Subscribe Us

पवित्र प्रणाली मार्फत २०१९ मध्ये नियुक्त प्राथमिक पदवीधर शिक्षक इ.६वी ते ८ वी यांना लागू करावयाच्या वेतनश्रेणीबाबत

 पवित्र प्रणाली मार्फत २०१९ मध्ये नियुक्त प्राथमिक पदवीधर शिक्षक (इ.६वी ते ८ वी) यांना लागू करावयाच्या वेतनश्रेणीबाबत

कक्ष अधिकारी शालेय शिक्षण विभाग यांनी वेतन श्रेणी बाबत दिनांक १३ फेब्रुवारी २०२३ रोजी पुढीलप्रमाणे मार्गदर्शन पत्र काढले आहे  CLICK HERE 

पत्राचा आशय पुढीलप्रमाणे आहे 

 पवित्र प्रणाली मार्फत २०१९ मध्ये नियुक्त प्राथमिक प्रशिक्षिक पदवीधर शिक्षकांना वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये (जिल्हा परिषद/नगर परिषद/महानगरपालिका/ खाजगी अनुदानित शाळा) एस-१० किंवा एस-१४ अशा वेगवेगळ्या वेतनश्रेणी लागू केल्या असल्याचे शासनास प्राप्त निवेदनाच्या अनुषंगाने, शासन नियम / निर्णय मधील तरतुदी विचारात घेऊन, याबाबत मा शिक्षण संचालक यांना  स्वयंस्पष्ट अभिप्राय सादर करणेबाबत कळविले होते. त्यानुषंगाने दिनांक २७ जाने २०२३ रोजी  मा शिक्षण संचालक यांनी शासनास अभिप्राय दिले असून त्यानुसार  जिल्हापरिषद/ महानगरपालिका/नगरपालिका/ नगरपरिषद/कटकमंडळे या आस्थापनेवरील पवित्र प्रणालीअंतर्गत नियुक्त उमेदवारांना सेवासातत्य देताना एस-१० (२९२०० ९२३००) या वेतनश्रेणीत सेवासातत्य देता येईल, तसेच खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये नियुक्त प्रवर्गानुसार वेतनश्रेणी देय ठरेल असे अभिप्राय दिले आहेत.

त्यानुषंगाने नमूद करण्यात येते की राज्यातील उच्च प्राथमिक वर्गावर नियुक्त शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करून शिफारस करण्याकरिता आयुक्त (शिक्षण) यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे. सदर समितीने शासनास अद्यापि अहवाल सादर केलेला नाही. 

सद्यस्थितीत इयत्ता ६ वी ते ८ वी च्या वर्गावरील पदवीधर प्राथमिक शिक्षकांना देय असलेल्या वेतनश्रेणीबाबत शासन परिपत्रक दि. १३.१०.२०१६ अन्वये निर्गमित केलेल्या सूचना लागू आहेत. त्यानुसार उच्च प्राथमिक स्तरावर पदवीधर शिक्षकांची विषय संवर्गनिहाय (विज्ञान / भाषा/ सामाजिक शास्त्र) सेवाजेष्ठता यादीनुसार फक्त १/३ सेवाज्येष्ठ शिक्षकांनाच पदवीधर वेतनश्रेणी लागू आहे. उर्वरित शिक्षक जरी प्रशिक्षित पदवीधर शिक्षक असले तरी त्यांना सद्यस्थितीत पदवीधर वेतनश्रेणी अनुज्ञेय नसून त्यांना नियमित वेतनश्रेणी एस-१० (२९२०० ९२३००) लागू आहे. सबब, (इ. ६ वी ते इ.८ वी) उच्च प्राथमिक स्तरावर पवित्र प्रणालीमार्फत नियुक्त शिक्षकांना सद्यस्थितीत शासन परिपत्रक दि.१३.१०.२०१६ मधील तरतुदी लागू असून सदर शिक्षकांच्या वेतनश्रेणीबाबत त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी. तसेच काही आस्थापनांनी वेगवेगळी वेतनश्रेणी लागू केलेली असल्यास सदर बाब तपासून शासन परिपत्रक दि. १३.१०.२०१६ मध्ये दिलेल्या तरतुदीनुसार वेतनश्रेणी लागू करणेबाबत योग्य त्या सूचना संबंधितांना आपल्या स्तरावरून द्याव्यात.

असे कक्ष अधिकारी शालेय शिक्षण विभाग यांनी   मा शिक्षण संचालक यांना एका परीपत्रकाद्वारे कळविले आहे .


पदवीधर शिक्षक -विषय शिक्षक पदाचे १९७९ ते आतापर्यंतचे सर्व शासन निर्णय l Graduate- Subject Teacher all GR ,न्यायालयीन प्रकरणे , परिपत्रक  CLICK HERE



Post a Comment

0 Comments