Subscribe Us

NMMS परीक्षा दि. 24 डिसेंबर 2023 अंतरिम संभाव्य उत्तरसूची NMMS 2023 Interim Answer key

  राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) बुधवार दि.24 डिसेंबर 2023 अंतरिम (संभाव्य) उत्तरसूची

अंतरिम उत्तरसूची
Interim Answer Key



अंतरिम आक्षेप
Interim Objection

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत बुधवार दि. 24/12/2023  रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची अंतरिम (संभाव्य ) उत्तरसूची परिषदेच्या https://www.mscepune.in/ व https://nmmsmsce.in/ या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.

१) या उत्तरसूचीवर प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नांवर आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरुपात करता येईल.

२) सदर ऑनलाईन निवेदन शाळांकरीता त्यांच्या लॉगिनमध्ये Dashboard वर व पालकांसाठी https://nmmsmsce.in/ या संकेतस्थळावर Interim Answer key (अंतरिम उत्तरसूची) या हेडिंगखाली स्वतंत्ररित्या उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.

३) त्रुटी / आक्षेपबाबतचे ऑनलाईन निवेदन भरण्याकरीता दि. 29 /12 / 2023 ते दि. 05/01/2024   पर्यंत मुदत देण्यात येत आहे.

४) दिनांक 05/01/2024 नंतर त्रुटी / आक्षेपबाबतचे निवेदन स्विकारले जाणार नाही.

५) उपरोक्त ऑनलाईन निवेदनाशिवाय इतर कोणत्याही प्रकारे (टपाल, समक्ष अथवा ईमेलद्वारे) प्राप्त त्रुटी / आक्षेपाबाबतच्या निवेदनाचा विचार केला जाणार नाही.

६) उपरोक्तनुसार विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांना वैयक्तिकरित्या उत्तर पाठविले जाणार नाही.

७) विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर संबंधित विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसू


ची परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल.





Post a Comment

0 Comments