Subscribe Us

वेतनत्रुटी व सुधारणा अहवाल खंड-२ ची प्रत बाबत 7th Pay Commission BAKSHI Committee Report

 वेतनत्रुटी व सुधारणा अहवाल खंड-२ ची  प्रतबाबत  


  राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणेबाबत शासनाने स्थापन केलेल्या मा. बक्षीसाहेबांच्या अध्यक्षतेखालील वेतन सुधारणा समितीने विविध कर्मचारी संघटनांशी चर्चा करुन शासनास सादर केलेल्या व शासनाने दिनांक १० जानेवारी २०२३ च्या मंत्रीमंडळ बैठकीत स्विकारलेल्या वेतनत्रुटी व सुधारणा अहवाल खंड-२ ची प्रत उपलब्ध करुन द्यावी  अशी  विनती. श्री सुहास धारासूरकर यांनी माहिती अधिकार अंतर्गत शासनाकडे केली होती 

    याबाबत  जन माहिती अधिकारी तथा अवर सचिव महाराष्ट्र शासन यांनी  दिनांक १३ जानेवारी च्या पत्रानुसार श्री सुहास धारासूरकर  पुढीलप्रमाणे लेखी दिले आहे 

दि. १० जानेवारी, २०२३ रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीचे कार्यवृत्त अद्यापि प्राप्त झालेले नाही. त्यामुळे मा. मंत्रीमंडळ बैठकीत स्विकारलेल्या वेतनत्रुटी व सुधारणा अहवाल खंड-२ ची प्रत आपणांस उपलब्ध करुन देता येत नाही. याबद्दल दिलगीर आहे.

    सदर कार्यवृत्त प्राप्त झाल्यानंतर त्यामध्ये स्वीकृत केलेल्या शिफारशीनुसार शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर सर्वांसाठी खुल्या स्वरुपात उपलब्ध करुन देणार आहे. आपण त्याचे अवलोकन करुन आपणांस अपेक्षित असलेली माहिती घेऊ शकता.

----------------------------------


 राज्य वेतन सुधारणा बक्षी समितीच्या खंड १ व २ अहवालबाबत 
CLICK HERE 

Post a Comment

0 Comments