Subscribe Us

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा घटकनिहाय मुद्दे , गुणांकन व फोटो अपलोड माहिती

 मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा  

घटकनिहाय मुद्दे , गुणांकन व फोटो अपलोड माहिती



SCHOOL पोर्टल वर माहिती भरण्यापूर्वी खालील मुद्द्याचे घटकनिहाय 30 फोटो व  त्यासंबंधी केलेले क्षेत्रानिहाय  कार्य यांची लिखित माहिती तयार असावी 

प्रत्येक घटकाचे एक किंवा अनेक फोटोचे  एकच PDF २ MB पर्यत  तयार करावे त्याला त्या घटकाचे नाव द्यावे . त्याची थोडक्यात माहिती तयार लिहावी 

एक किंवा अधिक फोटो pdf करण्यासाठी app CLICK HERE

 

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा  केंद्रप्रमुख मूल्यांकन प्रपत्र  CLICK HERE 


घटकनिहाय मुद्दे  ONLINE PDF DOWNLOAD करा  CLICK HERE 

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा स्पर्धेसाठी School पोर्टलवर नोदणी कशी करावी व माहिती कशी भरावी ?  CLICK HERE 


खालील प्रत्येक मुद्याचे फोटो चे एक pdf  तयार करावे 

अ) विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग - एकूण ६० गुण  

१)    शाळा व परिसराचे सौंदर्यीकरण

i) विद्यार्थ्यामार्फत वर्ग सजावट व शाळा सजावट :- गुण २ 

 ii) शाळेच्या आवारात पर्यावरण संरक्षणास हातभार लावणाऱ्या वृक्षांचे रोपण व जोपासना -गुण ३

  iii) शाळेच्या इमारतीची व असल्यास संरक्षक भिंतीची रंगरंगोटी - गुण २

iv) प्रबोधनात्मक सुविचार, चित्रे इत्यादीद्वारे बोलक्या भिंतीची उभारणी -गुण ३     एकूण गुण १०


 २)    विद्यार्थ्याचा विविध उपक्रमातील, व्यवस्थापनातील व निर्णय प्रक्रियेतील सहभाग :-  

i) विद्यार्थी मंत्रिमंडळ /बालसंसद स्थापन करून त्याद्वारे शाळेतील कामकाज पार पाडणे - गुण २

 ii) प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या अनुषंगाने नियोजन व अंमलबजावणी यामधील विद्यार्थ्यांचा सहभाग -गुण २

 iii)  प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या अनुषंगाने शाळेच्या आवारात परसबागेची निर्मिती करून त्याद्वारे आरोग्यदायी भाज्यांची लागवड यामधील विद्यार्थ्यांचा सहभाग - गुण ३

  v) मेरी माटी मेरा देश या उपक्रमातील विद्यार्थ्यांचा सहभाग - गुण ३ 

v) शाळेची बचत बँक/पैशाचा योग्य विनियोग व व्यवस्थापन यातील विद्यार्थ्यांचा सहभाग - गुण ३

 vi) नवभारत साक्षरता अभियानातील शाळेचा सहभाग -  गुण ३   एकूण गुण १५ 


३)   शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक अवांतर उपक्रम :-

 i) विद्यार्थ्यांच्या शाळेतील उपस्थितीचे प्रमाण -गुण २   

ii) महावाचन चळवळीतील विद्यार्थ्यांचा सहभाग -गुण २ 

  iii)  वक्तृत्व स्पर्धा/लेखन स्पर्धा/ संगीत स्पर्धा/ इतर कला स्पर्धा यांचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग - गुण ३  

iv) यथास्थिती NCC/Scout Guide / MCCव समान प्रकारच्या इतर उपक्रमातील विद्यार्थ्यांचा सहभाग - गुण ३ 

  एकूण गुण १० 


 ४)   शाळेची इमारत व परिसराची स्वच्छता :

  i) स्वच्छता मॉनिटर अभियान-टप्पा-२ मधील सहभाग - एकूण गुण १०


  ५)   राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देण्याबाबतचे उपक्रम :- 

i) प्रत्येक शाळेने देशातील कोणतेही एक राज्य निवडून त्याचा सांस्कृतिक वारसा जसे- पेहराव, खानपान, सण-उत्सव इत्यादी बाबत तसेच राष्ट्राच्या उभारणीत त्या राज्याचे योगदान याची महती दर्शविणारे सादरीकरण -  एकूण गुण ५ 


