Subscribe Us

माध्यमिक शिक्षक कमावि उमावि शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणी बाबतीत परिपत्रक

 माध्यमिक शिक्षक कमावि उमावि शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणी बाबतीत परिपत्रक.


 शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, शासन निर्णय क्र. शिप्रधो- २०१९ / प्र.क्र. ४३ / प्रशिक्षण मंत्रालय विस्तार भवन मुंबई दिनांक २० जुलै २०२१ शासन निर्णयामध्ये माध्यमिक शिक्षक / कर्मावि/उमावि शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन श्रेणी / निवड श्रेणी लागू करण्याच्या अनुषंगाने खालील प्रमाणे तरतूद आहे.

मुद्या क्र.४ - वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी आवश्यक प्रशिक्षण शासन स्तरावरुन आयोजित न केल्यामुळे वरिष्ठ व निवड श्रेणीच्या लाभापासून वंचित असलेल्या शिक्षकांच्या बाबतीत सदर दहा दिवसांचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केल्यावर त्यांना वरिष्ठ / निवड श्रेणीसाठी पात्र दिनांकापासून लाभ देय राहिल.


उपरोक्त तरतुद विचारात घेवून माध्यमिक / कमवि शिक्षक यांच्या वेतन निश्चितीबाबत कार्यवाही करावी. असे शिक्षण उपसंचालक अमरावती यांनी आदेश दिले आहे 

Post a Comment

0 Comments