Subscribe Us

अवघड क्षेत्रातील रिक्त राहिलेल्या जागा भरण्यासाठीच्या राऊंड संदर्भात.

अवघड क्षेत्रातील रिक्त राहिलेल्या जागा भरण्यासाठीच्या राऊंड संदर्भात. Vinsys कंपनीने विचारलेल्या मुद्द्यांबाबतचे स्पष्टीकरण खालीलप्रमाणे कळविण्यात येत आहेत.

अवघड क्षेत्रातील रिक्त राहिलेल्या जागा भरण्यासाठीच्या राऊंड संदर्भात उपस्थित  मुद्दे

१.अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठी  चालविण्यात येणाऱ्या राऊंड संदर्भातील शिक्षकांची सेवाजेष्ठता ही विद्यमान क्षेत्रातील रुजू दिनांक यावर ठरवावी की जिल्हा रुजू दिनांकावर ठरवावी?

२. वास्तव्य सेवाजेष्ठता ही विद्यमान शाळेतील वास्तव्यावर ठरवावी की विद्यमान क्षेत्रातील  वास्तव्यावर ठरवावी?

स्पष्टीकरण--दि.०७.०४.२०२१ रोजीच्या शासन निर्णयातील परि. १.१० मधील तरतूदीनुसार शिक्षकांची सेवाजेष्ठता ही जिल्ह्यातील रूजू दिनांकानुसार ठरविण्यात यावी व वास्तव्य ज्येष्ठता ही विद्यमान क्षेत्रातील (सर्वसाधारण क्षेत्र) वास्तव्यानुसार ठरविण्यात यावी.

३.ज्या शिक्षकांनी प्रशासकीय बदली निवडली | आहे आणि ज्याला कोणीही खो दिलेला  नाही अशा शिक्षकांना या अवघड क्षेत्रातील  रिक्त जागा भरण्याच्या राऊंडमध्ये घ्यावे किंवा कसे?

स्पष्टीकरण --अशा शिक्षकांचा समावेश अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्याच्या राऊंडमध्ये करावा.

४. दि.०७.०४.२०२१ रोजीच्या शासन निर्णयातील मुद्दा क्र. १. १० मध्ये नमूद केल्यानुसार अवघड क्षेत्रातील रिक्त पदे | भरावयाची झाल्यास सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांना विद्यमान क्षेत्रातील ५ वर्षांची अट लागू राहणार नाही. पती-पत्नी एकत्रीकरण झाल्यानंतर एक एकक म्हणून विचारात घ्यावयाच्या शिक्षकांनी या टप्प्यामध्ये अर्ज केल्यास, अवघड क्षेत्रातील जागा भरण्यासाठी पती पत्नी एक एकक म्हणून विचारात घ्यायचे का?

स्पष्टीकरण

शासन निर्णय दि.०७.०४.२०२१ मधील मुद्दा क्र. ४.३.४ नुसार पती-पत्नी एकत्रीकरणाचा लाभ दिल्यानंतर संबंधितांची बदलीपात्र सेवा झाल्यानंतर त्यांची पुढील बदली करताना त्यांना एक एकक (वन युनिट) मानून बदलीने नियुक्ती देता येईल. अशा पद्धतीने बदलीपात्र सेवा झालेल्या शिक्षकानां 'टप्पा क्र.५- बदलीस पात्र शिक्षकांची बदली या टप्प्यामध्ये एक एकक संकल्पनेचा लाभ देण्यात आलेला आहे. त्यामुळे अवघड क्षेत्रातील जागा भरण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या बदलीप्रक्रियेमध्ये एक एकक संकल्पना विचारात घेण्याची आवश्यकता नाही.

*ज्या शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रात 10 वर्ष झाले परंतु शाळेवर 5 वर्ष झाले नाहीत अशा शिक्षकांना येत असलेल्या मेसेज बाबत स्पष्टीकरण* CLICK HERE

ग्रामविकास विभाग सचिव यांचे पत्र 




Post a Comment

0 Comments