Subscribe Us

केंद्रपमुख पदाच्या मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा व पदोन्नती करीता शैक्षणिक अर्हता मध्ये बदल शासन निर्णय दिनांक: २७ सप्टेंबर, २०२३

 केंद्रपमुख पदाच्या मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा व पदोन्नती करीता शैक्षणिक व  व्यावसायिक अर्हतामध्ये बदल 


केंद्रपमुख या पदावरील मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा व पदोन्नतीकरीता शैक्षणिक व  व्यावसायिक  अर्हतामध्ये बदल करण्यात आला आहे   

 शासन निर्णय  दिनांक: २७ सप्टेंबर, २०२३.  CLICK HERE

 केंद्रप्रमुख पदाच्या अर्हतेबाबत मा. न्यायालयात दाखल होत असलेल्या याचिका च प्राप्त निवेदने, तसेच शासकीय कर्मचारी यांचेकरीता असलेल्या अर्हता या सर्व बाबींचा विचार करता केंद्रप्रमुख पदाच्या अर्हतेमधील शासन शुध्दीपत्रक दिनांक ०९.०३.२०२३ अनुसार शासन निर्णय दि.०१.१२.२०२२ मधील सुधारित करण्यात आलेली परिच्छेद क्र. ५.१ येथील मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेकरीता पदवी परीक्षेमध्ये किमान ५० टक्के गुण असणे आवश्यक असलेली अट रद्द करण्याबाबतची, तसेच शासन निर्णय दि.०१.१२.२०२२ मधील परिच्छेद क्र. ५.२ येथील मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेकरीता विहित करण्यात आलेली किमान ५० वर्ष वयाची अट रद्द करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याअनुषंगाने केंद्रप्रमुख पदावरील निवडीच्या अनुषंगाने आवश्यक अर्हतेबाबत पुढीलप्रमाणे सुधारणा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे:-

1.मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे व पदोन्नतीद्वारे केंद्रप्रमुख पदावरील निवडीच्या अनुषंगाने निर्गमित  शासन शुध्दीपत्रक दिनांक ०९.०३.२०२३ याअन्वये अधिक्रमीत करण्यात आल्या आहे . तसेच शासन निर्णय दिनांक ०१.१२.२०२२ मधील परिच्छेद क्र.५.१ ५.२ व ६ येथील तरतूदी यान्वये वगळण्यात आला आहे . परंतु उर्वरित तरतूदी यापुढे लागू राहणार .

०२. मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा व पदोन्नतीद्वारे केंद्रप्रमुख पदावरील निवडीकरीता पुढीलप्रमाणे शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करण्यात येत आहे:-

२.१ मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे निवड:- 

मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे निवडीसाठी कोणत्याही मान्यता प्राप्तविद्यापीठाची बी.ए./बी.कॉम./बी.एस्सी. ही पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि ज्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर किमान ६ वर्ष अखंडीत सेवा पूर्ण करणे आवश्यक 

( यापुढे मर्यादित विभागीय स्पर्धा  केंद्रप्रमुख पदासाठी बी एड हि पदवी आवश्यक असणार नाही  मान्यता प्राप्तविद्यापीठाची बी.ए./बी.कॉम./बी.एस्सी. ही पदवी असलेले शिक्षक पात्र असतील . तसेच जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर ज्यांनी ६ वर्ष पूर्ण केले  त्यांना परीक्षा देता येणार . ५० % गुणाची अट असणार नाही .  विभागीय परीक्षेसाठी प्राथमिक विभागात काम करणारे वर्ग १ ते ८ चे सर्व विहित अहर्ता प्राप्त शिक्षक पात्र असणार आहे .) 

२.२ पदोन्नतीने नियुक्तीसाठी:-

ज्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर किमान ६ वर्ष अखंडीत सेवा पूर्ण केली असेल अशा उमेदवारामधून सेवाज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे पात्र उमेदवारांच्या पदोन्नतीने नेमणूक करण्यात येईल. 

 (यापुढे पदोन्नतीने नियुक्तीसाठी   प्राथमिक विभागात  प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर  काम करणारे वर्ग ६ ते ८ चे सर्व विहित अहर्ता प्राप्त  शिक्षक पात्र असणार आहे  तसेच या अगोदर  ज्यांनी प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर किमान ६ वर्ष अखंडीत   काम केलेलेआहे असे शिक्षक  

०३. केंद्रप्रमुख ही पदे जिल्हा परिषदेच्या आस्थापनेमधील असल्याने त्यांच्या सेवा प्रवेशासंदर्भात महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम, १९६७ मध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी ग्राम विकास विभागाने कार्यवाही करावी. 

केंद्रप्रमुख पदाचे विविध शासन निर्णय (पद निर्मिती , कर्तव्य व जबाबदारी)  १९९४ ते आजपर्यत   CLICK HERE  

 ( केंद्रप्रमुख पदे हि ग्राम विकास विभाग अंतर्गत येत असल्याने या अगोदरच्या सेवा प्रवेश अधिनियम १९६७ व १० जून २०१४ मध्ये सुधारणा करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे    .) 

०४. सदर शासन निर्णय ग्राम विकास विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात आला आहे 

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३०९२७१२२३५५३४२१ असा आहे.  


Post a Comment

0 Comments