Subscribe Us

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 व शिक्षक बदली

 नवीन राष्ट्रीय  शैक्षणिक धोरण 2020 व शिक्षक बदली 

राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे शासनाने स्वीकारले असून सदर शैक्षणिक धोरणामध्ये मुद्दा क्रमांक 5 शिक्षक - शिक्षक भरती आणि नियुक्ती मधील मुद्दा ५.३ शिक्षकांच्या वांरवार होणाऱ्या त्रासदायक बदल्यांची पद्धत बंद करण्यात येईल, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांचे आदर्श शिक्षक आणि शैक्षणिक वातावरण यामध्ये सातत्य मिळेल. राज्ये / केंद्रशासित प्रदेशातील शासनाद्वारे योग्यपणे घालून दिलेल्या संरचित पद्धतीनुसार अगदी विशेष परिस्थितीत बदल्या होतील. शिवाय, पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी बदली एका ऑनलाईन संगणकीकृत प्रणाली द्वारे करण्यात येईल असा स्पष्ट उल्लेख आहे



महाराष्ट्र शासन सद्यस्थिती मध्ये  राज्यात सन २०१८ पासून प्राथमिक शिक्षकांच्या बदल्याचे धोरण राबविण्यात येत आहे याबाबत अनेक शिक्षकांवर अन्याय झाल्याने न्यायलयीन प्रकरणे निर्माण होत आहेत  प्राथमिक शिक्षकांच्या कोणतेही टक्केवारीचे बंधन नसलेल्या बदल्या सध्या ऑनलाईन संगणीकृत ONLINE द्वारे सुरू असून यामध्ये विविध प्रकारचे शिक्षक संवर्ग तयार करण्यात आलेले आहेत . सध्या करण्यात येणाऱ्या  बदल्यांना कुठल्याही प्रकारची टक्केवारीचे बंधन नाही.  सदरची ऑनलाईन बदली प्रक्रिया (अर्ज भरणे व बदली होणे) वर्षभर सुरू राहत असून जे शिक्षक बदली पात्र आहेत त्यांची शाळेवर शिकवण्याची कोणत्याही प्रकारची मानसिक अवस्था राहत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जा व गुणवत्तेवर परिणाम होत आहे त्याचप्रमाणे शिक्षक संवर्गामध्ये विविध प्रकारचे विशेष  संवर्ग निर्माण करण्यात आलेले असल्यामुळे शिक्षकांमध्ये आपसी द्वेष गटतट  मतभेद शाळांमध्ये दिसून येत आहे या सर्वांचा परिणाम शाळा व विद्यार्थ्याच्या गुणवत्तेवर होत आहे  

त्यासाठी ज्या शिक्षकांना, नागरिकांना बदल्या नको आहे त्यांनी पुढीलप्रमाणे बदली अभ्यासगटला अर्ज द्यावा 

 बदली सुधारणा अर्ज NEP २०२० नुसार    CLICK HERE 

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२२ मराठी     CLICK HERE 

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२२ इंग्रजी    CLICK HERE

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२२ हिंदी     CLICK HERE

बदली अभ्यासगट शासन निर्णय - CLICK HERE

संघटना निवेदन  CLICK HERE


Post a Comment

0 Comments