Subscribe Us

केंद्रप्रमुख पदाच्या भरतीसाठी शैक्षणिक पात्रताबाबत शासनाचे नवे शुद्धीपत्रक-केंद्रप्रमुख होण्यासाठी कोण आहेत पात्र शिक्षक ?

 केंद्रप्रमुख पदाच्या भरतीसाठी शासनाचे नवे शुद्धीपत्रक केंद्रप्रमुख होण्यासाठी कोण आहेत पात्र शिक्षक ?



केंद्रप्रमुख पदाच्या विभागीय परीक्षा व  पदोन्नती करीता आवश्यक शैक्षणिक पात्रताबाबत शालेय शिक्षण विभागाने दिनांक  ०९ मार्च २०२३  रोजी नवे शुद्धीपत्रक काढून पुढीलप्रमाणे बदल केला आहे  

 शासन निर्णय दिनांक ०१.१२.२०२२ मधील परिच्छेद क्र.५.१ हा वगळण्यात येत असून, त्याऐवजी परिच्छेद क्र. ५.१ पुढीलप्रमाणे वाचण्यात यावा.

वरील शुद्धीपत्रक नुसार आता 

पुढील शिक्षक विभागीय परीक्षेसाठी पात्र आहेत 

1. विभागीय परीक्षेसाठी सर्व जिल्हा परिषद  शिक्षक ज्यांनी पदवी  ही अहर्ता 50 टक्के गुणांसह प्राप्त केली आहे आणि पदवी प्राप्त केल्याच्या दिनांकापासून 3 वर्षे सलग सेवा (शिक्षण सेवक कालावधी वगळून)  केली आहे, ज्यांचं वय 50  पेक्षा कमी आहे  ते सर्व जिल्हा परिषद  शिक्षक विभागीय परीक्षेसाठी पात्र ठरतात.

दिनांक ०१ डिसेंबर च्या शासन निर्णयानुसार प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर काम करणारे शिक्षक पात्र होते त्यात बदल करण्यात येऊन विभागीय परीक्षा आता सर्व शैक्षणिक अहर्ता असणाऱ्या  जिल्हापरिषद शिक्षकांना देता येईल 

२ पदोन्नतीसाठी पुढीलप्रमाणे बदल करण्यात आला आहे 



वरील बदलामुळे आता

 पदोन्नतीने केंद्रप्रमुख होण्यासाठी मात्र तो प्रशिक्षित पदवीधर शिक्षक पदावर तीन वर्षे सेवा केलेला असावा, यासाठी गुणांच्या 50 टक्के ची अट नाही. सेवाजेष्ठतेने प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांमधून  पदोन्नती होईल

असे दोन महत्वाचे बदल झाले आहेत.

Kendrapramukh All GR  केंद्रप्रमुख पदाचे विविध शासन निर्णय (पद निर्मिती , कर्तव्य व जबाबदारी)  १९९४ ते आजपर्यत  CLICK HERE

केंद्रप्रमुख  पदे प्राथमिक शिक्षकांमधून  50 टक्के पदोन्नतीने   व 50 टक्के विभागीय स्पर्धा परीक्षाने भरणार  शासन निर्णय दिनांक ०१.१२.२०२२   CLICK HERE




Post a Comment

3 Comments

Amol said…
Those teachers are at private Added school also must have to add in this GR but that not happen.
Amol said…
या परिपत्रकामध्ये फक्त जिल्हा परिषदेचे शिक्षकच पात्र ठरतील मात्र अनुदानित शाळेवरील शिक्षकही या पदासाठी पात्र आहेत. त्यांना या सेवेतून वगळून त्यांच्यावर खूप मोठा अन्याय केला आहे.
Nadir khan said…
५० वर्ष वया च्या आत शिक्षाकांना संधि आणि त्या च्या वर जे जेष्ठ शिक्षक आहे तयांना हा परिक्षा पासून आणि पदा पासून का वंचित ठेवणया आले???? हा खरा अन्याय आहे