकारी राहतील.

११. केंद्र प्रमुखांची मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे पदे भरण्याची संपूर्ण प्रक्रिया शिक्षण संचालक (प्राथमिक) यांच्या नियंत्रणाखाली करण्यात येईल. यासंदर्भात संचालनालय स्तरावरुन वेळोवेळी सविस्तर सूचना निर्गमित करण्यात येतील.

उपरोक्तप्रमाणे केंद्रप्रमुखांच्या मंजूर पदाच्या ५० टक्के पदे पदोन्नतीने व ५० टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे या प्रमाणात राहतील. सद्यस्थितीत पदोन्नतीच्या कोट्यातील पदे ५० टक्के पेक्षा अधिक असल्यास सदर पदे जस जशी रिक्त होतील तस तशी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्यात येतील.

१२. केंद्र प्रमुख ही पदे जिल्हा परिषदेच्या आस्थापनेमधील असल्याने त्यांच्या सेवा प्रवेशासंदर्भात महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम, १९६७ मध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी ग्राम विकास विभागाने कार्यवाही करावी.

१३. ज्या जिल्हयांनी केंद्रप्रमुखाची पदे भरण्याची प्रक्रीया प्रस्तावित शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत पूर्ण केली असल्यास ती वैध असेल.

Kendrapramukh All GR  केंद्रप्रमुख पदाचे विविध शासन निर्णय (पद निर्मिती , कर्तव्य व जबाबदारी)  १९९४ ते आजपर्यत  CLICK HERE

Post a Comment

0 Comments