६)   विविध क्रीडास्पर्धांचे आयोजन :-  

 i ) विविध क्रीडास्पर्धांचे आयोजन:- यात अधिकाधिक देशी खेळांना प्राधान्य - एकूण गुण १०  


ब) शाळा व्यवस्थापना कडून आयोजित उपक्रम व त्याती ल विविध घटकांचा सहभाग एकूण ४० गुण  

    १)   आरोग्य :-

 i) विद्यार्थी व शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या करिता आरोग्य तपासणी शिबीर यात आरोग्याची सर्वसाधारण तपासणी - गुण ५

   ii) शाळेत प्रथमोपचार पेटीची उपलब्धता -गुण २

  iii) बदलत्या जीवन शैलीमुळे लहान वयातच होऊ लागलेल्या लठ्ठपणा,मधुमेह व डोळ्यांचे विकार यासारख्या आजारांची माहिती व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय यासाठी तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शनपर व्याख्यान - गुण ३

 iv) किशोरवयीन विद्यार्थिनीसाठी मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत समुपदेशन सत्राचे आयोजन -गुण ३

v) हात स्वच्छ धुवण्याचे योग्य पद्धतीचे प्रात्यक्षिक व त्यासाठीची सुविधा - गुण २ 

 एकूण गुण १५ 

२)   आर्थिक साक्षरता व कौशल्य विकास :-  

 i) विद्यार्थ्यामध्ये शालेय जीवनापासूनच आर्थिक साक्षरता रुजविण्याच्या दृष्टीने पैशाचे नियोजन, गुंतवणूक, बँकाचे व्यवहार, कर्ज व व्याज प्रणाली इत्यादी बाबत तसेच आर्थिक व्यवहाराकरिता UPI सारख्या आधुनिक साधनांचा वापर करताना घ्यावयाची काळजी याबाबत तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शनपर व्याख्यान - गुण ५    

 ii) स्वयंरोजगार व्यवसाय, व्यापार, उद्योग अशा क्षेत्रात भविष्यात करीअर घडविण्यासाठी विशिष्ट कौशल्यावर आधारित व्यवसाय शिक्षणाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन पर व्याख्यान- यात अशा अभ्यासक्रमांची ओळख, शिक्षण देणाऱ्या संबंधित संस्था, प्रवेश प्रक्रिया, भविष्यातील संधी इत्यादीबाबतची माहिती असावी - गुण ५    

 एकूण गुण १०   


 ३)   भौतिक सुविधा बाबत, खाजगी संस्था, व्यक्ती ,कंपनी यांचा सहभाग व शाळा व्यवस्थापन समिती :-   

  i) भौतिक सुविधा तसेच अध्यापन व अध्ययनाशी संबंधित आधुनिक साधनांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्या, स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती इत्यादी घटकांकडून वस्तू व सेवा यांच्या स्वरुपात अधिकाधिक देणगी गोळा करण्यासाठीचे प्रयत्न -  गुण ३ 

 ii) शाळा व्यवस्थापन समितीने पार पाडलेले अन्य कोणतेही प्रभावी कामकाज - गुण २  

 एकूण गुण ५ 

 ४)   तंबाखू मुक्त ,प्लास्टिक मुक्त पर्यावरण, शिल्लक अन्न प्रक्रिया विल्हेवाट :-   

i) तंबाखू मुक्त शाळा :- शाळेपासून किमान २०० मीटर अंतरावर तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीस बंदी - गुण १

 ii) प्लास्टिक मुक्त शाळा :- पर्यावरणास हानिकारक असलेल्या प्लास्टिकचा वापर शाळेच्या आवारात अथवा कामकाजात होणार नाही याची दक्षता -गुण २ 

 iii) प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येत असलेल्या पोषण आहारातील शिल्लक अन्नावर योग्य ती प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्यासाठी अभिनव उपक्रम - गुण २    

    एकूण गुण ५   

 ५)   शाळेचे माजी विद्यार्थी, पालक, स्थानिक सेवाभावी संस्थाचा शाळा उपक्रम सहभाग 

 i) उपरोल्लेखित विद्यार्थीकेंद्रित उपक्रम तसेच शाळा व्यवस्थापनांनी आयोजित करावयाचे उपक्रम यामध्ये शाळेचे माजी विद्यार्थी, पालक, स्थानिक सेवाभावी संस्था इत्यादींचा शक्य असेल त्याठिकाणी अधिकाधिक सहभाग  गुण ५

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा  केंद्रप्रमुख मूल्यांकन प्रपत्र  CLICK HERE 

Post a Comment

0 Comments